
२०२६ मध्ये सोन्याचं भाव स्वस्त होणार की गगनाला भिडणार? ([Photo Credit - X)
बल्गेरियातील अंध बाबा वेंगा यांची अनेक भाकितं खरी ठरल्याचा दावा केला जातो. यामध्ये अमेरिकेतील ट्विन टॉवर्सवरील दहशतवादी हल्ला, राजकुमारी डायनाबद्दलची भाकितं किंवा म्यानमारमधील भूकंप यांचा समावेश आहे. त्यांची भाकितं थेट घटनांबद्दल नसली, तरी ती घटनांची सूचना देत असल्याचं मानलं जातं. त्यामुळे लोक त्यांच्या भाकितांना फार महत्त्व देतात. आता सोन्याच्या किमतींबद्दल केलेली त्यांची भविष्यवाणी व्हायरल होत आहे, जी खरी ठरल्यास मोठा नफा होण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार, बाबा वेंगा यांची भविष्यवाणी थेट सोन्याच्या किमतींशी संबंधित नाही, पण ती जागतिक आर्थिक संकटाची सूचना देते. बाबा वेंगा यांच्या भाकितांमध्ये २०२६ मध्ये जागतिक आर्थिक संकटाचा उल्लेख आहे, ज्यामुळे रोखीचे संकट आणखी वाढू शकते. रोखीचे संकट वाढल्यास बँकिंग व्यवस्थेत समस्या निर्माण होण्याची भीती असते. अशा परिस्थितीत सोने ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते.
जर बाबा वेंगा यांची भाकित खरी ठरली आणि सोन्यातील गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर वाढली, तर सोन्याच्या किमती प्रति १० ग्रॅम १.५ लाख ते २ लाख रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचू शकतात. सोन्यातील गुंतवणूकदारांसाठी ही बातमी महत्त्वाची असून, २०२६ हे वर्ष सोन्याच्या दरांमध्ये मोठी उलथापालथ घेऊन येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.