Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Food Price Index: ग्राहकांना दिलासा! सलग तिसऱ्या महिन्यात जागतिक खाद्य किमती कोसळल्या..; पण धान्य मात्र महाग

जागतिक चलनवाढीच्या दबावादरम्यान, नोव्हेंबर महिना ग्राहकांसाठी दिलासा देणारा ठरला. एफएओच्या मते, जागतिक अन्नधान्याच्च्या किमती सलग तिसऱ्या महिन्यात घसरल्या. दूध, तेल, साखर आणि मांस यासारख्या प्रमुख वस्तू स्वस्त झाल्या आहे

  • By Priti Hingane
Updated On: Dec 08, 2025 | 12:22 PM
ग्राहकांना दिलासा! सलग तिसऱ्या महिन्यात जागतिक खाद्य किमती कोसळल्या..; पण धान्य मात्र महाग

ग्राहकांना दिलासा! सलग तिसऱ्या महिन्यात जागतिक खाद्य किमती कोसळल्या..; पण धान्य मात्र महाग

Follow Us
Close
Follow Us:
  • जागतिक खाद्यपदार्थांच्या किमतीतही घट
  • दूध, साखर आणि तेल झाले स्वस्त
  • ज्वारी-बाजरीसोबत सोयाबीनच्या किमतीही वाढल्या
 

Food Price Index: जागतिक चलनवाढीच्या दबावादरम्यान, नोव्हेंबर महिना ग्राहकांसाठी दिलासा देणारा ठरला. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या (एफएओ) मते, जागतिक अन्नधान्याच्च्या किमती सलग तिसऱ्या महिन्यात घसरल्या. दूध, तेल, साखर आणि मांस यासारख्या प्रमुख वस्तू स्वस्त झाल्या, तर धान्य गटात वाढ झाली असून सोयबिनच्या देखील किंमती वाढल्या आहेत. एफएओचा जागतिक अन्न किंमत निर्देशांक नोव्हेंबरमध्ये १२५.१ अंकांवर होता, जो ऑक्टोबर २०२५ च्या तुलनेत १.२ टक्के कमी आहे आणि मार्च २०२२ च्या त्याच्या विक्रमी उच्चांकापेक्षा जवळजवळ २२ टक्के कमी आहे.

हेही वाचा : आधारची फोटोकॉपी आता अजिबात चालणार नाही, हॉटेलपासून इव्हेंटपर्यंत; सगळीकडे QR Scan ने होणार ओळख

एफएओच्या सप्टेंबर २०२५ च्या ताज्या अहवालात असे दिसून आले आहे की, वाढत्या जागतिक महागाईच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबरमध्ये अन्नधान्याच्या चर किमतींमध्ये लक्षणीय घट झाली. ऑक्टोबरच्या तुलनेत निर्देशांक घसरला आणि वार्षिक आधारावर, नोव्हेंबर २०२४ च्या तुलनेत २.१ टक्के कमी होता. पाम, सूर्यफूल आणि रेपसीड तेलाच्या किमतीत घट झाली, तर ब्राझीलमध्ये बायोडिझेलची मागणी वाढल्यामुळे सोयाबीन तेल थोडे महाग झाले. मलेशियामध्ये अपेक्षेपेक्षा जास्त पाम तेलाचे उत्पादन झाल्याचा परिणाम दिसतो.

दुसरीकडे, गहू, मक्याच्या दरात वाढ झाली आहे. नोव्हेंबरमध्ये धान्य किमत निर्देशांक १०५.५ व होता, जो ऑक्टोबरच्या तुलनेत १.८% आणि एकूण १.३ वाढला. तथापि, तो गेल्या वर्षीपेक्षा ५.३% कमी आहे जागतिक गव्हाच्या किमती २.५% वाढल्या.

हेही वाचा : Russian Crude Import: ट्रॅम्प यांचे रशियन कंपन्यांवर निर्बंध, एमआरपीएल-एचएमईएलचा मोठा निर्णय..; रशियन तेल खरेदी थांबवली

ब्राझीलमध् मजबूत मागणी आणि अर्जेंटिना आणि ब्राझीलमध्ये पावसामुळे पुरवठा खंडित झाल्यामुळे मक्याच्या किमती वाढल्या, बाजारी आणि ज्वारीच्या किमतीही वाढल्या, ज्याचा थेट परिणाम जागतिक सोयाबीनच्या किमती वाढण्यावर झाला.

या वाढीला अनेक कारणे आहेत. डॉलर-रुपया यांच्यातील चढ-उतार, अमेरिकेने लावलेले अतिरिक्त टॅरिफ आणि जागतिक स्तरावरील व्यापारावर होणारे बदल या सगळ्यांचा खाद्य किंमतीवर परिणाम झाला आहे. तसेच, आयात-निर्यात यांमधील घट देखील खाद्य किंमतीवर परिणाम केल्याचे दिसून येत आहे. यावर सरकार काय उपाययोजना करते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मात्र यामुळे ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे तर काही प्रमाणात त्यांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे.

Web Title: World food becomes healthy milk sugar and oil major decline

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2025 | 12:22 PM

Topics:  

  • Brazil
  • Business News

संबंधित बातम्या

Toll Plaza वर आता रोख रक्कमला लागला ‘ब्रेक’, 1 एप्रिलपासून नवा नियम लागू; 3 गोष्टींपासून होणार सुटका
1

Toll Plaza वर आता रोख रक्कमला लागला ‘ब्रेक’, 1 एप्रिलपासून नवा नियम लागू; 3 गोष्टींपासून होणार सुटका

EPFO: आता डोक्याला ताप नाही! PF मधून पैसे काढणं झालं सोपं, काय आहे सरकारची नवीन तरतूद?
2

EPFO: आता डोक्याला ताप नाही! PF मधून पैसे काढणं झालं सोपं, काय आहे सरकारची नवीन तरतूद?

Stock Market : मुकेश अंबानींचा ‘हा’ शेअर खरेदी करणं ठरेल शहाणपणाचं, अचानक होऊ शकते तेजी, तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
3

Stock Market : मुकेश अंबानींचा ‘हा’ शेअर खरेदी करणं ठरेल शहाणपणाचं, अचानक होऊ शकते तेजी, तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?

Blinkit, Instamart, Zepto..सगळेच तोट्यात; किराणा स्टोअर्सही होत आहेत बंद, मग फायदा नक्की कोणाला?
4

Blinkit, Instamart, Zepto..सगळेच तोट्यात; किराणा स्टोअर्सही होत आहेत बंद, मग फायदा नक्की कोणाला?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.