
dubai city of gold first gold street video deira new district 2026
World’s first Gold Street Dubai video : स्वप्नांच्या नगरीत काहीही शक्य आहे, हे दुबईने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे. ज्या देशाला आधीच ‘सिटी ऑफ गोल्ड’ (City of Gold) म्हटले जाते, आता तिथे खऱ्या अर्थाने सोन्याचे रस्ते दिसणार आहेत. दुबईतील ‘इथरा दुबई’ (Ithra Dubai) या विकासक कंपनीने ‘न्यू दुबई गोल्ड डिस्ट्रिक्ट’ या भव्य प्रकल्पाची घोषणा केली आहे. या प्रकल्पाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे जगातील पहिला ‘गोल्ड स्ट्रीट’ (Gold Street), ज्याचा पहिला अधिकृत व्हिडिओ नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.
अनेकांना प्रश्न पडला असेल की रस्ता सोन्याचा कसा असू शकतो? दुबई प्रशासनाच्या माहितीनुसार, देइरा येथील या नवीन गोल्ड डिस्ट्रिक्टमध्ये ‘गोल्ड स्ट्रीट’ ही एक अशी जागा असेल जिथे रस्ते आणि इमारतींच्या रचनेत सोन्याच्या घटकांचा (Gold elements) आणि सुवर्ण नक्षीकामाचा सढळ हस्ते वापर केला जाईल. हा रस्ता केवळ दिसायलाच सोन्यासारखा नसेल, तर तो दुबईच्या सुवर्ण वारशाचे प्रतीक असेल. पर्यटकांना या रस्त्यावरून चालताना जणू काही आपण सोन्याच्या नगरीत फिरतोय, असा अनुभव येईल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Global Trade : ‘मदर ऑफ ऑल डील’ नंतर भारताचा नवा डाव! एस. जयशंकरआणि मार्को रुबियो यांच्यात होणार महाचर्चा
दुबई डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमी अँड टुरिझम (DET) चे सीईओ अहमद अल खाजा यांनी सांगितले की, “सोनं हे दुबईच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे.” या नवीन गोल्ड डिस्ट्रिक्टमध्ये १,००० हून अधिक किरकोळ सोन्याची दुकाने, घाऊक व्यापारी आणि गुंतवणूक केंद्रे असतील. मलबार गोल्ड, तनिष्क, जॉयअलुकास आणि जवहरा यांसारखे जागतिक ब्रँड्स येथे त्यांची भव्य शोरूम्स उघडणार आहेत. जॉयअलुकासने तर येथे २४,००० स्क्वेअर फुटांचे मध्यपूर्वेतील सर्वात मोठे दालन उभारण्याची घोषणा केली आहे.
Ithra Dubai officially launches Dubai Gold District, a purpose-built destination designed to strengthen Dubai’s position as the world’s leading hub for the gold and jewellery trade. Developed as a unified ecosystem, the District features more than 1,000 retailers and brings… pic.twitter.com/sY1ekO65PO — Dubai Media Office (@DXBMediaOffice) January 27, 2026
हा प्रकल्प केवळ खरेदीसाठी मर्यादित नाही. आंतरराष्ट्रीय खरेदीदारांच्या सोयीसाठी येथे सहा अलिशान हॉटेल्समध्ये १,००० हून अधिक खोल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. “आम्ही दुबईला केवळ सोन्याचे दुकान नाही, तर सोन्याची पूर्ण इकोसिस्टम बनवत आहोत,” असे इथरा दुबईचे सीईओ इसाम गलादारी यांनी म्हटले आहे. सोन्याच्या शुद्धतेची खात्री आणि पारदर्शक व्यापार यामुळे हा भाग जगभरातील गुंतवणूकदारांसाठी पहिले पसंतीचे केंद्र ठरेल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Red Tape Secret: नेतान्याहूंच्या फोनवर ‘लाल पट्टी’ का? ‘या’ व्हायरल फोटोमागचे इस्रायली ‘कमांडो’ सिक्रेट जगासमोर उघड
दुबईचा जुना भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘देइरा’चा या प्रकल्पामुळे पूर्णपणे कायापालट होणार आहे. आधुनिक पायाभूत सुविधा, मेट्रो कनेक्टिव्हिटी आणि सोन्याचे झळाळते रस्ते यामुळे देइरा पुन्हा एकदा जागतिक पर्यटनाच्या नकाशावर ठळकपणे येईल. दुबईने २०२४-२५ मध्ये तब्बल ५३ अब्ज डॉलर्सच्या सोन्याची निर्यात केली आहे, या नवीन प्रकल्पामुळे हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
Ans: हा रस्ता दुबईच्या ऐतिहासिक देइरा (Deira) भागातील नवीन 'दुबई गोल्ड डिस्ट्रिक्ट' मध्ये बांधला जात आहे.
Ans: या रस्त्याच्या बांधकामात आणि डिझाइनमध्ये सोन्याच्या घटकांचा (Gold elements) वापर केला जाणार असून, हे जगातील पहिले अशा प्रकारचे सुवर्ण पर्यटन आकर्षण असेल.
Ans: या नवीन गोल्ड डिस्ट्रिक्टमध्ये १,००० हून अधिक किरकोळ आणि घाऊक सोन्याची दुकाने असतील.