2026 मध्ये सर्व संपुष्टात येणार ! मनुष्य होणार गुलाम(फोटो सौजन्य-X)
Baba Vanga Predictions News in Marathi : 2025 हे वर्ष संपण्यासाठी अवघे तीन महिने शिल्लक आहेत, अशातच 2026 या वर्षासाठी बल्गेरियाच्या प्रसिद्ध गूढवादी बाबा वेंगा यांनी केलेल्या भविष्यावाणी पुन्हा चर्चेत आल्या आहेत. बाबा वेंगा यांनी येत्या वर्षासाठी काही मोठी आणि धक्कादायक भविष्यवाणी व्यक्त केली आहे. यात तिसरे महायुद्ध, एलियनचा पृथ्वीवर संपर्क, AI चे मानवावर पूर्ण नियंत्रण आणि नैसर्गिक आपत्तींमुळे पृथ्वीचा काही भाग नष्ट होण्याची शक्यता आहे.
जगभरातील सध्याची परिस्थिती पाहिल्यानंतर प्रत्येकाला भविष्यात काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. अचूक माहिती देता येत नसली तरी, जगात असे बरेच लोक आहेत जे भविष्य पाहण्याचा दावा करतात. जेव्हा त्यांची भाकिते खरी ठरतात तेव्हा आश्चर्य वाटते. बल्गेरियन पैगंबर बाबा वांगा यांच्या बाबतीतही असेच काही घडले. जेव्हा त्यांची भाकिते खरी ठरू लागली, तेव्हा लोक तिच्यावर विश्वास ठेवू लागले.
नोस्ट्राडेमस हा सर्वात प्रमुख पैगंबर मानला जातो. तर दुसरा सर्वात प्रमुख बाबा वांगा आहे.ज्याला बाल्कनचा नोस्ट्राडेमस म्हणूनही ओळखले जाते. प्रसिद्ध बल्गेरियन गूढवादी बाबा वांगाच्या भविष्यवाण्या अनेकदा खऱ्या ठरतात. २०२६ आणि त्यानंतरच्या वर्षासाठी ही त्यांनी काही भाकितं केली आहेत. बाबा वांगाचे खरे नाव व्हँजेलिया पांडेवा दिमित्रोवा होते आणि त्यांचा जन्म १९११ मध्ये सध्याच्या उत्तर मॅसेडोनियामध्ये झाला, असे म्हटले जाते की ती लहानपणीच अंध झाली, त्यानंतर तिला भविष्य पाहण्याची शक्ती मिळाली.
बाबा वांगाच्या भविष्यवाणीत म्हटले होते की, २०२५ हे वर्ष अशांततेचे वर्ष असेल आणि त्यात अनेक युद्धे होतील. विशेषतः या युद्धात युरोपमध्ये युद्धे, भूकंप आणि पूर यासारख्या अनेक नैसर्गिक आपत्तींची भविष्यवाणी केली होती, जी खरी ठरत आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी भाकीत केले होते की २०२६ मध्ये तिसरे महायुद्ध सुरू होईल. बाबा वांगा यांच्या मते, जागतिक शक्ती एकमेकांशी भिडतील आणि तणाव वाढेल. यामध्ये तैवानला जोडण्याचा चीनचा प्रयत्न आणि रशिया आणि अमेरिका यांच्यातील थेट संघर्ष यांचा समावेश आहे. जो अद्याप झालेला नाही. २०२६ मध्ये या शक्ती एकमेकांशी भिडतील, ज्यामुळे आपत्तीचे चित्र निर्माण होईल, अशी भविष्यवाणी बाबा वांगा यांनी केली आहे.
बाबा वांगा यांनी भाकीत केलं की, २०२६ पर्यंत मनुष्य हा गुलाम झालेले असेल. तर कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे नियंत्रित होऊ. तंत्रज्ञानामुळे आपले जीवन बदलेल आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्या जीवनाचा ताबा घेईल. सध्या, आपण त्यावर नियंत्रण ठेवतो, परंतु ती आपल्यावर नियंत्रण ठेवण्यास सुरुवात करेल. शिवाय, २०२७ पर्यंत, एक नवीन रोग किंवा जैविक प्रयोग उदयास येईल, ज्यामुळे मानवांना अतिमानवासारखे वाटेल. शिवाय, जग रासायनिक आणि जैविक युद्धातही उतरू शकते, अशी भविष्यवाणी बाबा वांगा यांनी केली आहे.