Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पनवेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उत्तरपत्रिका चोरीप्रकरणी आरोपी ३६ तासांत जेरबंद

पनवेलच्या पिल्लई अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आयटी द्वितीय वर्षाच्या परीक्षा उत्तरपत्रिका चोरीला गेल्या होत्या. नेरळ पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे ३६ तासांत खालापूर येथून आरोपीला अटक करून मुद्देमाल हस्तगत केला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 01, 2025 | 07:10 PM
पनवेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उत्तरपत्रिका चोरीप्रकरणी आरोपी ३६ तासांत जेरबंद
Follow Us
Close
Follow Us:

पनवेल येथील पिल्लई अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आयटी द्वितीय वर्षाच्या परीक्षेतील उत्तरपत्रिका चोरीला गेल्याची घटना घडली होती. संबंधित उत्तरपत्रिका दुचाकीवरून पळविण्यात आल्या होत्या आणि त्या उत्तरपत्रिका मंदिराबाहेर गाडी थांबवल्यावर चोरून नेण्यात आल्या. या घटनेमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने नेरळ पोलिसांनी तातडीने कारवाई करत अवघ्या ३६ तासांत खालापूर येथून एका तरुणाला ताब्यात घेतले. आरोपीने आर्थिक फायद्यासाठी हा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे.

Central Railway: नेरळ रेल्वे स्थानकाचा कायापालट; प्रवाशांच्या सोयीसाठी नव्या उपाय योजना जारी

२७ फेब्रुवारी २०२५ रोजी पनवेलच्या प्रसिद्ध पिल्लई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील प्राध्यापक हे सुट्टीच्या दिवशी उत्तरपत्रिका तपासण्यासाठी आपल्या घरी नेरळ येथे घेऊन येत होते. आयटी इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षाच्या “वैयक्तिक आर्थिक व्यवस्थापन” या विषयाच्या १३६ उत्तरपत्रिका, हजेरीपत्रक आणि प्रश्नपत्रिका त्यांनी सोबत घेतल्या होत्या. प्राध्यापक हे त्यांच्या मित्रासोबत (स्वप्नील वायंगनगर) दुचाकीवरून पनवेल ते नेरळ ममदापूर मार्गे प्रवास करत होते.

नेरळजवळील उकरुळ येथील श्री साईबाबा मंदिरात सायंकाळी ७:२० वाजता दर्शनासाठी थांबले असता त्यांनी उत्तरपत्रिकांची बॅग दुचाकीच्या हँडलला लावून गाडी पार्क केली. मात्र, मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आल्यावर उत्तरपत्रिकांची बॅग चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर, त्यांनी तातडीने नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला.

पोलीस तपास आणि आरोपीचा शोध

या प्रकरणात नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २३/२०२५ नोंदवून, भा.दं.सं. कलम ३०७ (इ) अंतर्गत कारवाई सुरू करण्यात आली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येऊ नये म्हणून पोलीस उपविभागीय अधिकारी डी.डी. टेळे आणि प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार करण्यात आले.

Metro 3: आरे ते वरळी फक्त ३० मिनिटांचा प्रवास, लवकरच धावणार भुयारी मेट्रो, काय आहे तिकीट दर? 

पोलीस उपनिरीक्षक संदीप फड, एस.डी. किसवे, हवालदार सचिन वाघमारे, किसवे, राजाभाऊ केकण आणि बेंद्रे यांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संशयिताचा शोध सुरू केला. तपासादरम्यान, आरोपी रुपेश भानुदास साळुंखे (खालापूर तालुका, उंबरे वाडी) याने आर्थिक फायद्यासाठी हा गुन्हा केल्याचे उघड झाले. त्याला खालापूर येथून अटक करून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलीस प्रशासनाचे कौतुक: उत्तरपत्रिका चोरी प्रकरण केवळ ३६ तासांत उघड करणाऱ्या नेरळ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचे जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घारगे आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक अभिजित शिवतारे यांनी विशेष कौतुक केले आहे.

Web Title: Accused arrested within 36 hours in panvel engineering college answer sheet theft case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2025 | 07:10 PM

Topics:  

  • Educational News
  • Panvel Rural

संबंधित बातम्या

मोदी सरकारची अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना ४२०० कोटींची मोठी भेट, MERITE योजनेला मंजुरी
1

मोदी सरकारची अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना ४२०० कोटींची मोठी भेट, MERITE योजनेला मंजुरी

सिंबायोसिस SCDL च्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दिल्लीमध्ये करिअर अ‍ॅक्सिलरेशन मास्टरक्लास! विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी
2

सिंबायोसिस SCDL च्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दिल्लीमध्ये करिअर अ‍ॅक्सिलरेशन मास्टरक्लास! विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

साठ्ये कॉलेजमध्ये अनोखा उपक्रम! मानसिक आरोग्यासाठी कार्यशाळा
3

साठ्ये कॉलेजमध्ये अनोखा उपक्रम! मानसिक आरोग्यासाठी कार्यशाळा

महाराष्ट्रात शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी एसआयटीमार्फत केली जाणार; शिक्षणमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा
4

महाराष्ट्रात शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी एसआयटीमार्फत केली जाणार; शिक्षणमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.