सोलापूर जिल्ह्यातील तरुणांना भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. मुळात, भरती सुरु होऊन फार वेळ झाला आहे. अंतिम तारीख जवळ असल्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकर अर्ज करावे असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालय, सोलापूरने विविध पदांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू केली असून, यात भूलतज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, फिजियोलॉजिस्ट, अस्थिरोग तज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी (MBBS) अशा पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवार १६ मे २०२५ पर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरतीसाठी थेट मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार असून, पात्र उमेदवारांची मुलाखत २० मे २०२५ रोजी जिल्हा रुग्णालय, गुरुनानक चौक, सोलापूर येथे होणार आहे.
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमध्ये केली जाणार आहे. जिल्हा रुग्णालयाच्या अधिकृत सूचनेनुसार, या भरतीसाठी उमेदवारांकडे आवश्यक शैक्षणिक पात्रता असणे बंधनकारक आहे. वैद्यकीय अधिकारी पदासाठी MBBS किंवा BAMS पदवी आवश्यक आहे, तर तज्ञ पदांसाठी संबंधित शाखेतील विशेष पदव्युत्तर शिक्षण अनिवार्य आहे. या पदांसाठी अनुभवास प्राधान्य दिले जाणार असून, उमेदवारांची पात्रता आणि मुलाखतीतील कामगिरी यावर निवड ठरणार आहे. अर्ज सादर करताना आवश्यक कागदपत्रांची छायांकित प्रत, ओळखपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्र, नोंदणी प्रमाणपत्र इत्यादी जोडणे गरजेचे आहे.
उमेदवारांनी आपला अर्ज खालील पत्त्यावर १६ मे २०२५ पर्यंत पाठवावा: जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, सोलापूर, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सोलापूर. अर्ज फक्त ऑफलाइन स्वीकारले जातील, ईमेल किंवा ऑनलाइन अर्जाची सुविधा नाही. मुलाखतीसाठी उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह वेळेवर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
ही भरती प्रक्रिया जिल्हा प्रशासनाच्या अधिपत्याखाली पार पडणार आहे आणि त्यामुळे पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. ज्या उमेदवारांना सोलापूर जिल्ह्यात वैद्यकीय सेवेत काम करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. या भरतीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या आरोग्य सेवेत गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी वेळ न दवडता अर्ज करून मुलाखतीसाठी तयारी करावी.