Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी

Vaping Ban Demand : लहान मुलांमध्ये आणि शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये वेपिंग आणि ई-सिगारेटचा वाढता वापर ही गंभीर चिंतेची बाब बनली आहे. आकर्षक पॅकेजिंग आणि विविध फ्लेवर्समध्ये मिळणाऱ्या या नव्या निकोटीन उत्पादनांमुळे लहान मुले व्यसनाच्या आहारी जात आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 16, 2026 | 06:34 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • लहान मुलं नशेच्या विळख्यात?
  • चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स
  • कठोर कायद्याची मागणी
Vaping Ban Demand : भारतात ई-सिगारेट आणि व्हेप्सवर कायदेशीर बंदी आहे. तरीही भारतात सहज या गोष्टी उपलब्ध होत आहेत त्यामुळे चिंता वाढत आहे. त्यात या सगळ्या गोष्टी लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये ( Vaping Ban Demand ) या सहज उपलब्धते होत आहेत याकडे गांभिर्याने पाहणं गरजेचं आहे. इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंधक कायदा, २०१९, ई-सिगारेटचे उत्पादन, विक्री, वितरण, साठवणूक आणि जाहिरात यावर बंदी घालतो. या कायद्यात इंटरनेट आणि सोशल मीडियाद्वारे ई-सिगारेटचा प्रचार करणे याचाही जाहिरात म्हणून समावेश आहे. असे असूनही, लहान मुले आणि तरुणांमध्ये नवीन निकोटीन उत्पादनांची वाढती उपलब्धता हा मुद्दा समोर येत आहे. पण याचं इतकं क्रेझ का?

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय

‘मदर्स अगेन्स्ट व्हेपिंग’ या संस्थेने संसदेत हा मुद्दा पुन्हा उपस्थित केला आहे. संस्थेचे म्हणणे आहे की, शालेय वयोगटातील मुलांसमोर व्हेपिंगला “सुरक्षित,” “कूल,” आणि निरुपद्रवी म्हणून सादर केले जात आहे. MAV च्या मते, सोशल मीडिया, इन्फ्लुएन्सर्स आणि बेकायदेशीर विक्रेत्यांच्या माध्यमातून लहान मुले आणि तरुणांमध्ये या उत्पादनांची उपलब्धता वाढत आहे.

व्हेपिंगला कूल, सुरक्षित असं ब्रँडिंग केल्याचा आरोप

एमएव्हीने म्हटले आहे की, नवीन निकोटीन उत्पादनांपासून मुले आणि तरुणांचे संरक्षण करणे हा राजकीय पक्षाचा मुद्दा नाही. हा मुलांची सुरक्षितता, सार्वजनिक आरोग्य आणि राष्ट्राच्या भविष्याशी संबंधित आहे. या संघटनेने शक्य तितक्या खासदारांना या मुद्द्यावर एकत्र येऊन कठोर कारवाईला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.

देशातील मोठी तरुण लोकसंख्या या नवीन निकोटीन उत्पादनांसाठी एक संभाव्य बाजारपेठ म्हणून पाहिली जाऊ शकते, अशी चिंता संघटनेने विशेषतः व्यक्त केली आहे. एमएव्हीने परदेशी हितसंबंधांविरुद्ध दक्षता बाळगण्याचे आणि भारतीय मुले व तरुण या उत्पादनांचे लक्ष्य बनणार नाहीत याची खात्री करण्याचे आवाहन केले आहे.

नवीन निकोटीन उत्पादनांवरील बंदीची कठोर मागणी

एमएव्हीने (MAV) ई-सिगारेट्स, ईएनडीएस (ENDS), व्हेप, हीटेड टोबॅको प्रॉडक्ट्स (HTPs), हीट-नॉट-बर्न आणि इतर नवीन निकोटीन उपकरणांवरील बंदीच्या कठोर अंमलबजावणीची मागणी केली आहे. २०१९ च्या कायद्यामध्ये ईएनडीएस आणि हीट नॉट बर्न प्रॉडक्ट्ससारख्या उपकरणांचा इलेक्ट्रॉनिक सिगारेट्सच्या व्याख्येत समावेश आहे.

संस्थेचे म्हणणे आहे की, केवळ बंदी घालणे पुरेसे नाही; बंदीच्या उल्लंघनाविरुद्ध प्रभावी कारवाई करणे देखील आवश्यक आहे. एमएव्हीच्या मते, सरकारने अशा प्रकरणांवरही लक्ष ठेवले पाहिजे, जिथे प्रतिबंधित उत्पादनांची विक्री किंवा जाहिरात विविध माध्यमांद्वारे मुलांपर्यंत आणि तरुणांपर्यंत पोहोचत आहे.

सोशल मीडिया आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उत्तरदायित्व

एमएव्हीने सोशल मीडिया आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरही उत्तरदायित्वाची मागणी केली आहे. संस्थेचे म्हणणे आहे की, जर कोणताही प्लॅटफॉर्म प्रतिबंधित नवीन निकोटीन उत्पादनांच्या जाहिरातीला, विक्रीला किंवा वितरणाला प्रोत्साहन देत असेल, तर त्यांच्यावर कठोर कायदेशीर आणि दंडात्मक कारवाई केली पाहिजे. जिथे कायदे लागू आहेत तिथे त्यांची कठोर अंमलबजावणी करावी आणि जिथे कायदेशीर पळवाटा आहेत तिथे अधिक कठोर तरतुदी कराव्यात, अशी मागणी होत आहे.

२०१९ च्या कायद्यात इंटरनेट आणि सोशल मीडियाचा ‘जाहिरात’ या व्याख्येत समावेश करण्यात आला आहे, अशा वेळी ही मागणी महत्त्वपूर्ण आहे. या कायद्यात ई-सिगारेटच्या ऑनलाइन विक्रीचाही ‘विक्री’ या व्याख्येत समावेश आहे.

“पुढच्या पिढीला निकोटीनच्या व्यसनापासून वाचवले पाहिजे”

क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ डॉ. भावना बर्मी म्हणाल्या की, भारताची तरुण लोकसंख्या ही देशाची सर्वात मोठी ताकद आहे. त्यांनी सर्व लोकप्रतिनिधींना व्हेप्स आणि हीट-नॉट-बर्न उपकरणांवरील बंदीची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. त्यांनी निकोटीन पाऊच, पॅचेस आणि गम यांसारख्या इतर नवीन निकोटीन उत्पादनांवरही बंदी घालण्याची मागणी केली.

एमएव्हीचे म्हणणे आहे की, मुलांना निकोटीनच्या व्यसनापासून वाचवणे ही केवळ सरकारची जबाबदारी नाही. यासाठी संसद आणि सरकार, तसेच शाळा, पालक, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्था, आरोग्य तज्ञ आणि समाज यांनी एकत्र काम करणे आवश्यक आहे. संस्थेचे म्हणणे आहे की केवळ सामूहिक प्रयत्नांतूनच मुलांना आणि तरुणांना नवीन निकोटीन उत्पादनांपासून दूर ठेवता येईल.

Income Tax Notice Reasons : वेळेत ITR भरूनही Income Tax ची नोटीस? या’ चुका पडू शकतात महागात

Web Title: Vaping ban demand strict action new nicotine product among children

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 06:34 PM

Topics:  

  • Banned
  • Business News
  • Marathi News
  • smoking

संबंधित बातम्या

Rishi Panchami 2026: सप्तर्षींचं स्मरण करताना म्हणा ‘हा’ श्लोक; जाणून घ्या धार्मिक महत्त्व
1

Rishi Panchami 2026: सप्तर्षींचं स्मरण करताना म्हणा ‘हा’ श्लोक; जाणून घ्या धार्मिक महत्त्व

मार्केट हादरणार! NSE चा बहुप्रतिक्षित IPO ‘या’ दिवशी येणार; गुंतवणूकदारांची दिवाळी आधीच साजरी होणार?
2

मार्केट हादरणार! NSE चा बहुप्रतिक्षित IPO ‘या’ दिवशी येणार; गुंतवणूकदारांची दिवाळी आधीच साजरी होणार?

हात न लावता स्क्रीन कंट्रोल! डोळ्यांच्या इशाऱ्यावर चालणार Meta चा हायटेक ‘Phoenix VR’ चष्मा
3

हात न लावता स्क्रीन कंट्रोल! डोळ्यांच्या इशाऱ्यावर चालणार Meta चा हायटेक ‘Phoenix VR’ चष्मा

Hartalika Teej 2026: आज हरतालिका तीज! ‘या’ ५ वस्तूंचं दान करा अन् समृद्धीसाठी करा खास उपाय
4

Hartalika Teej 2026: आज हरतालिका तीज! ‘या’ ५ वस्तूंचं दान करा अन् समृद्धीसाठी करा खास उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.