Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SBI SO पदासाठी करा अर्ज; जानेवारीच्या ५ तारखेपर्यंत मुदत, वाचा सविस्तर माहिती

भारतीय स्टेट बँकेने स्पेशलिस्ट ऑफिसर भरतीसाठी अर्जाची अंतिम तारीख वाढवून उमेदवारांना दिलासा दिला असून, आता अर्ज ५ जानेवारी २०२६ पर्यंत करता येणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 24, 2025 | 06:13 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँक (SBI) ने स्पेशलिस्ट ऑफिसर (SO) भरतीसंदर्भात उमेदवारांना मोठा दिलासा दिला आहे. एसओ पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवण्यात आली असून, पात्र व इच्छुक उमेदवारांना आता वाढीव मुदतीपर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज प्रक्रिया sbi.co.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने करता येणार असून, नव्या सूचनेनुसार अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ जानेवारी २०२६ निश्चित करण्यात आली आहे.

श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालयात ‘बौद्धिक संपदा हक्क’ विषयावर कार्यशाळा उत्साहात पार

या भरती मोहिमेतून एसबीआयमध्ये एकूण ९९६ स्पेशलिस्ट ऑफिसर पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. या भरतीची अधिसूचना बँकेने २ डिसेंबर २०२५ रोजी जाहीर केली होती. ही भरती विविध तांत्रिक आणि व्यवस्थापकीय पदांसाठी होत असून, पदानुसार शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वेगवेगळा ठेवण्यात आला आहे. सर्वसाधारणपणे उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. काही पदांसाठी संबंधित क्षेत्रातील विशेष ज्ञान व अनुभवही आवश्यक आहे. त्यामुळे उमेदवारांनी सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

वयोमर्यादेबाबत सांगायचे झाल्यास, स्पेशलिस्ट ऑफिसर कॅटेगरीतील मॅनेजर-स्तरावरील पदांसाठी उमेदवारांचे वय किमान २० वर्षे आणि कमाल ४२ वर्षे असावे. तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय व अन्य आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे.

एसबीआय एसओ निवड प्रक्रिया २०२५ ही प्रामुख्याने मुलाखतीवर आधारित असेल. ही मुलाखत प्रत्यक्ष, दूरध्वनी किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेतली जाऊ शकते. मुलाखत एकूण १०० गुणांची असेल. मुलाखतीत यशस्वी ठरलेल्या उमेदवारांची पुढे दस्तऐवज पडताळणी करण्यात येणार आहे. उमेदवाराच्या कामगिरीनुसार आणि पात्रतेनुसार अंतिम निवड केली जाईल.

ब्रिजस्टोन इंडियातर्फे शिक्षण क्षेत्रात महत्वाचं पाऊल; जैवविविधता प्रकल्पाला प्रोत्साहन देण्यासाठी नव्या सेंटरची उभारणी

अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी खालील पद्धतीने अर्ज करावा

  • प्रथम sbi.co.in या एसबीआयच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
  • मुखपृष्ठावरील Career या विभागावर क्लिक करावे.
  • त्यानंतर Current Openings या पर्यायावर क्लिक केल्यास SBI SCO Recruitment 2025 ची अधिसूचना दिसेल.
  • आता ऑनलाइन अर्जाच्या लिंकवर क्लिक करून लॉगइन क्रेडेन्शियल्सच्या सहाय्याने लॉगइन करावे.
  • अर्जामधील सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरावी.
  • त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज शुल्क भरणा करावा.
  • शेवटी अर्ज सादर करून कन्फर्मेशन पेज डाउनलोड करून सुरक्षित ठेवावे.
बँकिंग क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती एक सुवर्णसंधी असून, उमेदवारांनी अंतिम तारखेची वाट न पाहता वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Web Title: Apply for the sbi so post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 06:13 PM

Topics:  

  • SBI
  • Sbi Job

संबंधित बातम्या

SBI Recruitment 2026: SBIची बंपर भरती जाहीर! ‘या’ पदासाठी पगार तब्बल १ कोटी, अर्ज कसा करायचा?
1

SBI Recruitment 2026: SBIची बंपर भरती जाहीर! ‘या’ पदासाठी पगार तब्बल १ कोटी, अर्ज कसा करायचा?

एटीएमधारकांनो ‘या’ बँकेच्या ATM ट्रान्झॅक्शनवर लागणार शुल्क
2

एटीएमधारकांनो ‘या’ बँकेच्या ATM ट्रान्झॅक्शनवर लागणार शुल्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.