Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वैद्यकीय शिक्षणासाठी ९०० नवीन MBBS जागा मंजूर; केंद्र सरकराचा मोठा निर्णय

राज्यात वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्यसेवा सुधारण्यासाठी केंद्र सरकारने ९०० नवीन एमबीबीएस जागा मंजूर केल्या असून, अकोला शासकीय रुग्णालयात अत्याधुनिक ‘एमआरआय ३ टेस्ला’ मशीन बसवले जाणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 05, 2025 | 08:00 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात लवकरच ‘एमआरआय ३ टेस्ला’ मशीन उपलब्ध होणार आहे. या मशीनच्या खरेदीसाठी २४.९७ कोटी रुपयांची नवीन प्रशासकीय मान्यता मिळाली असून, केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री स्वास्थ्य योजनेअंतर्गत हे मशीन उपलब्ध करून देण्यात येईल. या संदर्भात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात माहिती दिली. विधानसभा सदस्य साजिद पठाण यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, या मशीनच्या खरेदीसाठी औषध महामंडळामार्फत निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र, निविदेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे मशीनच्या खरेदीस विलंब झाला. त्यानंतर हाफकिन महामंडळामार्फत होणारी खरेदी प्रक्रिया बंद करून औषधी व वस्तू खरेदी प्राधिकरण स्थापन करण्यात आले. या नवीन यंत्रणेद्वारे आता मशीन खरेदी केली जाणार आहे.

मुंबई महानगरपालिकेमध्ये परीक्षेत बदल! Secondary Engineer Examची नवीन तारीख कोणती? जाणून घ्या

‘एमआरआय ३ टेस्ला’ मशीन हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असून, यामुळे रुग्णांच्या अचूक निदानास मदत होणार आहे. योग्य निदान झाल्यास उपचार अधिक प्रभावीपणे करता येतील. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) पद्धतीचा अवलंब करून सिटी स्कॅन आणि एमआरआय मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात वैद्यकीय शिक्षणाच्या सोयीसुविधांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात येत आहे. केंद्र सरकारने एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी राज्याला ९०० नवीन जागा मंजूर केल्या आहेत, ज्यामुळे राज्यातील वैद्यकीय शिक्षणाच्या संधी अधिक विस्तारल्या जाणार आहेत. या नव्या जागांमुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालये अधिक सक्षम होतील आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांना डॉक्टर बनण्याची संधी मिळेल. विशेषतः ग्रामीण भागातील वैद्यकीय शिक्षणाला चालना देण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे. नव्याने मंजूर करण्यात आलेली शासकीय वैद्यकीय महाविद्यालये लवकरच सुरू होणार असून, त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर दिला जात आहे.

CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती 2025: ११६१ पदांसाठी संधी; त्वरित करा अर्ज

परभणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासंदर्भातही सध्या निविदा प्रक्रिया सुरू असून, हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. हे महाविद्यालय कार्यान्वित झाल्यानंतर त्या परिसरातील नागरिकांना आरोग्यसेवांचा अधिक चांगला लाभ मिळणार आहे. या चर्चेमध्ये विधानसभा सदस्य हरिष पिंपळे, विजय वडेट्टीवार, डॉ. राहुल पाटील आणि अजय चौधरी यांनी सहभाग घेतला. राज्यातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत असून, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालये अधिक अद्ययावत करण्यासाठी सरकार ठोस पावले उचलत आहे. अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता, वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी नवीन धोरणे, तसेच डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे यासारख्या उपाययोजना करण्यात येत असल्याचेही मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

Web Title: 900 new mbbs seats approved for medical education

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2025 | 08:00 PM

Topics:  

  • medical colleges
  • Medical Hospital

संबंधित बातम्या

महापुराचा फटका! सीईटी सेलने वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेची वाढवली मुदत
1

महापुराचा फटका! सीईटी सेलने वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेची वाढवली मुदत

Medical Seats Increased: केंद्र सरकारची मोठी घोषणा; सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये १० हजारहून अधिक जागा वाढणार
2

Medical Seats Increased: केंद्र सरकारची मोठी घोषणा; सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये १० हजारहून अधिक जागा वाढणार

‘…तर डॉक्टरला दोषी ठरवता येणार नाही,’ महिलेच्या मृत्यूवर सुप्रीम कोर्टाने केली मोठी टिप्पणी
3

‘…तर डॉक्टरला दोषी ठरवता येणार नाही,’ महिलेच्या मृत्यूवर सुप्रीम कोर्टाने केली मोठी टिप्पणी

लवकर अर्ज करा! IIM मुंबई भरतीसाठी अंतिम मुदत; तारखेला मुकाल तर संधी गमवाल
4

लवकर अर्ज करा! IIM मुंबई भरतीसाठी अंतिम मुदत; तारखेला मुकाल तर संधी गमवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.