Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 4 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CBSE चा मोठा निर्णय! आता ‘अपार आयडी’शिवाय बोर्ड परीक्षेसाठी नोंदणी नाही; १० वीच्या ३ विषयांसाठी ‘दोन लेव्हल’वर परीक्षा!

सीबीएसई बोर्डाने दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. 2026-27 पासून APAAR ID अनिवार्य केला जाईल, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्व शैक्षणिक डेटा एकाच ठिकाणी डिजिटल स्वरूपात राहील.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 20, 2026 | 04:56 PM
CBSE

CBSE

Follow Us
Follow Us:
  • CBSE चा मोठा निर्णय, ‘APAAR ID ‘ केला बंधनकारक
  • APAAR ID म्हणजे नक्की काय?
  • 10वीची परिक्षा 2 पातळ्यांवर होणार?
CBSE board exam: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) बोर्ड परीक्षांच्या संदर्भात दोन अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. सीबीएसईने घेतलेल्या या निर्णयांवरून हे स्पष्ट होत आहे की, बोर्ड आता शिक्षण व्यवस्था अधिक डिजिटल आणि शिस्तबद्ध करण्याच्या दिशेने पावले टाकत आहे.

GATE 2026 Alert: इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘रिस्पॉन्स शीट’ लवकरच रिलीज मोडवर; ‘अशी’ तपासा तुमची उत्तरपत्रिका

2026-27 पासून ‘APAAR ID’ बंधनकारक होणार:

सीबीएसईने घेतलेल्या पहिल्या मोठ्या निर्णयानुसार, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून सर्व विद्यार्थ्यांसाठी APAAR ID (Automated Permanent Academic Account Registry) अनिवार्य करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, ज्या विद्यार्थ्यांकडे हा आयडी नसेल, त्यांना बोर्ड परीक्षेसाठी नोंदणी (Registration) करता येणार नाही. विद्यार्थ्यांचा सर्व शैक्षणिक डेटा डिजिटल स्वरूपात एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

2028 पासून 10 वीच्या 3 विषयांसाठी ‘दोन लेव्हल’वर परीक्षा:

दुसऱ्या मोठ्या निर्णयानुसार, वर्ष २०२८ पासून इयत्ता 10 वीच्या गणित (Maths), विज्ञान (Science) आणि सामाजिक शास्त्र (Social Science) या तीन प्रमुख विषयांची बोर्ड परीक्षा दोन पातळ्यांवर (Two Levels) घेतली जाईल. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार परीक्षेचा स्तर निवडता येणार आहे.

पारदर्शकता आणि डिजिटल क्रांतीवर भर:

शिक्षण व्यवस्था अधिक व्यवस्थित, पारदर्शक आणि डिजिटल बनवणे हा या दोन्ही निर्णयांचा मुख्य हेतू आहे. यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती ट्रॅक करणे सोपे होणार असून परीक्षेतील ताण कमी करण्यासही मदत होणार आहे.

APAAR ID म्हणजे नक्की काय?

‘APAAR’ चा अर्थ Automated Permanent Academic Account Registry असा आहे. हा प्रत्येक विद्यार्थ्याचा एक युनिक ‘डिजिटल अकॅडमिक आयडेंटिटी’ नंबर आहे. ज्याप्रमाणे नागरिकांसाठी ‘आधार कार्ड’ असते, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शैक्षणिक प्रवासासाठी हा ‘एक राष्ट्र, एक विद्यार्थी आयडी’ (One Nation, One Student ID) म्हणून ओळखला जातो.

सीबीएसईने का घेतला अनिवार्य करण्याचा निर्णय?

सीबीएसईच्या एका सर्वेक्षणात असे दिसून आले की, 2025-26 पर्यंत बोर्डाशी संलग्न असलेल्या शाळांमधील 50% पेक्षाही कमी विद्यार्थ्यांनी APAAR ID बनवला होता. ही नोंदणी वाढवण्यासाठी आणि शैक्षणिक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध करण्यासाठी बोर्डाने आता कठोर पाऊल उचलले आहे.

पुस्तकांबाबत काय अपडेट?

सीबीएसई (CBSE) बोर्डाने परीक्षा पद्धतीत मोठे बदल जाहीर केले असले, तरी नवीन पुस्तकांसाठी विद्यार्थी आणि शिक्षकांना अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. नॅशनल क्युरिकुलम फ्रेमवर्क (NCF) 2023 नुसार नवीन पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम सुरू असले, तरी आगामी शैक्षणिक वर्षात कोणताही मोठा बदल होणार नाही.

पोलिस होण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार! ‘या’ जिल्ह्यात होणार भरती; 87 पदांसाठी हजारो अर्ज दाखल

Web Title: Education cbse makes apaar id mandatory from 2026 to 27

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 04:56 PM

Topics:  

  • 10th Board Exam
  • career guide
  • Career News

संबंधित बातम्या

11th Admission: अकरावी प्रवेशाची विशेष गुणवत्ता यादी जाहीर! कॉलेज मिळालंय की नाही? त्वरित तपासा ‘हा’ पर्याय
1

11th Admission: अकरावी प्रवेशाची विशेष गुणवत्ता यादी जाहीर! कॉलेज मिळालंय की नाही? त्वरित तपासा ‘हा’ पर्याय

CA Foundation May 2026 Result OUT: सीए फाऊंडेशन मे परीक्षेचा निकाल, ICAI स्कोअरकार्ड कसे तपासाल
2

CA Foundation May 2026 Result OUT: सीए फाऊंडेशन मे परीक्षेचा निकाल, ICAI स्कोअरकार्ड कसे तपासाल

अकरावी प्रवेशाची विशेष ‘ओपन टू ऑल’ फेरी सुरू; ३ ते ६ जुलैदरम्यान प्रवेश निश्चित करण्याची संधी
3

अकरावी प्रवेशाची विशेष ‘ओपन टू ऑल’ फेरी सुरू; ३ ते ६ जुलैदरम्यान प्रवेश निश्चित करण्याची संधी

AI Era Career Options: एआयच्या काळात कोणती पदवी टिकवून ठेवणार तुमची नोकरी? जाणून घ्या सविस्तर
4

AI Era Career Options: एआयच्या काळात कोणती पदवी टिकवून ठेवणार तुमची नोकरी? जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.