Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आश्रमशाळांना नियमानुसार अनुदान मिळणार; शिक्षकांच्या नियमित वेतनश्रेणीबाबत सकारात्मक पाऊल 

शाहू, फुले, आंबेडकर आश्रमशाळांना अनुदान व शिक्षक-कर्मचाऱ्यांना नियमित वेतन देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक आहे. या शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवण्याचा निर्धार मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 13, 2025 | 08:34 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

राज्यातील शाहू, फुले, आंबेडकर निवासी व अनिवासी आश्रमशाळांना नियमानुसार अनुदान देण्याची कार्यवाही सध्या सुरू असून, या शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना नियमित वेतनश्रेणी देण्याच्या दृष्टीने राज्य शासन सकारात्मक असल्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले आहे. मंत्रालयात या विषयावर घेण्यात आलेल्या बैठकीत त्यांनी हा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. ही बैठक मंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी आमदार विक्रम काळे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, तसेच कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अविनाश काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

भारतीय वायु दलात अधिकारी बनायचं आहे? जाणून घ्या भरतीविषयी संपूर्ण माहिती

बैठकीत बोलताना मंत्री शिरसाट म्हणाले की, केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यात शाहू, फुले, आंबेडकर निवासी व अनिवासी आश्रमशाळा योजना राबविण्यात आली आहे. या योजनेंतर्गत १६५ आश्रमशाळांना सन २०१९-२० पासून २० टक्के दराने अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी शाळांची तपासणी करून त्यांचे पात्रत्व ठरवले जात आहे.

या शाळांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांना वि.जा.भ.ज. (विकास महामंडळाच्या) आश्रमशाळांच्या धर्तीवर मानधन देणे, तसेच त्यांना नियमित वेतनश्रेणी लागू करणे यासाठी आवश्यक असलेल्या खर्चाचा आढावा घेऊन तुलनात्मक माहिती सादर करावी, असे स्पष्ट निर्देश सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी संबंधित प्रशासनाला दिले. या आश्रमशाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना योग्य आर्थिक सन्मान मिळावा, त्यांच्या सेवा सुरक्षित रहाव्यात आणि त्यांना त्यांच्या कामाचे न्याय्य मूल्य मिळावे यासाठी शासन सकारात्मक असून, त्याबाबत लवकरच ठोस पावले उचलली जातील, असेही मंत्री शिरसाट यांनी स्पष्ट केले. राज्य सरकारकडून सध्या शाहू, फुले, आंबेडकर निवासी व अनिवासी आश्रमशाळांना केंद्र सरकारच्या धर्तीवर २०१९-२० पासून २० टक्क्यांच्या दराने अनुदान देण्याची कार्यवाही सुरू आहे.

NHAI च्या ‘या’ संधीला नाही म्हणू नका! वेळ न दवडता करा अर्ज

त्याचबरोबर, या शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी देण्यासाठी शासन विविध उपाययोजना राबवत आहे. मंत्री शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत या निर्णयांवर चर्चा झाली. बैठकीला आमदार विक्रम काळे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अविनाश काळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. राज्य शासन आदिवासी, मागासवर्गीय आणि दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असून त्यांच्या शैक्षणिक हक्कांचे रक्षण आणि शिक्षकांचे आर्थिक हित सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध आहे. या निर्णयामुळे शिक्षकांचे मनोबल वाढेल आणि शाळेतील शैक्षणिक वातावरण अधिक सक्षम व सकारात्मक होईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

Web Title: Ashram schools will get subsidy as per rules

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2025 | 08:34 PM

Topics:  

  • education news

संबंधित बातम्या

CJP School Theek Karo Latur: बाहेरच्या शाळेतून विद्यार्थी आणले….; अभिजीत दिपकेंनी केली महापालिकेच्या शाळेची पोलखोल
1

CJP School Theek Karo Latur: बाहेरच्या शाळेतून विद्यार्थी आणले….; अभिजीत दिपकेंनी केली महापालिकेच्या शाळेची पोलखोल

Educational News: शाळांमध्ये शारीरिक शिक्षण, कला अन् कार्यशिक्षणाची पुस्तके अनिवार्य; ३ री, ४ थी आणि ६ वी च्या विद्यार्थ्यांसाठी
2

Educational News: शाळांमध्ये शारीरिक शिक्षण, कला अन् कार्यशिक्षणाची पुस्तके अनिवार्य; ३ री, ४ थी आणि ६ वी च्या विद्यार्थ्यांसाठी

Tribal Ashram School: विद्यार्थ्यांच्या जेवणात खराब भाजीपाला? आदिवासी ठाकूर समाज संघटनेचा संताप, कारवाईची मागणी
3

Tribal Ashram School: विद्यार्थ्यांच्या जेवणात खराब भाजीपाला? आदिवासी ठाकूर समाज संघटनेचा संताप, कारवाईची मागणी

Mumbai University : अपार आयडीशिवाय हॉलतिकीट नाही; १९-२० ऑगस्टला मुंबई विद्यापीठाचे विशेष शिबिर
4

Mumbai University : अपार आयडीशिवाय हॉलतिकीट नाही; १९-२० ऑगस्टला मुंबई विद्यापीठाचे विशेष शिबिर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.