96 व्या वर्षी Warren Buffett यांचा मोठा निर्णय ( सौजन्य- सोशल मीडिया )
PepsiCo India चा 36000 शेतकऱ्यांना दिलासा; ‘pep+’ उपक्रमांतर्गत शाश्वत शेती आणि जलसंवर्धनाला गती
शेअर मार्केटच्या अनुषंगाने आलेली अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. जगातील सर्वात दिग्गज गुंतवणूकदार आणि शेअर बाजाराचे ‘बिग बुल’ म्हणून ओळखले जाणारे वॉरन बफेट यांनी अखेर वयाच्या ९६ व्या वर्षी निवृत्तीची घोषणा केली आहे. जगातील सर्वात प्रसिद्ध गुंतवणूकदार म्हणून त्यांची ओळख आहेच पण बर्कशायर हॅथवेच्या अध्यक्षपदावरून पायउतार होत आहेत.
१९६५ पासून ते १ ट्रिलियन डॉलर्सच्या या कंपनीचे नेतृत्व करत आहेत. या ९६ वर्षीय दिग्गज गुंतवणूकदाराने १८ सप्टेंबर रोजी भागधारकांना लिहिलेल्या पत्रात आपल्या निर्णयाची घोषणा केली. एका वेगळ्या घोषणेत, कंपनीने म्हटले आहे की बफेट तात्काळ प्रभावाने चेअरमन एमेरिटस बनतील, परंतु संचालक मंडळावर संचालक म्हणून कायम राहतील.
बर्कशायरने स्पष्ट केलं की, एका दीर्घकालीन उत्तराधिकार योजनेचा भाग म्हणून त्यांचे पुत्र, हॉवर्ड बफेट, अध्यक्ष म्हणून त्यांचे उत्तराधिकारी होतील. सुसान डेकर प्रमुख स्वतंत्र संचालक म्हणून कायम राहतील.
बर्कशायरच्या संचालक मंडळाच्या वतीने, मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रेग एबेल म्हणाले, “बर्कशायर आणि तिच्या मालकांवर वॉरेन यांचा प्रभाव अमेरिकन व्यवसायाच्या इतिहासात अतुलनीय आहे. वॉरेन बफे यांनी निर्माण केलेली संस्कृती आणि मूल्ये बर्कशायरच्या केंद्रस्थानी राहतील आणि हॉवर्ड त्यांचे संरक्षक असतील. हॉवर्ड त्यांच्या नवीन भूमिकेत बर्कशायरसाठी जी काळजी, शिस्त आणि सखोल समज आणत आहेत, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत, आणि प्रमुख स्वतंत्र संचालक म्हणून त्यांच्या सातत्यपूर्ण नेतृत्वासाठी आणि महत्त्वपूर्ण योगदानासाठी आम्ही स्यू डेकर यांचेही आभारी आहोत.”
“चेअरमन एमेरिटस या नात्याने, श्री. बफेट संचालक मंडळाचे सदस्य म्हणून कायम राहतील आणि आपली मौल्यवान मते व दृष्टिकोन मांडत राहतील,” असे बर्कशायरने एका निवेदनात म्हटले आहे. गेल्या वर्षी, बफेट यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून पायउतार होणार असल्याची घोषणा केली होती.






