
Bank of Baroda Recruitment 2026
या भरतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे निवड झालेल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती त्यांनी ज्या राज्यासाठी अर्ज केला आहे, त्याच राज्यात केली जाणार आहे. सेवेच्या सुरुवातीच्या १२ वर्षांच्या कालावधीपर्यंत किंवा एसएमजीएस-IV ग्रेडमध्ये पदोन्नती होईपर्यंत, यापैकी जे आधी होईल तोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांना त्याच राज्यात सेवा बजावावी लागणार आहे.याबाबत बँक ऑफ बडोदाचे कार्यकारी संचालक लाल सिंह म्हणाले, “ही भरती मोहीम केवळ आमच्या कार्यशक्तीमधील गुंतवणूक नसून, आम्ही ज्या समुदायांना आणि अर्थव्यवस्थांना सेवा देतो त्यांच्यातीलही गुंतवणूक आहे. स्थानिक परिस्थितीची चांगली जाण आणि भाषेचे उत्तम ज्ञान असलेल्या तरुण बँकिंग व्यावसायिकांना सहभागी करून घेतल्यामुळे विविध बाजारपेठांमधील ग्राहकांच्या बदलत्या गरजांना प्रतिसाद देण्याची आमची क्षमता अधिक मजबूत होत आहे.”