
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
UPI AutoPay : UPI AutoPay मध्ये मोठा बदल! ग्राहकांना मिळणार हा मोठा फायदा? जाणून घ्या सविस्तर
कंपनीने हा अचानक निर्णय का घेतला ? या प्रश्नाचं उत्तर कंपनीच्या हैदराबादमधील आउटलेटमध्ये मिळतं. त्यांनी आपली ‘कस्टमर डिलाईट’ कामकाज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे, हे कामकाज केवळ गुरुग्राममधील एकाच ठिकाणाहून चालणार असल्याच कंपनीने स्पष्ट केलं. कंपनीच्या ‘कस्टमर डिलाईट’ मधील कार्यपद्धतीचा आणि लागणाऱ्या मनुष्यबळाच्या गरजांचा विचार करण्यात आला आणि यासगळ्याचा आढावा घेतल्यानंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला. इथे हे स्पष्ट करणं गरजेचं आहे की कर्मचाऱ्यांच्या कामगिरीशी संबंधित कोणत्याही त्रुटींमुळे ही कपात करण्यात आलेली नाही, तर हा निर्णय पूर्णपणे व्यावसायिक कारणांमुळे घेण्यात आला असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
कंपनीशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सहा महिन्यांत झोमॅटोच्या customer support प्रणालीत मोठा बदल करण्यात आला आहे. आता हे सर्व बहुतांश कामकाज बाह्य तज्ज्ञ कंपन्यांमार्फत हाताळले जात आहे. परिणामी, कंपनीने आपली in-house कामे गुरुग्राममधील एकाच टीमकडे एकत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. ही टीम कंपनीच्या product, तंत्रज्ञान, डेटा आणि व्यवसाय विभागांच्या टीम्ससोबत अगदी जवळून काम करणार अशी योजना कंपनीने योजली आहे.
कंपनीने ही कपात केलेल्या सगळ्या 240 कर्मचाऱ्यांना चार महिन्याच्या वेतनाइतका ‘सेव्हरन्स पॅकेज’ म्हणजेच नोकरी सुटताना मिळणारे आर्थिक पॅकेज देणार आहे. या पॅकेजमध्ये ‘नोटीस कालावधी’चा पगार तसेच एकदाच दिली जाणारी अतिरिक्त रक्कम यांचा समावेश असणार आहे. याव्यतिरिक्त, या कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय विमा संरक्षण आणि समुपदेशन सेवा ३१ मार्च २०२७ पर्यंत सुरू राहिल. नवीन नोकरीच्या संधी शोधण्यात मदत करण्यासाठी कंपनी त्यांना ‘आउटप्लेसमेंट’ची सुविधाही उपलब्ध करून देणार आहे. तसेच, कंपनीने दिलेले लॅपटॉप आणि इअरफोन्स कर्मचाऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक वापरासाठी दिले जातील. असा प्रकारे तजबिज करुन कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे.