Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli District Bank: २७ वर्षांनंतर जिल्हा बँकेवर काँग्रेसचा अध्यक्ष; महेंद्र लाड यांची बिनविरोध निवड

Sangli District Bank: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी महेंद्र लाड यांची बिनविरोध निवड झाली आहे. तब्बल २७ वर्षांनंतर जिल्हा बँकेवर काँग्रेसचा अध्यक्ष विराजमान झाला आहे. तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे तानाजी पाटील यांची निवड झाली. या निवडीमुळे विश्वजित कदम यांची राजकीय खेळी यशस्वी ठरल्याचे मानले जात आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 18, 2026 | 04:46 PM
२७ वर्षांनंतर जिल्हा बँकेवर काँग्रेसचा अध्यक्ष; महेंद्र लाड यांची बिनविरोध निवड

२७ वर्षांनंतर जिल्हा बँकेवर काँग्रेसचा अध्यक्ष; महेंद्र लाड यांची बिनविरोध निवड

Follow Us
Follow Us:
  • उपाध्यक्षपदी शिवसेनेचे तानाजी पाटील
  • विश्वजित कदम यांची राजकीय खेळी यशस्वी
  • भाजपच्या मागणीला मात्र तूर्तास वाटाण्याच्या अक्षता
सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे महेंद्र लाड यांची, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे तानाजी पाटील यांची बिनविरोध निवड झाली. तब्बल २७ वर्षांनंतर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर काँग्रेसला संधी मिळाली आहे. या निवडीच्या निमित्ताने काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी जिल्हा बँकेच्या सत्ताकारणात बाजी मारल्याचे चित्र आहे.  अध्यक्षपदासाठी महेंद्र लाड यांनी, तर उपाध्यक्षपदासाठी तानाजी पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. निर्धारित वेळेत अन्य कोणतेही अर्ज दाखल न झाल्याने दोन्ही निवडी बिनविरोध झाल्या. या निवडीनंतर समर्थकांनी जल्लोष केला. (Sangli District Bank)

Nagpur News : दुर्बल घटकांच्या निधीवरून सभापती बॅकफूटवर; ५५ कोटींच्या प्रस्तावांना स्थगिती; सर्व पत्रे रद्द करण्याचे निर्देश

जिल्हा बँकेच्या सत्तावाटपात अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची मागणी भाजपकडून करण्यात आली होती. अध्यक्षपदावर एक वर्षासाठी संधी द्यावी, असा प्रस्तावही भाजपने आघाडीसमोर ठेवल्याची चर्चा होती. मात्र, प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेत भाजपच्या मागणीला स्थान मिळाले नाही. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर वगळता पक्षाचे अन्य संचालक जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यावर झालेल्या बैठकीस उपस्थित होते. माजी मंत्री अजितराव घोरपडे मात्र जिल्हा बँकेत उपस्थित होते.

निवडीला राजकीय महत्त्व प्राप्त

महेंद्र लाड हे आमदार विश्वजित कदम यांचे जवळचे नातेवाईक असल्याने या निवडीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. कदम यांनी अध्यक्षपदाच्या माध्यमातून जिल्हा बँकेतील सत्तासमीकरणात आपले स्थान अधोरेखित केले आहे. दुसरीकडे, उपाध्यक्षपद शिवसेनेच्या वाट्याला गेले आहे. अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड बिनविरोध झाल्याने राजकीय संघर्ष टळला असला, तरी भाजपच्या पदवाटपाच्या मागणीचे काय झाले, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या निवड प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणारे विश्वजित कदम आणि जयंत पाटील बाहेरगावी असल्याचे नेत्यांकडून सांगण्यात आले.

२७ वर्षांनंतर काँग्रेसचा अध्यक्ष

जिल्हा बँकेच्या इतिहासात २७ वर्षांनंतर काँग्रेसला अध्यक्षपद मिळाले आहे. विलासराव शिंदे हे काँग्रेसचे शेवटचे अध्यक्ष ठरले होते, १९९७ नंतर पुन्हा काँग्रेसला संधी मिळाली त्यामुळे या निवडीकडे केवळ पदाधिकारी निवड म्हणून नव्हे, तर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील बदलत्या राजकीय समीकरणांचा भाग म्हणून पाहिले जात आहे.

राज्यातील वातावरणात होतोय बदल; विदर्भासह मराठवाड्यात पावसाची शक्यता

💡

Frequently Asked Questions

  • Que: सांगली जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली?

    Ans: महेंद्र लाड यांची सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.

  • Que: जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षपदी कोणाची निवड झाली?

    Ans: शिवसेनेचे तानाजी पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड झाली.

  • Que: सांगली जिल्हा बँकेवर किती वर्षांनंतर काँग्रेसचा अध्यक्ष झाला?

    Ans: तब्बल २७ वर्षांनंतर सांगली जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचा नेता विराजमान झाला आहे.

Web Title: Mahendra lad elected unopposed sangli district bank chairman after 27 years congress sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 04:46 PM

Topics:  

  • Bank
  • BJP
  • Sangli
  • Sangli District Bank

संबंधित बातम्या

Sangli News: न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन! सुधारित वेतनासाठी शासनाला अल्टिमेटम
1

Sangli News: न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन! सुधारित वेतनासाठी शासनाला अल्टिमेटम

Ramdas Athawale : रामदास आठवलेंची महायुतीवर नाराजी! ‘काँग्रेससोबत असताना जागा मिळत होत्या, आता भाजपकडून दुर्लक्ष’
2

Ramdas Athawale : रामदास आठवलेंची महायुतीवर नाराजी! ‘काँग्रेससोबत असताना जागा मिळत होत्या, आता भाजपकडून दुर्लक्ष’

Congress on Ashish Shelar : ‘राहुल गांधींवर बोलण्याआधी SIR समजून घ्या! आशिष शेलारांना SIR चा कारभारच माहिती नाही?’ काँग्रेसची टीका
3

Congress on Ashish Shelar : ‘राहुल गांधींवर बोलण्याआधी SIR समजून घ्या! आशिष शेलारांना SIR चा कारभारच माहिती नाही?’ काँग्रेसची टीका

Bank Strike: ‘या’ बँकेचे कर्मचारी ३ डिसेंबरला संपावर! बँकेच्या खासगीकरणाला विरोध, नेमक्या मागण्या काय?
4

Bank Strike: ‘या’ बँकेचे कर्मचारी ३ डिसेंबरला संपावर! बँकेच्या खासगीकरणाला विरोध, नेमक्या मागण्या काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.