
OPPO ColorOS 17 Launched (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
OPPO नेहमीच आपल्या OS च्या स्मूथनेसवर काम करते. आधी ColorOS 15 आणि 16 मध्ये पण त्यांनी अॅनिमेशनवर भर दिला होता. आता ColorOS 17 मध्ये त्यांनी Living Flow Design नावाची नवीन गोष्ट आणली आहे.याचा साधा अर्थ आहे, फोनला हात लावल्यावर सगळे एकदम मऊ आणि नैसर्गिक वाटेल. यात तीन मुख्य गोष्टी आहेत.
Luminous Effect– स्क्रीनवरचा लूक थोडा चमकदार, थोडा ट्रान्सपरंट होईल. बघायला भारी वाटेल आणि डोळ्यांना त्रास पण होणार नाही.
Fluid Motion– एका अॅपमधून दुसऱ्या अॅपमध्ये जाताना, किंवा काही ओपन- क्लोज करताना मध्ये अडकणे किंवा तुकडे पडणे होणार नाही. सगळे पाण्यासारखे फ्लो होईल.
Flexible Feedback– तुम्ही जेव्हा बटणावर क्लिक करता तेव्हा ते खरोखर दाबल्यासारखे आत जाईल आणि परत येईल. त्यामुळे फोन वापरताना खरे बटण दाबल्याची फील येईल.
कंपनीने आतमध्ये पूर्ण इंजिनच बदलले असून त्याला Unified Rendering Architecture असे नाव दिले आहे. त्यामुळे फोनवरचा भार खूप कमी होईल. जुन्या व्हर्जनपेक्षा रेंडरिंगचे काम 30% कमी झाले आहे आणि RAM चा वापर 25% कमी लागतो. याचा फायदा म्हणजे तुम्ही मोठा गेम खेळत असलात तरी फोन गरम होणार नाही किंवा हँग होणार नाही.
Laminar Flow Engine मुळे तर स्पीड आणखी वाढला आहे. अॅप उघडणे 55% जास्त स्टेबल झाले आहे. गॅलरी पहिल्यांदा उघडली की फोटो 50% जास्त वेगाने दिसतील. तुम्ही 25% जास्त अॅप एकाच वेळी बॅकग्राउंडला चालू ठेवू शकता. याचाअर्थ तुम्ही व्हाट्सअप, इंस्टा, युट्युब सगळे चालू ठेवले तरी फोन स्लो होणार नाही. OPPO ने एक टेस्ट पण केली आहे. फोन 6 वर्षे वापरला आणि मेमरी 90% भरली तरी फोनचा स्मूथनेस 90% टिकून राहतो. दोन-तीन वर्षांनी फोन स्लो होतो हा टेन्शन आता नाही.
यावेळी सगळ्यात मोठा बदल AI मध्ये केला. AI Mind Pilot मध्ये आता Agent Mode आला आहे. हा तुमच्या फोनमधले फोटो, फाईल्स स्वतः शोधेल आणि लावून देईल. समजा तुमच्या फोनमध्ये ट्रिपचे फोटो इकडे-तिकडे पडले आहेत, तो ते एका अल्बममध्ये लावेल. त्यांना तारखेनुसार नाव देईल आणि त्या फोटोंवरून तुमचा ट्रिप प्लॅन किंवा एखादे वेबपेज पण बनवून देईल. एखादा फोटो घेऊन त्याचे vlog चे कव्हर पण बनवेल.
फोटो एडिट करण्यासाठी AI Photo Agent आला आहे. तुम्हाला एखाद्या दुसऱ्या फोटोसारखे कलर हवे असतील तर तो फोटो दाखवा, हा AI तुमच्या फोटोला तसाच कलर देईल. तुम्ही फक्त लिहा “बॅकग्राउंड ब्लर कर” तर तो करून देईल. तो स्वतःहून पण सुचवेल की या फोटोत काय चांगले दिसेल.
Nothing Smart Glasses: चष्माच बनेल AI असिस्टंट! ChatGPT सोबत ‘ही’ कंपनी आणतेय स्मार्ट ग्लासेस
AI Mind Space आता जास्त हुशार झाले आहे. त्यामध्ये त्यात PDF, डॉक्युमेंट किंवा युट्युब व्हिडिओची लिंक पण सेव्ह करू शकता. तो त्यातले सगळे वाचून समजून घेईल आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा शोधून देईल. तुम्ही फिरायच्या जागा सेव्ह केल्या असतील तर तो त्यावरून पूर्ण ट्रिपचा नकाशा बनवून देईल.
AI Mind Suggest तुमचा पर्सनल असिस्टंट सारखा काम करेल. सकाळी उठल्यावर दिवसाचे अपडेट देईल, तुमची फ्लाईट असेल तर त्याचे डिटेल्स दाखवेल, हेडफोन लावताच गाणी लावायला सुचवेल.आणि OSee नावाचे एक भारी फीचर आहे. तुम्ही कॅमेरा एखाद्या गोष्टीवर धरला की तो लगेच ओळखेल. ती वस्तू काय आहे, त्याबद्दल माहिती, त्यात किती कॅलरी आहेत, ते स्कॅन करणे किंवा ट्रान्सलेट करणे सगळे एका क्लिकवर होईल.
AI वापरताना डेटा चोरी होण्याची भीती असते. पण OPPO ने Private Computing Cloud दिले आहे. तुमचा डेटा एंड-टू-एंड एन्क्रिप्ट राहील. आता त्यात पोस्ट-क्वांटम सिक्युरिटी पण जोडली आहे, त्यामुळे भविष्यातले हॅकर्स पण डेटा चोरू शकणार नाहीत.एक नवीन Transparency Report पण येणार आहे. तुम्ही कोणते AI फीचर कधी वापरले याची सगळी माहिती त्यात दिसेल.आणि सगळ्यात महत्वाचे – AI Call Guard. आजकाल AI आवाजाने फ्रॉड कॉल येतात. हा गार्ड कॉल चालू असतानाच आवाज खरा आहे की AI ने बनवला आहे हे ओळखेल आणि तुम्हाला लगेच सावध करेल.थोडक्यात, ColorOS 17 हा फक्त अपडेट नाही, तर फोन वापरण्याचा पूर्ण अनुभव बदलणारा आहे.
Ans: नवीन डिझाइन, AI फीचर्स, सुधारित परफॉर्मन्स आणि सुरक्षा सुविधा आहेत.
Ans: सर्वप्रथम OPPO Find X10 सीरिजमध्ये मिळेल.
Ans: कॉलमधील आवाज AI ने तयार केला आहे का, हे ओळखून सावध करते.