Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लालकिल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी घोषणा! येत्या 5 वर्षात वैद्यकीय शिक्षणाच्या 75 हजार जागा वाढविणार

पतंप्रधान नरेंद्र मोदी यांन आज लालकिल्यावरुन देशाला संबोधित करताना तरुणांसाठ महत्वाच्या घोषणा केल्या त्यामध्ये वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी येत्या 5 वर्षात वैद्यकीय महाविद्यालयात 75 हजार जागा वाढविण्याची घोषणा त्यांनी केली.

  • By नारायण परब
Updated On: Aug 15, 2024 | 03:05 PM
फोटो सौजन्य- ANI

फोटो सौजन्य- ANI

Follow Us
Close
Follow Us:

आज आपण सर्व 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. दिल्लीच्या लालकिल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ध्वजारोहण करत स्वातंत्र्यदिनानिमित्त देशाला संबोधित केले. या भाषणामध्ये त्यांनी अनेक महत्वाच्या विषयांवर प्रकाश टाकला. त्यांनी विकसित भारत बनवण्याच्या आपल्या संकल्पाचा पुनरुच्चार करताना त्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. या घोषणांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी येत्या 5 वर्षात वैद्यकीय महाविद्यालयात 75 हजार जागा वाढविण्याची घोषणा त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणामध्ये पुढे सांगितले की, येत्या 10 वर्षांत एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या जागा 1 लाखाने वाढवल्या जातील.

सध्या देशातील एमबीबीएसच्या जागा

सध्या देशातील सरकारी आणि निमसरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसच्या 106333 जागा आहेत. यापैकी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 55648 तर खाजगी महाविद्यालयात 50685 जागा आहेत. सरकारने गेल्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये या जागां वाढविल्या असून त्यामध्ये 5150 नवीन जागांची भर टाकली होती. देशामध्ये डॉक्टरांची संख्या वाढत असली तरी ती लोकसंख्येनुसार कमी पडत आहे. शहरी भागामध्ये डॉक्टरांची संख्या बरी असली तरी ग्रामीण भागांतील डॉक्टरांची संख्या आणि उपलब्धतता हा चिंतेचा विषय आहे. सरकारकडून केले जाणारे वैद्यकीय शिक्षणांच्या जागावाढीचे प्रयत्न हे सर्वसामांन्यांकरिता अत्यावश्यक आहे.

संशोधन आणि नवोपक्रमासाठी 1 लाख कोटी रुपये

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, युवकांसाठी इंटर्नशिपवर भर दिला जात आहे. जेणेकरून देशातील तरुण कुशल मनुष्यबळाच्या जागतिक रोजगार बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करू शकतील. ते पुढे म्हणाले की, विज्ञान आणि तंत्रज्ञान चांद्रयानच्या यशानंतर संस्थांमध्ये आशा निर्माण झाली आहे.आम्ही राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठानची स्थापना केली आहे. अर्थसंकल्पात आम्ही संशोधन आणि इनोव्हेशनसाठी 1 लाख कोटी रुपये दिले आहेत, जेणेकरुन तरुणांच्या कल्पनांना अमलात आणत्या येतील.

तसेच तरुणांना उद्देशून पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘आज जगाचा देशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. 10 वर्षांत तरुणांच्या चेतनेमध्ये नवीन ऊर्जा संचारली आहे. रोजगाराच्या असंख्य नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. नवीन संधी निर्माण होत आहेत. देशातील तरुणांचा आता हळूहळू पुढे जाण्याचा कोणताही हेतू नाही, देशातील तरुण झेप घेत आहेत. भारतासाठी हा सुवर्णकाळ आहे’.

Web Title: 75 thousand places of medical education will be increased in the next 5 years prime minister narendra modis important announcement from red fort

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2024 | 03:05 PM

Topics:  

  • Independence Day
  • PM Narendra Modi
  • Red Fort

संबंधित बातम्या

भरती प्रक्रिया सुरू करा, अन्यथा…; बेरोजगारीच्या प्रश्नावरुन काँग्रेस आक्रमक
1

भरती प्रक्रिया सुरू करा, अन्यथा…; बेरोजगारीच्या प्रश्नावरुन काँग्रेस आक्रमक

नरेंद्र मोदी अज्ञातवासात जाणार? फडणवीस ठरणार ‘लंबी रेस का घोडा’…; ज्योतिषाच्या भाकिताने खळबळ
2

नरेंद्र मोदी अज्ञातवासात जाणार? फडणवीस ठरणार ‘लंबी रेस का घोडा’…; ज्योतिषाच्या भाकिताने खळबळ

India China Alliance : आता चीननेही भारताच्या हितासाठी जागतिक मंचावर उचलला मोठा झेंडा, 50% करावर थेट विरोध
3

India China Alliance : आता चीननेही भारताच्या हितासाठी जागतिक मंचावर उचलला मोठा झेंडा, 50% करावर थेट विरोध

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी
4

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.