Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 12 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News :तोतलाडोह धरणात केवळ २५.३३ टक्के जलसाठा; चोरट्यांचा पाण्यावर डल्ला; नदी, कालव्यांमधील पाणी टँकरने विक्री

Nagpur News : नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह धरणातील जलसाठा अवघा २५.३३ टक्क्यांवर आला आहे. एकीकडे पाणीटंचाईचे संकट गडद होत असताना दुसरीकडे नदी आणि कालव्यांमधील पाण्याची चोरी करून टँकरद्वारे विक्री केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 12, 2026 | 03:35 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • धरणांमधील जलसाठ्याची स्थिती चिंताजनक
  • कन्हान, कामठी खैरी परिसरात पाणी चोरीचे जाळे
  • दररोज २५५ एमएलडी पाणी गळती, चोरीमुळे वाया
  • शहरातही टँकर माफियांचे जाळे
Nagpur News : शहरासह जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद होत असताना नदी आणि कालव्यांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची चोरी होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. एकीकडे नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले जात असताना दुसरीकडे काहीजण कन्हान नदी आणि पेंच कालव्यांमधील पाणी अवैधरीत्या खासगी शेतांमध्ये व विहिरींमध्ये वळवून टँकरच्या माध्यमातून विकत असल्याची माहिती पुढे आली आहे.

जिल्ह्याचा सर्वांत मोठा जलस्रोत असलेल्या तोतलाडोह धरणातील पाणीसाठा अवघा २५.३३ टक्क्यांवर आला आहे. पाण्याची उपलब्धता चिंताजनक असताना सुरू असलेल्या या प्रकारामुळे जलसंपत्तीच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने पाणीचोरी रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याची तयारी सुरू केली आहे.

धरणांमधील जलसाठ्याची स्थिती चिंताजनक

नागपूर विभागातील १६ प्रमुख धरणांमध्ये सध्या एकूण ४३०३.४२ दलघमी म्हणजेच ५८.७४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जलसाठ्‌यात ५ ते ६ टीएमसीची घट नोंदवली आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Energy: ऊर्जा सुरक्षा आणि पर्यावरणाचा समतोल! भारतासाठी भूमिगत कोळसा खाणकाम ठरणार महत्त्वाचा पर्याय

कन्हान, कामठी खैरी परिसरात पाणी चोरीचे जाळे

कन्हान नदी तसेच नवेगाव-खैरी धरणापासून कन्हान जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतच्या सुमारे ३२ किलोमीटरच्या प्रवाह क्षेत्रात काही शेतकऱ्यांकडून थेट पंप लावून पाण्याचा उपसा केला जात असल्याच्या तक्रारी जलसंपदा विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. सिंचनासाठी कालव्यांमध्ये सोडलेले पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचत नसल्याचेही निदर्शनास आले आहे.

पाणी वळवण्यासाठी काही ठिकाणी पाईपलाईन फोडल्याचे तर काही ठिकाणी चर खोदून पाण्याचा प्रवाह शेतांकडे वळवल्याचे समोर आले आहे, यापूर्वी पेंचच्या २३०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला तीन वेगवेगळ्या ठिकाणी जाणीवपूर्वक गळती निर्माण करून पाणी वळविण्याचे प्रकारही उघडकीस आले होते.

दररोज २५५ एमएलडी पाणी गळती, चोरीमुळे वाया

महापालिकेकडून पेंच आणि कन्हान नदीतून दररोज ७३० ते ७५० एमएलडी कच्चे पाणी उचलले जाते. यामध्ये पेंचच्या चार जलशुद्धीकरण केंद्रांतून सुमारे ५२० एमएलडी तर कन्हान जलशुद्धीकरण केंद्रातून २२० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. मात्र, एका अहवालानुसार उचलण्यात येणाऱ्या एकूण पाण्यापैकी सुमारे २५५ एमएलडी म्हणजेच ३५ ते ४० टक्के पाणी गळती आणि चोरीमुळे वाया जात आहे. पाण्याची वाढती गरज लक्षात घेता ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे.

Steals Gold For iPhone: “सोन्याचे मंगळसूत्र-नेकलेस विकून घेतला आयफोन!”नागपुरातील सुनेचा भयंकर पराक्रम…

शहरातही टँकर माफियांचे जाळे

नदी आणि कालव्यांपुरतीच पाणी चोरी मर्यादित नसून शहरातही अनधिकृत नळजोडण्यांच्या माध्यमातून पाण्याची चोरी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिका आणि ऑरेंज सिटी वॉटरने जून-जुलै २०२५ मध्ये राबवलेल्या विशेष मोहिमेत ५ हजारांहून अधिक अवैध नळजोडण्या तोडल्या होत्या.

यामध्ये २,५६६ नळजोडण्या पूर्णपणे अनधिकृत होत्या. ३६२ प्रकरणांत मीटरच्या आधीच पाणी घेऊन चोरी केली जात असल्याचे आढळले तर १,६४२ ठिकाणी दुहेरी नळजोडण्या आढळल्या. आसीनगर झोनमध्ये सर्वाधिक १,००३ अनधिकृत नळजोडण्या आढळल्या होत्या. या आकडेवारीवरून शहरातील पाणीचोरीचे मोठे जाळे समोर आले होते.

Web Title: Nagpur news totladoh dam water storage water theft tanker sale cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • Marathi News
  • Nagpur Municipal Corporation
  • Nagpur News
  • Water Tanker

संबंधित बातम्या

NCP Merger News: अजित पवार महायुतीची साथ सोडणार होते; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
1

NCP Merger News: अजित पवार महायुतीची साथ सोडणार होते; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) १४६ वर
2

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) १४६ वर

Russia-Ukraine War : अमेरिकेच्या मध्यस्थीने रशिया-युक्रेन कैदी अदलाबदलीचा मार्ग मोकळा; शांतता कराराबाबत मात्र कोंडी कायम
3

Russia-Ukraine War : अमेरिकेच्या मध्यस्थीने रशिया-युक्रेन कैदी अदलाबदलीचा मार्ग मोकळा; शांतता कराराबाबत मात्र कोंडी कायम

World Breaking : इराणच्या धमक्यांमुळे अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेन्ट लष्करी तळावर स्थलांतरित
4

World Breaking : इराणच्या धमक्यांमुळे अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेन्ट लष्करी तळावर स्थलांतरित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.