Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bank Of Baroda: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची सुवर्णसंधी! २,४८२ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया…

Bank Of Baroda recruitment : बँक ऑफ बडोदामध्ये २,४८२ लोकल बँक ऑफिसर (LBO) पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा पॅटर्न आणि ऑनलाइन अर्ज करण्याच्या पद्धतीबद्दल सविस्तर जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 23, 2026 | 04:11 PM
boi

boi

Follow Us
Follow Us:

Bank Of Baroda recruitment : बँकिंग क्षेत्रात आपले करिअर घडवण्याचा विचार करणाऱ्या तरुणांसाठी एक उत्तम संधी समोर आली आहे. जर तुमच्यात पारंपरिक आणि घोकंपट्टीच्या अभ्यासापेक्षा बँकिंग क्षेत्रात काहीतरी मोठे करून दाखवण्याचे धाडस असेल, तर बँक ऑफ बडोदा (BOB) ने तुमच्यासाठी आपले दरवाजे उघडले आहेत. बँक ऑफ बडोद्याने अधिकृत अधिसूचनेद्वारे २,४८२ पदांवर लोकल बँक ऑफिसर भरतीची माहिती जाहीर केली आहे. यामुळे देशभरातील इच्छुकांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ही एलबीओची कोणतीही तात्पुरती किंवा कंत्राटी नोकरी नसून थेट रेग्युलर पदाची भरती आहे. तुमच्याकडे ग्रॅज्युएशनची पदवी आणि बँक ऑफिसर म्हणून १ वर्षाचा अनुभव असल्यास, ही संधी अजिबात हातातून जाऊ देऊ नका.

अर्ज कधीपर्यंत करता येणार?

बँक ऑफ बडोद्याने जुनियर मॅनेजमेंट ग्रेड स्केल-I मधील २,४८२ लोकल बँक ऑफिसर पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार BOB च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. या पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १८ ऑगस्ट २०२६ पासून सुरू झाली आहे. तर, ७ सप्टेंबर २०२६ पर्यंत अर्ज करता येईल. अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख देखील ७ सप्टेंबर २०२६ हीच आहे.

कोणी करू शकते अर्ज?

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले उमेदवार अर्ज करू शकतात. याशिवाय, उमेदवाराला ज्या राज्यासाठी अर्ज करायचा आहे, तेथील स्थानिक भाषा वाचता, लिहिता आणि बोलता आली पाहिजे. स्थानिक भाषेचे ज्ञान असणारे उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत. तसेच कोणत्याही शेड्युल्ड कमर्शियल बँकेत अधिकारी म्हणून किमान १ वर्षाचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा: किमान २१ वर्षे ते कमाल ३० वर्षे वयोमर्यादा असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. वयाची गणना १ ऑगस्ट २०२६ च्या आधारावर केली जाईल. आरक्षित वर्गातील उमेदवारांना नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सूट दिली जाईल.

बँकत नोकरीची सुवर्णसंधी! IBPS Clerk 2026 साठी अर्ज करण्याची मुदत वाढली; आता ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज!

अर्ज कसा करावा?

१. सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट bankofbaroda.bank.in वर जा.
२. होमपेजवर दिलेल्या ‘Career’ च्या सेक्शनवर क्लिक करा.
३. त्यानंतर ‘Current Opportunities’ वर क्लिक करा.
४. लेटेस्ट नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला ‘Local Bank Officer 2026’ भरतीची लिंक दिसेल.
५. त्यावर क्लिक करून आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
६. लॉगिन केल्यानंतर विचारलेली सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
७. त्यानंतर अर्ज शुल्क जमा करा आणि फॉर्म सबमिट करा.
८. कन्फर्मेशन पेज डाउनलोड करा किंवा त्याची प्रिंट काढून सुरक्षित ठेवा.

निवड प्रक्रिया कशी असेल?

बँक ऑफ बडोदाच्या एलबीओ भरती अधिसूचनेनुसार, अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन परीक्षा द्यावी लागेल. या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना ग्रुप डिस्कशन किंवा मुलाखतीसाठी बोलावले जाईल. त्यानंतर अंतिम मेरीट लिस्ट जाहीर केली जाईल, ज्यामध्ये यशस्वी झालेले उमेदवार आपली नावे पाहू शकतील.

AI Skills: ३ तासांचे काम फक्त १० मिनिटांत होणार पूर्ण! जाणून घ्या प्रॉडक्टिव्हिटी वाढवणाऱ्या ५ जबरदस्त AI स्किल्स!

परीक्षा पॅटर्न कसा असेल?

बँक ऑफ बडोदामध्ये लोकल बँक ऑफिसर पदाच्या भरतीसाठी सीबीटी परीक्षेचे आयोजन केले जाईल. या परीक्षेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांना एकूण २ तासांचा वेळ दिला जाईल. एकूण १२० प्रश्न विचारले जातील, जे प्रत्येक १ गुणाचे म्हणजेच एकूण १२० गुणांचे असतील. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा केले जातील. एखादा प्रश्न सोडवला नाही तर त्याचे गुण कापले जाणार नाहीत, तसेच कोणतेही गुण मिळणार नाहीत.

Web Title: Bank of baroda lbo recruitment 2026 apply online

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 04:11 PM

Topics:  

  • Bank
  • Bank OF Baroda
  • Banking Jobs

संबंधित बातम्या

Bank FD Returns : छोट्या बँका की मोठ्या बँका? FD वर जास्त व्याज कोण देतं? जाणून घ्या कोणता पर्याय आहे बेस्ट?
1

Bank FD Returns : छोट्या बँका की मोठ्या बँका? FD वर जास्त व्याज कोण देतं? जाणून घ्या कोणता पर्याय आहे बेस्ट?

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धा, सोनाली – घुफ्रान सारस्वत चषकाचे मानकरी
2

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धा, सोनाली – घुफ्रान सारस्वत चषकाचे मानकरी

Urban Bank Recruitment 2026: जळगावमधील अमळनेर अर्बन बँकेत ‘या’ पदांची भरती जाहीर; १७ ऑक्टोबरपर्यंत करा अर्ज!
3

Urban Bank Recruitment 2026: जळगावमधील अमळनेर अर्बन बँकेत ‘या’ पदांची भरती जाहीर; १७ ऑक्टोबरपर्यंत करा अर्ज!

FD वर जास्त नफा हवा? SBI, HDFC नाही तर ‘या’ स्मॉल फायनान्स बँका देताहेत High Interest; 5 लाखांचे होतील तब्बल इतके
4

FD वर जास्त नफा हवा? SBI, HDFC नाही तर ‘या’ स्मॉल फायनान्स बँका देताहेत High Interest; 5 लाखांचे होतील तब्बल इतके

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.