Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता AI बुक करणार तुमची तिकीटं आणि भरणार बिलं! UPI पेमेंट्सचे Rules होणार सोपे; जाणून घ्या नवीन फीचर्स

UPI New Rules AI Feature : नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने UPI व्यवहारांना अधिक सोपे आणि प्रगत बनवण्यासाठी AI वापर सुरू केला आहे. आता युझर्सच्या व्हॉईस कमांडवर किंवा सूचनांवर एआय स्वतः तिकीट बुकिंग, लाईट बिल आणि रिचार्जचे पेमेंट्स पूर्ण करेल.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 02, 2026 | 04:32 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • यूपीआय युझर्ससाठी मोठी खूशखबर!
  • AI करणार तुमची बिलं आणि तिकिट बुकिंग
  • पाहा कसे बदलले नियम
UPI New Rules AI Feature : जर तुम्ही UPI पेमेंट वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. कारण UPI पेमेंटचे नियम बदलले आहेत. जे लोक UPI पेमेंट वापरतात, त्यांच्यासाठी भविष्यात डिजिटल पेमेंट आणखी सोपे होऊ शकते. सध्या, तिकीट बुक करण्यासाठी, बिल भरण्यासाठी किंवा छोटी ऑनलाइन खरेदी करण्यासाठी, आपल्याला स्वतः ॲप उघडून पेमेंट करावे लागते. आता तुमची ही लक्षात ठेवून कामं करायची झनझट संपून जाणार आहे. आता तुमची ही कामं AI करणार आहे. कसं काय? काही अडचण तर होणार नाही ना? ( UPI New Rules AI Feature ) 

Petrol-Diesel चे दर वाढणार? कच्च्या तेलाचे किमती कडाडले, सरकारकडून कर वाढ

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एका नवीन UAP वर काम करत आहे. यामुळे AI एजंट्सना वापरकर्त्यांच्या वतीने UPI द्वारे पेमेंट करण्याची परवानगी मिळेल. याचा अर्थ असा की, AI केवळ तुम्हाला माहितीच देणार नाही, तर तुमच्या परवानगीने थेट पेमेंटही करु शकणार आहेत.

AI यूपीआय पेमेंट कसे काम करेल?

समजा तुम्हाला ट्रेन किंवा फ्लाइटचे तिकीट बुक करायचे आहे. तुम्हाला कोणत्या तारखेचे तिकीट हवे आहे आणि तुमचे बजेट किती आहे, हे फक्त तुम्ही AI ला सांगा आणि निर्धास्त राहा. आता तुमचं पुढचं काम एआय करेल. तुमच्या पसंतीनुसार तुमच्यासाठी पर्याय शोधून, तिकीट बुक करून पेमेंट करेल. त्याचप्रमाणे, एआय तुम्हाला वीज, मोबाईल आणि गॅस बिलांचे पेमेंट करण्यासाठी किंवा रोजच्या खरेदीसाठी मदत करणार आहे. यामुळे प्रत्येक लहान व्यवहारासाठी वारंवार यूपीआय ॲप उघडून पेमेंट करण्याची आता गरज लागणार नाही. पण याचा अर्थ असा नाही की एआयचे तुमच्या बँक खात्यावर पूर्ण नियंत्रण ठेवणार, तुमचे हक्का तुमच्याकडेच असतील.

प्रत्येक पेमेंटसाठी मंजुरीची गरज नाही?

सध्या, UPI पेमेंट करताना, वापरकर्त्याला स्वतः व्यवहार सुरू करावा लागतो आणि आवश्यक परमीशन पण द्याव्या लागतात. नवीन एजंटिक पेमेंट मॉडेलमध्ये, काही लहान आणि नेहमीचे पेमेंट असतील जे AI पूर्व-निश्चित नियमांच्या आधारे Auto पेमेंट करू शकतात. यासाठी, एआय किती पैसे खर्च करू शकते आणि कोणत्या प्रकारचे पेमेंट करू शकते हे युजर्सनी अगोदर ठरवून द्यावे लागेल.

कोणत्या पेमेंटवर लक्ष दिलं जाईल?

सुरुवातीला, अशा एजंट पेमेंटचा वापर लहान आणि दैनंदिन व्यवहारांसाठी करणे अपेक्षित आहे. याचा अर्थ असा की तिकिटे, बिले किंवा छोटी खरेदी यासारखी कामे सुरुवातीला सोपी होऊ शकतात. भविष्यात या तंत्रज्ञानाचा वापर अधिक गुंतागुंतीच्या आर्थिक कामांमध्येही होऊ शकतो, मात्र त्यासाठी वेगवेगळे नियम आणि सुरक्षा व्यवस्था आवश्यक असणार आहे.

UPI ने आधीच बनवला रेकॉर्ड

भारतात UPI चा वापर सातत्याने वाढत चालली आहे. AI-आधारित पेमेंटचा विकासही होत आहे. ऑगस्ट २०२६ मध्ये, UPI चे आकडे २४.५१ अब्ज व्यवहारात्मक होते. ज्यांचे एकूण मूल्य अंदाजे ₹२९.८२ लाख कोटी इतकं होते. हा स्वतः मध्ये एक महत्त्वपूर्ण विक्रम आहे.

खुशखबर… आता रिअल इस्टेटमध्ये फक्त 100 रुपयांत गुंतवणुकीची संधी! Navi AMC चा नवीन Index Fund लाँच

Web Title: Upi new rules ai to book tickets and pay utility bills marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 04:32 PM

Topics:  

  • Artificial intelligence
  • online payment
  • UPI

संबंधित बातम्या

UPES Google Cloud : UPES आणि गूगल क्लाउडची  AI क्रांती! शिक्षणाला मिळणार नवी दिशा; 10100 ‘जेमिनी एंटरप्राइज’ ॲप्स लाँच
1

UPES Google Cloud : UPES आणि गूगल क्लाउडची AI क्रांती! शिक्षणाला मिळणार नवी दिशा; 10100 ‘जेमिनी एंटरप्राइज’ ॲप्स लाँच

UPI AutoPay : UPI AutoPay मध्ये मोठा बदल! ग्राहकांना मिळणार हा मोठा फायदा? जाणून घ्या सविस्तर
2

UPI AutoPay : UPI AutoPay मध्ये मोठा बदल! ग्राहकांना मिळणार हा मोठा फायदा? जाणून घ्या सविस्तर

Nihilent Launch nSEPIA App : कॅमेऱ्याकडे पाहताच AI सांगणार तुमच्या मनाची स्थिती! निहिलेंटने लाँच केले ‘nSEPIA’ ॲप
3

Nihilent Launch nSEPIA App : कॅमेऱ्याकडे पाहताच AI सांगणार तुमच्या मनाची स्थिती! निहिलेंटने लाँच केले ‘nSEPIA’ ॲप

Young Entrepreneur Success Story : 12 वीत शिकणारा मुलगा AI कंपनीचा मालक; वडिलांना स्वतःच्या कंपनीत दिली 2 लाखांची नोकरी
4

Young Entrepreneur Success Story : 12 वीत शिकणारा मुलगा AI कंपनीचा मालक; वडिलांना स्वतःच्या कंपनीत दिली 2 लाखांची नोकरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.