फोटो सौजन्य - Social Media
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडने अप्रेन्टिस पदासाठी भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.या भरतीच्या माध्यमातून HAL मध्ये करिअर घडवून पाहणाऱ्या किंवा कामाच्या शोधामध्ये लीन असणाऱ्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अप्रेन्टिस पदी प्रशिक्षणार्थी म्हणून त्यांना अनेक गोष्टी शिकता येणार आहे तसेच कामाचा अनुभव मिळवता येणार आहे. या भरतीच्या माध्यमातून ५८८ रिक्त जागांसाठी अर्ज करता येणार आहे. एका ठराविक शिक्षण क्षेत्रातून प्रशिक्षण घेऊन येणाऱ्या तरुणांनाच या भरतीसाठी नियुक्त करण्यात येणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात ‘या’ भरतीच्या प्रक्रियेविषयी:
ग्रॅज्युएट किंवा डिप्लोमा धारक असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करत येणार आहे, ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना २७८ पदासाठी अर्ज करता येणार आहे. तर ITI ट्रेडमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ३१० पदे राखीव आहेत. दोन्हीही भरती एकंदरीत वेगवेगळ्या भासत आहेत, त्यांच्या अंतिम तारखांमुळे! जर तुम्ही ग्रॅज्युएट आहात किंवा डिपोमा धारक आहात, तर तुमच्यासाठी १० ऑगस्ट २०२५ ही तारीख अंतिम नेमण्यात आली आहे. तर ITI प्रशिक्षणार्थ्यांना २ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.
शैक्षणिक पात्रता
ज्या क्षेत्रातील पदासाठी अर्ज करत आहेत त्या क्षेत्रासंबंधित मान्यता प्राप्त महाविद्यापीठातून डिग्री किंवा डिप्लोमा धारक असणे आवश्यक आहे. ITI झालेले उमेदवारही या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
स्टायपेंड
इंजीनियरिंग एंड नॉन टेकनिशयन ग्रेजुएट अप्रेंटिस पदासाठी ९ हजार रुपये स्टायपेंड देण्यात येईल. डिप्लोमा पदासाठी ८ हजार रुपये स्टायपेंड मिळेल. २ वर्षीय ITI केलेल्या उमेदवारांना ८०५० रुपये स्टायपेंड मिळेल. तर १ वर्षीय ITI केलेल्या उमेदवारांना स्टायपेंड म्हणून ७,७०० रुपये स्टायपेंड मिळेल.
अशा प्रकारे करता येईल अर्ज