फोटो सौजन्य - Social Media
भारतीय डाक विभागामार्फत अधीक्षक डाकघर, नवी मुंबई विभाग यांच्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरतीत एकूण २१ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी ०३ मार्च २०२५ पर्यंत किंवा त्यापूर्वी https://indiapostgdsonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे, असे आवाहन नवी मुंबई विभाग, वाशीचे वरिष्ठ अधीक्षक डाकघर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. चला तर मग या भरतीविषयक अधिक माहिती जाणून घ्या.
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी फक्त ऑनलाईन पद्धतीचा वापर करावा लागेल. कोणत्याही अन्य माध्यमातून पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला जाऊन भेट द्यावी. तसेच अर्ज कारण्यागोदर ऑनलाईन जाहीर करण्यात आलेला सर्व तपशील वाचून घ्या. तसेच, उमेदवारांनी अधिसूचनेमध्ये दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आवश्यक ते शुल्क भरावे. अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे, वैयक्तिक माहिती आणि संपर्क क्रमांक अचूक भरावेत, जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही.
भारतीय डाक विभाग उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा फोन कॉल करत नाही. भरतीशी संबंधित सर्व पत्रव्यवहार अधिकृत प्राधिकरणाद्वारेच केला जातो. त्यामुळे उमेदवारांनी त्यांचा नोंदणी क्रमांक, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी इतरांसमोर उघड करू नये आणि कोणत्याही अनधिकृत फोन कॉल्सपासून सावध राहावे. भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती आणि अटी-शर्ती जाणून घेण्यासाठी www.indiapostgdsonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी.
ग्रामीण डाक सेवक ही महत्त्वाची सरकारी नोकरीची संधी असून, इच्छुक उमेदवारांनी योग्य वेळेत अर्ज करून या भरती प्रक्रियेत सहभागी व्हावे. ऑनलाईन अर्ज करताना सर्व नियम व अटींची पूर्णपणे पडताळणी करावी, तसेच भरती प्रक्रियेबद्दल कोणत्याही शंका असल्यास अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार योग्य ती पडताळणी करावी. भारतीय पोस्टात काम करू पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही फार महत्वाची संधी आहे. नवी मुंबई, मुंबई तसेच ठाणे आणि आसपासच्या परिसरातील रोजगाराच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांनी या भरतीचा नक्कीच फायदा घेण्यात यावा. महत्वाची बाब म्हणजे अर्ज करण्याअगोदर जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेमधील सर्व शैक्षणिक आणि वय तसेच अनुभव संदर्भात असलेल्या पात्रता निकष आणि इतर नियमांचा आढावा घ्या.