Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुंतवणूकदारांचे पैसे बुडाल्यास त्याला जबाबदार कोण? राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना सवाल!

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर व्हिडिओ शेअर करत हिंडेनबर्ग प्रकरणी मोदी सरकारला तीन मोठे प्रश्न विचारले आहेत. सध्या शेअर बाजारात मोठी जोखीम आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांचे पैसे बुडाल्यास त्याला जबाबदार कोण असेल? असा प्रश्न त्यांनी मोदी सरकारला विचारला आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Aug 11, 2024 | 10:04 PM
गुंतवणूकदारांचे पैसे बुडाल्यास त्याला जबाबदार कोण? राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना सवाल!

गुंतवणूकदारांचे पैसे बुडाल्यास त्याला जबाबदार कोण? राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना सवाल!

Follow Us
Close
Follow Us:

अमेरिकेची शॉर्ट सेलर फर्म हिंडनबर्ग रिसर्चचा नवीन अहवाल नुकताच समोर आला. ज्यात अदानी समूह प्रकरणात सेबीच्या अध्यक्ष माधवी पुरी बुच यांचे नाव गोवण्यात आले आहे. त्यामुळे आता येत्या आठवड्यात त्याचा परिणाम शेअर बाजारावर पाहायला मिळणार आहे. शेअर बाजारात मोठी पडझड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशातच आज (ता.११) लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर व्हिडिओ शेअर करत मोदी सरकारला तीन मोठे प्रश्न विचारले आहेत.

गुंतवणूकदारांचे पैसे बुडाल्यास त्याला जबाबदार कोण?

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “छोट्या किरकोळ गुंतवणूकदारांच्या गुंतवणूक रकमेचे संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या सेबीने अध्यक्ष्यांवरील गंभीर आरोपांबाबत तडजोड केली जात आहे. देशभरातील प्रामाणिक गुंतवणूकदारांचे सरकारला महत्त्वाचे प्रश्न आहेत.” हिंडेनबर्ग अहवालामुळे सध्या शेअर बाजारात मोठी जोखीम आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांचे पैसे बुडाल्यास त्याला जबाबदार कोण असेल? असा प्रश्नही त्यांनी यावेळी सरकारला केला आहे.

हेही वाचा : हिंडनबर्ग रिसर्चच्या अहवालावर अदानी समूहाची मोठी प्रतिक्रिया; म्हटले… हा तर नफा कमावण्याचा धंदा!

काय म्हटलंय राहुल गांधी यांनी आपल्या व्हिडिओमध्ये?

राहुल गांधींनी त्यांच्या एक्स पोस्टमधील व्हिडिओमध्ये तीन प्रश्न उपस्थित करत म्हटले आहे की, सेबीच्या अध्यक्ष माधबी पुरी बुच यांनी हिंडेनबर्ग अहवालानंतर अद्याप राजीनामा का दिला नाही? गुंतवणुकदारांनी कष्टाने कमवलेला पैसा गमावला तर कोणाला जबाबदार धरणार? पंतप्रधान मोदी, सेबी अध्यक्ष की गौतम अदानी? अत्यंत गंभीर आरोप समोर आल्यानंतर सर्वोच्च न्यायालय पुन्हा एकदा या प्रकरणाची स्वत:हून दखल घेणार का? असे प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केले आहेत.

 

The integrity of SEBI, the securities regulator entrusted with safeguarding the wealth of small retail investors, has been gravely compromised by the allegations against its Chairperson.

Honest investors across the country have pressing questions for the government:

– Why… pic.twitter.com/vZlEl8Qb4b

— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 11, 2024

राहुल गांधी यांनी पुढे बोलताना म्हटले आहे की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) तपासाला इतके घाबरले आहेत आणि त्यातून काय उघड होऊ शकते.” हे तर स्पष्ट झाले आहे. राहुल गांधींनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आंतरराष्ट्रीय सामन्यातील फिक्सिंगचा संदर्भ देत म्हटले आहे की, पंचानेच तडजोड केल्यास भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मोठ्या आंतरराष्ट्रीय सामन्याचे काय झाले? हे याचे उत्तम उदाहरण आहे.

हेही वाचा : …हा तर चिखल फेकण्याचा प्रयत्न, आरोपांमध्ये नाही दम; हिंडनबर्ग रिसर्चच्या अहवालावर तज्ज्ञांची प्रतिक्रिया!

घोटाळ्याच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समितीची मागणी

सेबीच्या अध्यक्ष माधबी बुच यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांबाबत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुग खरगे म्हणाले आहे की, या घोटाळ्याच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) स्थापन करण्याची गरज आहे. जोपर्यंत जेपीसी या प्रकरणाची चौकशी करत नाही, तोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या सात दशकांत कठोर परिश्रम घेऊन, उभारलेल्या भारताच्या घटनात्मक संस्थांशी (सेबी) तडजोड करून आपल्या मित्रपक्षाचे संरक्षण करत राहतील, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Who is responsible if investors lose their money rahul gandhi on the hindenburg research

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2024 | 09:55 PM

Topics:  

  • Hindenburg Research
  • sebi

संबंधित बातम्या

फ्युचर्स आणि ऑप्शन्स सेगमेंटमध्ये लहान व्यापाऱ्यांना मोठा तोटा, सेबी वाढवू शकते डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्टचा कालावधी
1

फ्युचर्स आणि ऑप्शन्स सेगमेंटमध्ये लहान व्यापाऱ्यांना मोठा तोटा, सेबी वाढवू शकते डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्टचा कालावधी

SEBI च्या नवीन प्रस्तावामुळे बाजारात पसरली घबराट, ‘हे’ शेअर्स १० टक्क्यांपर्यंत घसरले
2

SEBI च्या नवीन प्रस्तावामुळे बाजारात पसरली घबराट, ‘हे’ शेअर्स १० टक्क्यांपर्यंत घसरले

नुवामा, एंजेल वन आणि बीएसईचे शेअर्स कोसळले; SEBI च्या कारवाईचा परिणाम
3

नुवामा, एंजेल वन आणि बीएसईचे शेअर्स कोसळले; SEBI च्या कारवाईचा परिणाम

SEBI ची मोठी कारवाई, ‘या’ कंपनीवर शेअर बाजारात बंदी; ४८४३ कोटी रुपये जप्त होणार
4

SEBI ची मोठी कारवाई, ‘या’ कंपनीवर शेअर बाजारात बंदी; ४८४३ कोटी रुपये जप्त होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.