फोटो सौजन्य - Social Media
भारत अर्थ मूवर्स लिमिटेड (BEML) या सरकारी कंपनीने तब्बल 600 हून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीतून डिप्लोमा धारकांपासून ते एमबीए, एमटेक, सीए सारख्या उच्चशिक्षित उमेदवारांपर्यंत सर्वांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट bemlindia.in वर ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. पदांनुसार पात्रता वेगळी आहे.
काही पदांसाठी ITI, डिप्लोमा आवश्यक असून इतरांसाठी नर्सिंग, फार्मसी, इंजिनिअरिंग पदवी, पीजी, सीए, एमबीए, एमटेक किंवा त्याच्या समकक्ष शिक्षणाची अट आहे. वयोमर्यादेत स्टाफ नर्स आणि फार्मासिस्ट पदासाठी 25 ते 35 वर्षे, नॉन-एग्झिक्युटिव पदांसाठी 18 ते 30 वर्षे, मॅनेजमेंट ट्रेनीसाठी कमाल 27 वर्षे, तर सिनियर मॅनेजमेंट पदांसाठी 50 ते 55 वर्षे मर्यादा ठेवली आहे. आरक्षणानुसार OBC उमेदवारांना 3 वर्षे, तर SC/ST उमेदवारांना 5 वर्षांची सवलत मिळणार आहे. अर्ज शुल्कामध्ये जनरल आणि ओबीसी उमेदवारांकडून 500 रुपये आकारले जातील, तर SC, ST, PwBD आणि माजी सैनिकांसाठी फी पूर्णपणे माफ आहे.
निवड प्रक्रिया लेखी परीक्षा, स्किल टेस्ट, मुलाखत, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल तपासणी अशा टप्प्यांतून होईल. पगार संरचनेत सिक्युरिटी आणि फायर गार्ड्स पदासाठी 22,000 ते 25,000 रुपये, स्टाफ नर्स व फार्मासिस्टसाठी 29,200 ते 62,000 रुपये, नॉन-एग्झिक्युटिवसाठी 23,000 ते 27,000 रुपये, टेम्पररी एम्प्लॉइज (डिप्लोमा/ITI) साठी 20,000 ते 24,000 रुपये, मॅनेजमेंट ट्रेनीसाठी 40,000 ते 1,40,000 रुपये, तर सिनियर मॅनेजमेंट पदांसाठी 70,000 ते तब्बल 2,60,000 रुपये प्रतिमाह पगार निश्चित करण्यात आला आहे.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन Career विभागात Online Application लिंकवर क्लिक करून रजिस्ट्रेशन करावे, आवश्यक माहिती भरून फॉर्म सबमिट करावा आणि पुढील प्रक्रियेसाठी त्याची प्रिंटआउट प्रत स्वतःजवळ ठेवावी. BEML ही भारत सरकारच्या संरक्षण व अवजड यंत्रसामग्री क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी असून, लाखोंच्या पगारासह सुरक्षित नोकरी मिळवण्याची ही मोठी संधी असल्यामुळे उमेदवारांचे लक्ष या भरतीकडे वेधले जात आहे.