(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
आयकर विभाग आयटीआरमध्ये घोषित केलेल्या उत्पन्नाची तुलना फॉर्म १६, AIS, TDS नोंदी आणि इतर माहितीशी करतो. विसंगती आढळल्यास, ज्यांनी वेळेवर रिटर्न दाखल केला आहे त्यांनाही नोटीस मिळू शकते. अशा कोणत्या परिस्थिती आहे ज्यामुळे तुम्ही वेळेवर ITR भरुनही तुम्हाला नोटीस मिळू शकते.
नोटीस मिळण्यामागील सर्वात सामान्य कारणांपैकी एक म्हणजे उत्पन्नातील तफावत. जर तुमच्या ITR मध्ये नमूद केलेला पगार आणि कर्मचाऱ्याच्या फॉर्म १६ मध्ये नमूद केलेला पगार वेगळा असेल, तर विभाग तुम्हाला त्या तफावतीमगील कारण विचारू शकतो.
जर तुम्ही तुमच्या ITR मध्ये दावा केलेले TDS क्रेडिट, फॉर्म २६एएस किंवा विभागाच्या नोंदींमधील माहितीपेक्षा वेगळे दिसत असेल, तर तुम्हाला नोटीस मिळू शकते. असे तेव्हा होऊ शकते जेव्हा तुमचा TDS रिटर्न योग्यरित्या दाखल केलेला नसेल, त्यात काही चूक असेल, किंवा त्यात नंतर दुरुस्ती केली गेली असेल आणि तुमच्या नोंदींमध्ये डेटा अजूनपर्यंत अपडेट झालेला नसेल. त्यामुळे, तुमचा ITR दाखल करण्यापूर्वी फॉर्म २६एएस आणि एआयएसमधील कराचा तपशील तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
वेळेवर तुमचा आयटीआर दाखल केल्यानंतरही, जर तुम्ही चुकीच्या कपातीचा किंवा सवलतीचा दावा केला असेल, तर विभाग स्पष्टीकरण मागू शकतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही कपातीचा दावा केला असेल परंतु त्यास समर्थन देण्यासाठी तुमच्याकडे आवश्यक कागदपत्रे किंवा पात्रता नसेल, तर विभाग त्या दाव्यावर प्रश्न विचारू शकतो. याव्यतिरिक्त, चुकीचा ITR फॉर्म निवडल्यास किंवा अपूर्ण माहिती दिल्यास देखील नोटीस येऊ शकते.
जर तुम्हाला आयकर विभागाकडून नोटीस मिळाली, तर घाबरण्याची गरज नाही. अगोदर आयकर विभागाच्या अधिकृत ई-फायलिंग पोर्टलवर नोटीस तपासून तिची सत्यता पडताळून पाहा. त्यानंतर, नोटीसमध्ये नमूद केलेले कारण काळजीपूर्वक वाचा आणि विभागाने कोणत्या माहितीबद्दल प्रश्न विचारले आहेत हे निश्चित करा.