फोटो सौजन्य - Social Media
या आठवड्यात शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल जाहिर केला होता. दहावीचा निकाल जाहीर होताच पात्र उमेदवारांना घाई लागते ती अकरावी प्रवेशाची! राज्यात अकरावी प्रवेशाला सुरुवात झाली आहे. मुळात, यंदाचे प्रवेश बहुतेकरित्या ऑनलाईन स्वरूपात स्वीकारले जाणार आहेत. शासनाने कनिष्ठ महाविद्यालयांना नोंदणी करण्यासाठी सांगितले होते. मुळात, त्याला कनिष्ठ महाविद्यालयांनी उत्तम प्रतिसाद देत कालपर्यंत दिलेलूया मुदतीचे पालन करत पहिला टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशाला वेग आले आहे. लवकरच या प्रक्रियेतील दुसरा टप्पा सुरु केला जाणार आहे. कनिष्ठ महाविद्यालय नोंदणीचा दुसरा टप्पा १९ मेपासून सुरु करण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात ११ वी मध्ये प्रवेश घेऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचा ध्वनी क्रमांक किंवा इमेलच्या आधारे OTP मिळवत स्वतःला रजिस्टर करायचे होते. अनेक विद्यार्थ्यांना याचे पालन करत मुदतीअगोदर ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. १९ मेपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांना त्याचे आवडते महाविद्यालय निवडता येणार आहेत. मुळात, सर्व विद्यार्थ्यांना स्वतःला रजिस्टर करून आपल्या पसंतीचे महाविद्यालयांची निवड करणे अनिवार्य आहे. तसेच राज्यातील प्रत्येक महाविद्यालयांनी स्वतःची नोंद करून घेणे अनिवार्य आहे.
विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्वाची सूचना म्हणजे कनिष्ठ महाविद्यालयाची निवड करताना विद्यार्थ्याने मिळवलेले गुण, त्याच्या अंगी असलेले कला आणि आपल्या घरापासून महाविद्यालयाचे अंतर लक्षात घ्यावे आणि महाविद्यालयांची निवड करावी. निवड करताना पसंतीचे महाविद्यालय अनुक्रमाने वरती ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तेथे संधी मिळण्याचे शक्यता वाढेल.
विद्यार्थ्यांनी या सूचनेची नोंद घ्यावी की प्रवेश ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन, काही अधिकृत दस्तऐवजांची गरज भासणार आहे. या दस्तऐवजांमध्ये रहिवाशी दाखला तसेच शाळा सोडण्याचा दाखला आणि इतर काही महत्वाच्या दस्तऐवजांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील २११ विद्यार्थ्यांनी यंदा पैकीच्या पैकी गुण मिळवले असून राज्यभरात त्यांचे अभिनंदन केले जात आहे. अधोजिक माहितीसाठी शिक्षण बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर लासखा ठेवावे.