Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Success Story: Google ची नोकरी सोडून २३ वर्षांची तरुणी झाली उद्योजिका; आशनाने कसा उभारला कोट्यवधींचा AI स्टार्टअप वाचा एका क्लिकवर

Ashna Doshi Google Software Engineer Success Story : चांगला पगार आणि आर्थिक सुरक्षितता देणारा गुगलचा जॉब आशनाने का सोडला? 'Bounty' स्टार्टअप आणि '0 to 1' पॉडकास्टच्या माध्यमातून तिने टेक जगतात कशी ओळख निर्माण केली? वाचा सविस्तर.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 25, 2026 | 04:12 PM
google

google

Follow Us
Follow Us:

Ashna Doshi Google Software Engineer Success Story: कॉलेजचे शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच गुगल सारख्या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअरची नोकरी मिळाली, तर कोणीही स्वतःला नशीबवान समजेल. मात्र, २३ वर्षीय आशना दोशी हिची कहाणी यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. तिने जॉर्जिया टेक विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केले. जागतिक मंदीच्या काळातही गुगलची पहिली नोकरी नाकारून तिने मोठा धोका पत्करला. नंतर तिला तिच्या आवडीच्या ठिकाणी म्हणजेच न्यूयॉर्कमध्ये पोस्टिंग मिळाले. परंतु, काही काळातच तिने या ‘ड्रीम जॉब’चा कायमचा त्याग केला.

आशनाचा असा विश्वास आहे की, भरघोस पगार आणि आर्थिक सुरक्षितता चांगली वाटते, पण कधीकधी ती एका चक्रव्यूहासारखी (सापळा) बनते. गुगलमध्ये काम करताना तिला जाणीव झाली की, ती एका खूप मोठ्या मशीनचा केवळ एक छोटासा भाग बनून राहिली आहे. तिच्या मनाला काहीतरी मोठे आणि कल्पक करण्याची ओढ लागली होती. याच विचाराने तिला कोडिंगच्या जगातून बाहेर काढले. आज ती एक यशस्वी पॉडकास्टर आणि एका नव्या एआय (AI) स्टार्टअपची को-फाउंडर बनली आहे.

फेब्रुवारी २०२४ मध्ये गुगलने आशनाला कॅलिफोर्नियासाठी नोकरीची ऑफर दिली होती. त्यावेळी टेक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात सुरू होती. मात्र, आशनाला न्यूयॉर्कमध्ये काम करायचे होते. तिने धाडस दाखवून ती ऑफर नाकारली. आशनाने यूट्यूब म्युझिकपासून ते सिक्युरिटी इन्फ्रास्ट्रक्चर आणि एआय (AI) च्या इंटरसेक्शनपर्यंत अनेक महत्त्वाच्या विभागांवर काम केले.

NCERT Controversy: ६ वीच्या ‘कृष्णा’ पुस्तकावरून सोशल मीडियात वाद; शाकाहाराला प्राधान्य दिल्याच्या आरोपावर NCERT चे उत्तर

‘0 to 1’ पॉडकास्टची यशोगाथा

आपल्या कल्पकतेची भूक भागवण्यासाठी आशनाने २०२५ च्या सुरुवातीला एक ‘साइड प्रोजेक्ट’ म्हणून ‘0 to 1’ नावाचा पॉडकास्ट सुरू केला. ‘बिग टेक’ कंपन्यांमध्ये काम करणारे तिचे सहकारी यामध्ये को-होस्ट बनले. या पॉडकास्टच्या माध्यमातून तिने जगभरातील टेक लीडर्स, स्टार्टअप फाउंडर्स आणि क्रिएटर्सचा प्रवास लोकांसमोर आणण्यास सुरुवात केली. सोशल मीडिया नेटवर्किंगच्या जोरावर सुरू झालेल्या या पॉडकास्टने अवघ्या १ वर्षात यूट्यूबवर १ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळवले. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, यामुळे आशनाचा अ‍ॅमेझॉन आणि मायक्रोसॉफ्टसारख्या टेक दिग्गजांच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत थेट संपर्क झाला.

Online vs Offline: स्पर्धा परीक्षेची तयारी करताना ऑनलाईन कोचिंग योग्य की ऑफलाईन? जाणून घ्या तुमच्या मुलासाठी नेमके काय बेस्ट आहे

‘Bounty’ एआय स्टार्टअपची स्थापना

पॉडकास्टच्या यशाने आणि मोठ्या दिग्गजांशी झालेल्या संवादाने आशनामधील उद्योजिका जागी केली. कॉर्पोरेट क्षेत्राच्या संथ गतीपेक्षा स्वतः निर्णय घेण्याचे आणि वेगाने काम करण्याचे स्वातंत्र्य तिला हवे होते. परिणामी, मे २०२६ मध्ये तिने गुगलचा राजीनामा दिला. आता आशना तिच्या पॉडकास्ट को-होस्टसोबत मिळून ‘Bounty’ नावाचा एआय स्टार्टअप उभारत आहे. हे एक ‘रिझल्ट-बेस्ड एआय मार्केटप्लेस’ आहे, जे कंपन्यांना लीड जनरेशन, आउटरीच आणि रिक्रूटमेंटसारखी कामे आउटसोर्स करण्याची सुविधा देते.

Web Title: Ashna doshi left google job bounty ai startup success story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 04:12 PM

Topics:  

  • Business
  • Business Idea
  • google
  • starts

संबंधित बातम्या

Google Job Offer: ५५ लाखांच्या गुगलच्या ऑफरसाठी ४० लाखांची नोकरी सोडावी का? नोएडाच्या टेक प्रोफेशनलची सोशल मीडियावर चर्चा!
1

Google Job Offer: ५५ लाखांच्या गुगलच्या ऑफरसाठी ४० लाखांची नोकरी सोडावी का? नोएडाच्या टेक प्रोफेशनलची सोशल मीडियावर चर्चा!

Government Schemes for Business : गावात सुरू करायचाय स्वतःचा व्यवसाय? सरकारीकडून कशी मिळणार मदत? जाणून घ्या सविस्तर
2

Government Schemes for Business : गावात सुरू करायचाय स्वतःचा व्यवसाय? सरकारीकडून कशी मिळणार मदत? जाणून घ्या सविस्तर

Anil Agarwal : १५ व्या वर्षी सोडली शाळा, आज उभे केले २ लाख कोटींचे साम्राज्य; जाणून घ्या ‘या’ उद्योजकाची यशोगाथा..
3

Anil Agarwal : १५ व्या वर्षी सोडली शाळा, आज उभे केले २ लाख कोटींचे साम्राज्य; जाणून घ्या ‘या’ उद्योजकाची यशोगाथा..

Job vs Business : नोकरी की व्यवसाय? कोणता पर्याय तुम्हाला वेगाने बनवू शकतो श्रीमंत; हे आहे फायद्या-तोट्याच गणित?
4

Job vs Business : नोकरी की व्यवसाय? कोणता पर्याय तुम्हाला वेगाने बनवू शकतो श्रीमंत; हे आहे फायद्या-तोट्याच गणित?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.