फोटो सौजन्य - Social Media
बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरतीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. या भरतीसाठी अनेक इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार होते. विविध विभागातील विविध पदांचा विचार या भरतीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या भरतीच्या प्रक्रियेत स्थापत्य विभागातील कनिष्ठ अभियंता, यांत्रिकी व विद्युत विभागातील कनिष्ठ अभियंता तसेच दुय्यम अभियंता पदांचा समावेश आहे. तसेचज स्थापत्य विभागातील दुय्यम अभियंता पदासाठी उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. मुळात, या भरतीच्या माध्यमातून ६९० रिक्त पदांसाठी भरतीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. स्थापत्य विभागातील दुय्यम अभियंता पदासाठी उमेदवारांची परीक्षा ९ मार्च २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे.
ही परीक्षा अंदाजे 15 दिवसांच्या आत घेण्याचे नियोजित असून, त्यानुसार सुधारित दिनांक निश्चित झाल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच विविध प्रमुख वर्तमानपत्रांद्वारे याची अधिकृत घोषणा करण्यात येईल. त्यामुळे या परीक्षेला बसलेल्या सर्व संबंधित उमेदवारांनी या संदर्भातील अपडेट्स नियमितपणे तपासावेत, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत दुय्यम अभियंता आणि सहाय्यक अभियंता या पदांसाठी सरळसेवा भरती परीक्षा 25 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र, या परीक्षेदरम्यान मोठा गोंधळ झाल्याचा आरोप करण्यात आला होता. अनेक उमेदवारांनी तक्रारी केल्या असून, परीक्षा प्रक्रियेत अनियमितता आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. काही उमेदवारांनी परीक्षा रद्द करून ती पुन्हा घेण्याची मागणी केली होती.
विशेष म्हणजे, दोन वेगवेगळ्या पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत समान प्रश्नपत्रिका वापरण्यात आल्याचे समोर आले आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर मानले जात असून, त्यामुळे अनेक उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी आणि जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी होत आहे. त्यामुळे परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला जात असून, याबाबत लवकरच अंतिम दिनांक जाहीर केला जाणार आहे.
चला तर मग रिक्त पदांसंदर्भात जाणून घेऊयात:
स्थापत्य विभागात कनिष्ठ अभियंताच्या पदासाठी एकूण २५० जागा रिक्त आहेत. या पदासाठी नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना ४१,८०० रुपये ते १,३२,३०० रुपयांपर्यंत वेतनमान देण्यात येईल. यांत्रिकी आणि विद्युत विभागात कनिष्ठ अभियंता पदासाठी 130 जागा रिक्त आहेत. ४१,८०० रुपये ते १,३२,३०० रुपयांपर्यंत वेतनमान पुरवण्यात येईल. स्थापत्य विभागात दुय्यम अभियंता पदासाठी एकूण २३३ जागा रिक्त आहेत. ४४,९०० रुपयांपासून ते १,४२,४०० वेतनमान पुरवण्यात येईल.