
प्रशासकांसह सल्लागार समितीही नेमणार
प्राथमिक शिक्षण संचालक डॉ. शरद गोसावी आणि माध्यामिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दरे माहीती दिली. मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका क्रमांक ३४९/२०२६ दाखल आहे. या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. शिक्षण संचालनालयाने १३ नोव्हेंबर रोजी प्रशासक नियुक्तीचे आदेश दिले होते. त्यानंतर प्रशासक व सल्लागार समिती सदस्यांच्या नावांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. त्यावर दि. १८ नोव्हेंबर रोजी शासनाने मान्यता दिली. महाराष्ट्र शैक्षणिक परिसंस्था (व्यवस्थापन) अधिनियम, १९७६ मधील कलम ४ (१) व ५ (१) नुसार ही नियुक्ती करण्यात येत आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील ९ शाळांसाठी प्रशासक म्हणून जिल्हा परिषद पुणेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सल्लागार म्हणून उपशिक्षणाधिकारी छाया महिंद्रकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विज्ञान पर्यवेक्षक विराज खराटे यांचीही सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी माहिती दिली.
प्राथमिक विभागातील ४ शाळांसाठी प्रशासक म्हणून जिल्हा परिषद पुणेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सल्लागार म्हणून उपशिक्षणाधिकारी संजय काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपशिक्षणाधिकारी अस्मा मोमीन यांचीही सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत प्राथमिक शिक्षण संचालक डॉ. शरद गोसावी यांनी माहिती दिली.
Ans: सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या एकूण १३ शाळांवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत.
Ans: शिक्षण संचालनालयाने १३ नोव्हेंबर रोजी प्रशासक नियुक्तीचे आदेश दिले होते. त्यानंतर १८ नोव्हेंबर रोजी शासनाने प्रशासक व सल्लागार समिती सदस्यांच्या नावांना मान्यता दिली.