Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chess Championship : वीर-हृदयची सात गुणांची ‘चेकमेट’

Chess Championship : एसबीआय लाइफ महाराष्ट्र राज्य शालेय बुद्धिबळ स्पर्धेत वीर शाह आणि हृदय मनियार यांनी सातही डाव जिंकले. लावण्या सिंग, विहान अग्रवाल, तिस्या पट्ट आणि दृश्या नाईक यांनीही विजेतेपद पटकावले. राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निश्चित झाला.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 15, 2026 | 07:03 PM
Chess Championship : वीर-हृदयची सात गुणांची 'चेकमेट'

Chess Championship : वीर-हृदयची सात गुणांची 'चेकमेट'

Follow Us
Follow Us:
  • लावण्या, विहान, तिस्या आणि दृश्याही विजेते
  • दृश्या नाईकचे दमदार यश
  • राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निश्चित
 

Chess Championship : एसबीआय लाइफ महाराष्ट्र राज्य शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात वीर धवल शाह आणि एआयएम हृदय मनियार यांनी सातही डाव जिंकत आपापल्या गटांमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवले. दहिसर (पश्चिम) येथील रुस्तमजी केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालेल्या स्पर्धेत उर्वरित गटात लावण्या सिंग, विहान अग्रवाल, तिस्या पट्ट आणि दृश्या नाईक यांनी विजेतेपद पटकावले.

इंडियन चेस स्कूलच्या आयोजनाखाली झालेल्या या स्पर्धेत 9, 13 आणि 17 वर्षांखालील मुले व मुली अशा सहा फिडे मानांकित गटांतून एकूण ३८७ खेळाडूंनी सहभाग घेतला. एसबीआय लाइफ स्पर्धेचे मुख्य प्रायोजक, तर रुस्तमजी केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल यजमान होते.

वीर शाहने (जमनाबाई नरसी स्कूल, जेव्हीपीडी) 9 वर्षांखालील खुल्या गटात सातही डाव जिंकत सात गुणांसह विजेतेपदावर नाव कोरले. तर 17 वर्षांखालील खुल्या गटात अग्रमानांकित हृदय मनियारनेही सात पैकी सात गुणांची कमाई करत अजिंक्यपदाला गवसणी घातली. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ एसबीआय लाइफचे विभागीय संचालक राजीव श्रीवास्तव आणि प्रादेशिक व्यवस्थापक अतुल मेहता यांच्या हस्ते पार पडला. त्यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना चषक व पदके प्रदान करण्यात आली. स्पर्धेसाठी एकूण 60 हजार रुपयांची पारितोषिक रक्कम ठेवण्यात आली होती.
प्रत्येक गटासाठी 10 हजार रुपयांचे पारितोषिक निश्चित करण्यात आले होते. प्रत्येक गटातील पहिल्या तीन खेळाडूंना चषक, तर चौथ्या ते दहाव्या क्रमांकावरील खेळाडूंना पदक देऊन गौरविण्यात आले.

वीर धवलची निर्विवाद बाजी

9 वर्षांखालील खुल्या गटात वीर शाह (1501) याने सातही डाव जिंकत सात गुणांसह अव्वल स्थान मिळवले. पहिल्या टप्प्यात 7 वर्षांखालील खुल्या गटाचे विजेतेपद मिळवणाऱ्या इवान दुबेने (1545) सहा गुणांसह दुसरा, तर जमनाबाई नरसी स्कूलच्याच आरव रवी झावरने (1571) सहा गुणांसह तिसरा क्रमांक मिळवला.

सिम्बायोसिस प्रायमरी अँड सेकंडरी स्कूलचा एएफएम अद्विक नवल 5.5 गुणांसह चौथ्या स्थानावर राहिला. पोदार इंटरनॅशनल स्कूलचा ईशान अग्निहोत्री पाचवा, विश्वज्योत हायस्कूलचा आरव देशमुख सहावा, व्हिबग्योर राइज (मालाड) चा एसीएम अगस्त्य पटवा सातवा आणि न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूलचा अर्णव वाघमारे आठव्या स्थानावर राहिले. या सर्वांनी 5.5 गुण मिळवले. आयुष तिवारीने पाच गुणांसह नववे, तर शिवाशिष कवितीने पाच गुणांसह दहावे स्थान मिळवले.

Carrom Championship : सावंतवाडीच्या भरत सावंतचा कॅरममध्ये डंका! प्रल्हाद नलावडे स्मृती चषकावर कोरले नाव

लावण्याची सरस कामगिरी

मुलींच्या 9 वर्षांखालील गटात संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या लावण्या सिंगने (1448) सहा गुण मिळवत सरस टायब्रेकच्या आधारे विजेतेपद पटकावले. जे. बी. पेटिट हायस्कूल फॉर गर्ल्सच्या इशी सिंगने (1538) सहा गुणांसह दुसरा, तर निकिता संदीपने (1411) सहा गुणांसह तिसरा क्रमांक मिळवला. कनिष्का गाला 5.5 गुणांसह चौथी, तर लिया कृष्णन 5.5 गुणांसह पाचव्या स्थानावर राहिली. मिराई सरदाना आणि मानसी दानू यांनी प्रत्येकी पाच गुणांसह अनुक्रमे सहावा व सातवा क्रमांक मिळवला. तनिष्का भंडारी आठवी, द्विजा अरोंडेकर नववी, तर साध्या संजय जाधव दहाव्या स्थानावर राहिल्या.

WPL 2027 मध्ये मोठा बदल! ब्रेबोर्नऐवजी वानखेडेवर रंगणार मुंबईतील सर्व सामने

13 वर्षांखालील गटात विहान अव्वल

13 वर्षांखालील खुल्या गटात नारायणा ऑलिम्पियाड स्कूलच्या विहान अग्रवाल (1858) याने सात डावांत सहा गुण मिळवत विजेतेपद पटकावले. अग्रमानांकित डॉन बॉस्को इंटरनॅशनल स्कूलच्या निर्वाण शाह (1956) यालाही सहा गुण मिळाले; मात्र टायब्रेकच्या आधारे त्याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. सांगलीचा एआयएम कश्यप खाखरियाने (1789) 5.5 गुणांसह तिसरे स्थान मिळवले.
लेक्सिकॉन इंटरनॅशनल स्कूलचा ओम रामगुडे चौथा, उत्कल शांघवी ग्लोबल स्कूलचा अर्जुन प्रभू पाचवा, तर सेंट मेरीज आयसीएसई स्कूल, माझगावचा विहान राव सहाव्या स्थानावर राहिला. या तिघांसह पहिल्या नऊ स्थानांवरील बहुतांश खेळाडूंनी 5.5 गुणांची कमाई केली. रियान्श द्विवेदी सातवा, सोहम चिखलकर आठवा आणि एएफएम इधांत परमार नवव्या स्थानावर राहिले. शौर्य पाटीलने पाच गुणांसह दहावे स्थान मिळवले.

13 वर्षांखालील मुलींच्या गटात अव्हालॉन हाइट्स इंटरनॅशनल स्कूलच्या तिस्या पट्ट (1524) हिने सात डावांत सहा गुण मिळवत विजेतेपदाला गवसणी घातली. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यालयाच्या प्रणिथा भावा (1655) हिने 5.5 गुणांसह दुसरा क्रमांक मिळवला. महुआ देशपांडेने पाच गुणांसह तिसरे, तर त्वेशा जैनने पाच गुणांसह चौथे स्थान मिळवले. निश्का अग्रवाल पाचवी आली.

हृदय मनियारची सात गुणांसह हॅट्ट्रिक!

17 वर्षांखालील खुल्या गटात अग्रमानांकित एआयएम हृदय मनियारने (1910) संपूर्ण स्पर्धेत आपली विजयी घोडदौड कायम राखत सातही डाव जिंकले. सात गुणांसह त्याने निर्विवाद वर्चस्व राखले.
शौर्य मोदीने (1626) 5.5 गुणांसह दुसरा, तर सोहम सहमाते (1667) याने समान गुणांसह तिसरा क्रमांक संपादला. युवराज सिंग आणि आराध्य गावकर यांनी प्रत्येकी पाच गुण मिळवत अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक मिळवला.

दृश्या नाईकचे दमदार यश

17 वर्षांखालील मुलींच्या गटात अग्रमानांकित दृश्या नाईकने (1713) सात डावांत 6.5 गुण मिळवत निर्विवाद विजेतेपद पटकावले. तिने आपल्या निकटच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा दीड गुणांची आघाडी घेतली. इक्षा सोनीने (1528) पाच गुणांसह दुसरा, तर श्रेया जोशी (1525) हिने पाच गुणांसह तिसरा क्रमांक मिळवला. सायना नागरकट्टे पाच गुणांसह चौथ्या स्थानावर राहिली. पहिल्या टप्प्यात 15 वर्षांखालील मुलींच्या गटाचे विजेतेपद मिळवणाऱ्या खानक पहारियाने 4.5 गुणांसह पाचवे स्थान मिळवले.

राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निश्चित

या स्पर्धेला 16 ते 20 डिसेंबर 2026 या कालावधीत अहमदाबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड चाचणीचे स्वरूप होते. सहाही गटांतील पहिल्या दोन क्रमांकांच्या खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: एसबीआय लाइफ महाराष्ट्र राज्य शालेय बुद्धिबळ स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली?

    Ans: ही स्पर्धा मुंबईतील दहिसर पश्चिम येथील रुस्तमजी केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित करण्यात आली.

  • Que: स्पर्धेतील सहा गटांचे विजेते कोण ठरले?

    Ans: वीर शाह, लावण्या सिंग, विहान अग्रवाल, तिस्या पट्ट, हृदय मनियार आणि दृश्या नाईक यांनी आपापल्या गटांत विजेतेपद मिळवले.

  • Que: स्पर्धेसाठी किती रुपयांची पारितोषिक रक्कम ठेवण्यात आली होती?

    Ans: स्पर्धेसाठी एकूण 60 हजार रुपयांची पारितोषिक रक्कम ठेवण्यात आली होती. प्रत्येक गटासाठी 10 हजार रुपयांचे पारितोषिक निश्चित करण्यात आले होते.

Web Title: Sbi life maharashtra state school chess championship 2026 winners rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2026 | 07:03 PM

Topics:  

  • Chess Championship
  • Dahisar
  • SBI

संबंधित बातम्या

Chess Championship: बुद्धिबळाच्या पटावर डावपेचांचा धडाका! ३८७ खेळाडूंचा बुद्धीसंग्राम; सहा गटांत आघाडीसाठी काट्याची टक्कर
1

Chess Championship: बुद्धिबळाच्या पटावर डावपेचांचा धडाका! ३८७ खेळाडूंचा बुद्धीसंग्राम; सहा गटांत आघाडीसाठी काट्याची टक्कर

Chess Championship : बुद्धिबळाच्या पटावर मानांकितांचा झंझावात, 387 युवा खेळाडूंचा राज्य शालेय अजिंक्यपदासाठी संघर्ष
2

Chess Championship : बुद्धिबळाच्या पटावर मानांकितांचा झंझावात, 387 युवा खेळाडूंचा राज्य शालेय अजिंक्यपदासाठी संघर्ष

Chess Championship : राष्ट्रीय स्पर्धेच्या तिकिटासाठी 387 बुद्धिबळपटूंचा बुद्धीसंग्राम; उद्यापासून दुसरा टप्पा
3

Chess Championship : राष्ट्रीय स्पर्धेच्या तिकिटासाठी 387 बुद्धिबळपटूंचा बुद्धीसंग्राम; उद्यापासून दुसरा टप्पा

SBI Diwali Special FD : दिवाळीच्या मुहूर्तावर SBI कडून मोठं गिफ्ट! स्पेशल FD योजनेत पैसे गुंतवा, मिळणार जबरदस्त रिटर्न
4

SBI Diwali Special FD : दिवाळीच्या मुहूर्तावर SBI कडून मोठं गिफ्ट! स्पेशल FD योजनेत पैसे गुंतवा, मिळणार जबरदस्त रिटर्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.