फोटो सौजन्य- pinterest
बाबा वेंगा त्यांच्या भविष्यवाण्यांसाठी भारतासह जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यांनी 2025 सालामध्ये युद्ध, राजकीय उलथापालथ, हिंसाचार आणि जाळपोळ याबद्दल अनेक भाकिते केली होती, जी सर्व खरी ठरली आहेत. त्यांनी वर्षाच्या शेवटच्या 3 महिन्यातील म्हणजेच ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरबद्दल काही भाकीत करण्यात आलेली आहेत. या तीन महिन्यांच्या भविष्यवाण्यांवरून असे दिसून येते की, 4 राशीच्या लोकांचे नशीब चमकणार आहे. तसेच या राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद, समृद्धी आणि प्रगती घेऊन येणार आहे. बाबा वेंगाच्या म्हणण्यानुसार पुढील 3 महिन्यात या राशीच्या लोकांना फायदा होणार आहेत. कोणत्या आहेत त्या राशी, जाणून घ्या
वृषभ राशीच्या लोकांची शेवटच्या 3 महिन्यात लक्षणीय प्रगती होताना दिसून येईल. यावेळी तुमच्या सर्व इच्छा एकापाठोपाठ एक पूर्ण होतील. त्याचसोबतच या राशीच्या लोकांचा समाजात आदर आणि सन्मान वाढेल. तसेच दीर्घकाळापासून घेतलेल्या मेहनतीचे अधिक फळ मिळेल. तुमच्या समस्या सोडवल्या जातील.
मिथुन राशीच्या लोकांसाठी पुढील तीन महिने खूप शुभ राहणार आहे. जे लोक बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात आहे त्यांची इच्छा या काळात पूर्ण होऊ शकते. त्यासोबतच आरोग्याच्या समस्या कमी होण्यास मदत होते. कुटुंबातील वादही संपतील. जोडीदारासोबत असलेले मतभेदही दूर होतील आणि तुमचे नाते मजबूत होईल. या काळात तुमची प्रगती होईल आणि संपत्तीमध्ये वाढ होईल. तुम्ही घेतलेल्या मेहनतीमुळे आर्थिक लाभ होऊ शकतो.
कन्या राशीच्या लोकांसाठी हे 3 महिने खूप फायदेशीर राहणार आहे. या काळात पैशांच्या समस्या दूर होतील आणि आर्थिक परिस्थिती चांगली राहील. जर तुम्ही बऱ्याच काळापासून मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. पालकांचे आरोग्य चांगले राहील आणि कुटुंबातील सदस्यांशी संबंध दृढ होतील. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्याची चांगली प्रगती होईल आणि त्यासोबतच मालमत्ता देखील खरेदी करु शकता.
ज्या लोकांचा शनिच्या कुंभ राशीमध्ये जन्म झाला आहे त्यांच्यासाठी ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर हे तीन महिने खूप अनुकूल राहणार आहे. या महिन्यात तुमच्या आनंदामध्ये वाढ होताना दिसून येईल. तुमच्या राशीमध्ये सध्या शनिच्या साडेसातीचा तिसरा टप्पा सुरू असल्याने तुमच्यावरील शनिचा अशुभ प्रभाव देखील कमी होईल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना करिअरच्या नवीन संधी मिळतील. या काळात तुमची अपूर्ण कामे पूर्ण होतील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)