Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Anganwadi Recruitment : आता गृहिणी होतील स्वावलंबी! जास्त शिक्षण नाही? No Tension; राज्यात 2.21 लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती

२३ वर्षांनंतर महिला व बाल विकास विभागात ८,६६९ नियमित पदांची मोठी भरती होणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 11, 2026 | 04:38 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : तब्बल २३ वर्षांनंतर महिला व बाल विकास विभागात मोठ्या प्रमाणावर भरती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या अंतर्गत ८,६६९ नियमित पदे भरण्यात येणार असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. दीर्घ काळानंतर घेतलेल्या या निर्णयामुळे विभागाच्या कामकाजाला गती मिळणार असून सक्षमीकरणाच्या दिशेने मोठे पाऊल ठरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या भरती प्रक्रियेपूर्वी विभागातील सर्व पदांचा सखोल आढावा घेण्यात आला. यामध्ये कार्यक्षमतेच्या दृष्टीने काही पदे रद्द करण्यात आली, तर गरज ओळखून १६५ नव्या पदांची निर्मिती करण्यात आली आहे. परिणामी, विभागासाठी एकूण ८,६६९ नियमित पदांना मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे प्रशासन अधिक सक्षम होण्यास मदत होईल, तसेच विविध योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.

Phd New Rules : आता नियमित क्लासशिवाय पार्ट टाइम Phd करता येणार नाही, काय आहेत नवीन नियम?

याशिवाय, विभागाच्या दैनंदिन कामकाजात गती आणण्यासाठी २,८४३ पदे बाह्य यंत्रणेमार्फत (आउटसोर्सिंग) भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे तांत्रिक व प्रशासकीय कामे वेळेत पूर्ण करण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजनेअंतर्गतही मोठ्या प्रमाणावर पदांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये १,१०,६६४ अंगणवाडी सेविका आणि १,१०,६६४ अंगणवाडी मदतनीस अशी एकूण २.२१ लाखांहून अधिक मानधनाधारित पदे मंजूर करण्यात आली आहेत. या माध्यमातून राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील बालक, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना दिल्या जाणाऱ्या सेवांचा विस्तार होणार आहे. (Aaditi Tatkare)

अंगणवाडी केंद्रांमार्फत पोषण आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी, पूर्व-प्राथमिक शिक्षण अशा विविध सेवा दिल्या जातात. त्यामुळे या पदांच्या भरतीमुळे केवळ रोजगारनिर्मितीच होणार नाही, तर समाजाच्या आरोग्य व पोषणाच्या दृष्टीनेही सकारात्मक परिणाम दिसून येणार आहेत. मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, २३ वर्षांनंतर घेतलेला हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण असून महिला व बालकल्याण योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी आणि गतिमान करण्यासाठी उपयुक्त ठरेल. तसेच, राज्यातील प्रत्येक घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी हा निर्णय मोलाचा ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

IIM Placement Dark Reality: 80 लाखांची नोकरी ठरतेय शाप? ‘किडनॅपिंग’ची भीती; नेमकं प्रकरण काय?

या निर्णयामुळे राज्यातील हजारो युवक-युवतींसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. विशेषतः महिलांसाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांमुळे आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग खुला होणार आहे. त्यामुळे सामाजिक आणि आर्थिक स्तरावरही या निर्णयाचे दूरगामी परिणाम दिसून येतील, असे तज्ज्ञांचे मत आहे. एकूणच, महिला व बाल विकास विभागातील ही मोठी भरती राज्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात असून प्रशासन अधिक सक्षम, कार्यक्षम आणि जनतेसाठी उत्तरदायी बनवण्याच्या दिशेने हे एक ठोस पाऊल असल्याचे मानले जात आहे.

Web Title: Anganwadi recruitment for more than 221 lakh unemployed started by aditi tatkare

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 04:38 PM

Topics:  

  • Aaditi Tatkare
  • Anganwadi
  • Anganwadi Sevika

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.