Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI study app: कोडिंग न येताही विद्यार्थिनीने बनवले AI स्टडी ॲप, अवघ्या ३ दिवसांत कमावले लाखो रुपये

AI study app China : शांघायमधील १३ वर्षांच्या झू शुहानने कोडिंग न शिकता AI च्या मदतीने ‘जाई चांग’ हे स्टडी ॲप तयार केले. तिने अवघ्या ३ दिवसांत २.५ लाखांची कमाई केली आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 02, 2026 | 11:36 AM
ai study

ai study

Follow Us
Follow Us:

AI study app China : आजच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स फक्त मोठ्या इंजिनिअर्स किंवा प्रोग्रामर्सपुरता मर्यादित राहिलेला नाही. याचे सर्वात मोठे उदाहरण चीनमधील १३ वर्षांची विद्यार्थिनी झू शुहान (Zhu Shuhan) आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिला अजिबात कोडिंग येत नव्हती, तरीही तिने AI च्या मदतीने एक असे स्टडी ॲप तयार केले, ज्याने लॉन्च झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत सुमारे २.५ लाख रुपयांची कमाई केली.

अभ्यासादरम्यान आलेल्या अडचणीतून सुचली ॲपची कल्पना

झू शुहान शांघायमधील एका ज्युनिअर सेकंदरी शाळेत शिकते. आई-वडील कामात व्यस्त असताना अनेक मुले अभ्यासाच्या वेळी मोबाईल वापरतात किंवा आपली जागा सोडतात, हे तिने अनुभवले. स्वतः तिच्यासोबतही असेच होत होते. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी तिने एक असे AI ॲप बनवण्याचा निर्णय घेतला, जे मुलांच्या अभ्यासादरम्यान एका डिजिटल पालकाप्रमाणे लक्ष ठेवेल.

झूने आपल्या ॲपचे नाव ‘जाई चांग’ (Zai Chang) ठेवले आहे, ज्याचा अर्थ “जागीच उपस्थित” असा होतो. या ॲपमध्ये पालक त्यांचा एक फोटो अपलोड करतात. त्यानंतर AI त्या फोटोनुसार पालकांचे एक व्हर्च्युअल रूप तयार करतो. मूल अभ्यास करत असताना कॅमेरा त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवतो. जर मूल मोबाईल वापरू लागले किंवा जागेवरून उठले, तर AI त्याच व्हर्च्युअल पालकांच्या आवाजात त्याला अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याची आठवण करून देतो. अभ्यास संपल्यानंतर ॲप मुलाच्या एकाग्रतेचा आणि अभ्यास केलेल्या वेळेचा अहवाल देखील तयार करतो.

फक्त ३ दिवसांत मिळाले ९० ऑर्डर्स

हे ॲप ऑगस्टमध्ये हांगझोउ येथे आयोजित राष्ट्रीय AI उत्पादन मार्केटिंग स्पर्धेत सादर करण्यात आले. या स्पर्धेत ५० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. येथे विजेत्यांची निवड तांत्रिक तपासणीच्या आधारावर नाही, तर त्यांच्या AI उत्पादनाच्या विक्रीच्या आधारावर करण्यात आली.

झूच्या ॲपला तीन दिवसांत ९० ऑर्डर्स मिळाले आणि त्यातून सुमारे १८,००० युआन म्हणजेच जवळपास २.५ लाख रुपयांची विक्री झाली. या शानदार कामगिरीसाठी तिला स्पर्धेत तिसरे स्थान मिळाले आणि सुमारे ७० हजार रुपयांचे रोख पारितोषिकही मिळाले.

IBPS RRB Recruitment 2026: बँकिंग क्षेत्रात १३,४४१ रिक्त पदांसाठी अधिसूचना जाहीर, अर्ज कसा करावा? जाणून घ्या

AI ला आयडिया सांगितली आणि तयार झाले संपूर्ण ॲप

सर्वात रंजक गोष्ट म्हणजे झू शुहानने स्वतः कोणतेही प्रोग्रामिंग केलेले नाही. तिने सांगितले की, तिने आपली कल्पना एका मोठ्या AI लँग्वेज मॉडेलला समजावून सांगितली. AI ने त्याच आधारावर ॲपचा कोड तयार करण्यास मदत केली. डिझाईनपासून मुख्य फीचर्स तयार करण्यापर्यंतचे संपूर्ण काम फक्त ३ ते ४ दिवसांत पूर्ण झाले. झूचे म्हणणे आहे की, या अनुभवावरून तिला समजले की जर एखाद्याकडे चांगली कल्पना असेल, तर AI ती प्रत्यक्षात आणण्यासाठी मोठी मदत करू शकते.

आता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे ॲप

झू शुहानचे म्हणणे आहे की, लोकांची आवड अशीच कायम राहिली, तर ती हे ॲप अधिक चांगले बनवेल आणि कमी किंमतीत जास्तीत जास्त लोकांसाठी उपलब्ध करून देईल. AI चा योग्य वापर मुलांची अभ्यास करण्याची पद्धत सोपी आणि शिस्तबद्ध बनवू शकतो, असा तिचा विश्वास आहे.

NEET PG Aspirant Emotional Story: “त्यांना परत यावच…” नीट पीजी देणाऱ्या तन्वीची मन हेलावून टाकणारी कहाणी एकदा वाचाच

AI च्या काळात मुलांचा नवीन विचार ठरतोय प्रेरणादायी

१३ व्या वर्षी कोडिंग न शिकता लाखो रुपये कमावणारी झू शुहानची ही गोष्ट हे दाखवून देते की, AI च्या काळात केवळ तांत्रिक ज्ञानच नाही, तर एक चांगली कल्पना देखील मोठी यश मिळवून देऊ शकते. तिची ही कामगिरी जगभरातील विद्यार्थ्यांसाठी एक नवी प्रेरणा ठरत आहे.

Web Title: 13 year old girl zhu shuhan ai study app success

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 11:36 AM

Topics:  

  • ai
  • study

संबंधित बातम्या

ZP School study tour Hyderabad: राष्ट्रीय आविष्कार अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या ‘या’ विद्यार्थ्यांची निवड
1

ZP School study tour Hyderabad: राष्ट्रीय आविष्कार अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या ‘या’ विद्यार्थ्यांची निवड

CAT 2026 ची तयारी AI द्वारे कशी करावी? जाणून घ्या अभ्यासाच्या स्मार्ट ट्रिक्स!
2

CAT 2026 ची तयारी AI द्वारे कशी करावी? जाणून घ्या अभ्यासाच्या स्मार्ट ट्रिक्स!

Google Search AI Mode: टीव्ही मालिकेत AIची एंट्री; ‘गंगा माई की बेटियां’च्या कथेत दिसणार Google Search AI Mode
3

Google Search AI Mode: टीव्ही मालिकेत AIची एंट्री; ‘गंगा माई की बेटियां’च्या कथेत दिसणार Google Search AI Mode

Samsung AI Smartphone: Samsung चा नवा Galaxy S26 FE बाजारात; स्लिम डिझाइनसह AI फीचर्सची मेजवानी
4

Samsung AI Smartphone: Samsung चा नवा Galaxy S26 FE बाजारात; स्लिम डिझाइनसह AI फीचर्सची मेजवानी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.