फोटो सौजन्य: गुगल
कर्जत/ संतोष पेरणे : कर्जत जवळील नेरळ येथे नागरिकांची मोठ्या प्रमाणात वसति वाढत आहे. या ठिकाणाहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढत जात आहेत. याच पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकात प्रवाशांना अत्याधुनिक सोयी सुविधा मिळाव्यात याकरीता मध्ये रेल्वेच्या वतीने नेरळ स्थानकाचा कायापालट करण्याचे काम हाती घेतलं आहे.
नेरळ रेल्वे स्थानकाचा कायापालट मध्य रेल्वेच्या माध्यमातून सुरू आहे. स्थानकात तिसरी मार्गिका खुली करण्यासाठी मध्यरेल्वेकडून कामकाज सुरु करण्यात आलं आहे. यामार्गिकेच्या कामरकाजात अडथळा ठरत असलेले जुने तिकीट बुकिंग कार्यालय नवीन जागेत हलविण्यात आले आहे.दरम्यान,मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांचे हस्ते या नवीन तिकीट बुकिंग कार्यालयाचे उद्घाटन केले जाणार होते,मात्र जानेवारी अखेरीस असलेला नियोजित दौरा रद्द झाल्याने महाव्यवस्थापक नेरळ येथे आले नव्हते.
मध्य रेल्वेरील मुख्य़ मार्गिकेवर असलेले नेरळ जंक्शन रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक कामं केली जात आहेत. त्यात तिसरी मार्गिका करण्याचे महत्वाचे काम आहे . या मार्गिकेमध्ये तिकीट बुकिंग कार्यालय महत्वाचा अडथळा ठरत होते. त्यामुळे फलाट दोनच्या बाहेर आधी नवीन इमारत बांधण्यात आली. तीन मजली इमारतीच्या पहिल्या मजल्याच्या तळमजल्यावर संगणकीय आरक्षण केंद्र आणि उपनगरीय लोकल यांच्या तिकीट खिडक्या आहेत.त्यात उपनगरीय तिकीटसाठी चार तिकीट खिडक्या आणि संगणकीय आरक्षण करणाऱ्या प्रवासी यांच्यासाठी दोन तिकीट खिडक्या उभारण्यात आल्या आहेत. त्यांच्या बाजूला लोहमार्ग सुरक्षा दल यांचे कार्यालय बनविण्यात आले असून या दोन्ही कार्यालयांचे उद्घाटन कोणतेही सोपस्कार पार न पाडता सुरू झाली आहेत.
तिकीट बुकिंग कार्यालय आणि संगणकीय आरक्षण केंद्राच्या नवीन इमारतीचे उद्घाटन मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांचे हस्ते जानेवारी अखेरीस निश्चित झालेल्या नेरळ स्थानक भेटीत केले जाणार होते. मात्र महाव्यवस्थापक यांचा नियोजित दौरा रद्द झाल्यानंतर तिकीट बुकिंग कार्यालय आणि लोहमार्ग सुरक्षा दल यांची कार्यालय प्रवासी यांच्या सेवेत आली आहेत. या दोन्ही कार्यालय ही प्रशस्त जागी सुरू झाली असल्याने प्रवाशांची गैरसोय आता टळली जाणार आहे.आता जुनं तिकीट कार्यालय येथील दोन्ही खिडक्या बंद करण्यात आल्या आहेत.दरम्यान,नेरळ रेल्वे प्रवासी संघटना यांनी मध्य रेल्वेचे या निर्णयाचे स्वागत केले आहे.