Share Market Today: लाल रंगात होणार शेअर बाजाराची सुरुवात? रिलायन्ससह या शेअर्सवर गुंतवणूकदारांचे लक्ष
गुंतवणूकदार आज रिलायन्स इंडस्ट्रीज, जिओ प्लॅटफॉर्म्स, सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज, भारत इलेक्ट्रॉनिक्स, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, वरुण बेवरेजेस, गेल, ट्रेंट, सुझलॉन एनर्जी, इंडिगो, वेदांत पॉवर, रेल विकास निगम (आरव्हीएनएल), वेदांता तेल आणि वायू, सॅजिलिटी इंडिया या स्टॉक्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या वेल्थ मॅनेजमेंट विभागातील डेरिव्हेटिव्हज अँड टेक्निकल्सचे प्रमुख, चंदन तापारिया यांनी गुंतवणूकदारांना तीन स्टॉक्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तापारिया यांनी निवडलेल्या शेअर्समध्ये कोटक महिंद्रा बँक, एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्स (नायका) आणि इटरनलचे यांचा समावेश आहे. (फोटो सौजन्य: istock)
तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार गुंतवणूकदार आज दालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रीज लि., वारी एनर्जीज, एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्स लि. (नायका), डीएलएफ लि., कोटक महिंद्रा बँक लि. या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात.
बीएसई आणि एनएसई लक्ष्मी पूजेच्या दिवशी, रविवार, ८ नोव्हेंबर रोजी एक तासाचे विशेष मुहूर्त ट्रेडिंग सत्र आयोजित केले जाणार आहे. सकाळी ९:१५ ते दुपारी ३:३० या नियमित बाजार वेळेऐवजी, इक्विटी सेगमेंटमध्ये दुपारी २:२० ते ३:३० पर्यंत अखंड ट्रेडिंग होणार आहे.






