(फोटो सौजन्य:invest4Edu)
जर तुम्ही नोकरीच्या शोधात आहात आणि पुण्यासारख्या शहरात नोकरी शोधत आहात तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. पुण्याच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये गट ड संवर्गातील काही पदांसाठी भरतीला सुरुवात करण्यात आली आहे. पुण्याच्या बायरामजी जीजीभॉय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये या भरतीला सुरुवात करण्यात आली आहे. 15 ऑगस्ट 2025 रोजी या भरतीचा शुभारंभ करण्यात आला होता तसेच अर्ज करण्यासाठी पंधरवड्याचा वेळ दिला होता.
राज्यातील विद्यार्थिनींसाठी खुशखबर! ‘कमवा आणि शिका’ योजनेला होणार शुभारंभ; निधीसाठी पाठपुरावा सुरू
दहा दिवसांची मुदत बाकी असून उमेदवारांना 31 ऑगस्ट पर्यंत त्यांचा अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. या रिक्त पदांमध्ये गॅस प्लांट ऑपरेटर, भांडार सेवक, दवाखाना सेवक, संदेश वाहक, प्रयोगशाला परिचर, बटलर, माळी, प्रयोगशाळा सेवक, शिपाई, वॉचमन, आचारी तसेच हमाल आणि आया तसेच इतर काही पदांचा समावेश आहे. जर तुम्ही रोजगाराच्या शोधात आहात तर नक्कीच या सुवर्णसंधीचा लाभ घेऊ शकता. भरती विषयक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी महाविद्यालयाने जाहीर केलेल्या जाहिरातीचा आढावा घेण्यात यावा.
इच्छुक उमेदवारांनी महत्त्वाची बाब लक्षात ठेवावे की नोकरीचे ठिकाण पुणे आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 354 पदे भरण्यात येणार आहेत. तसेच अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून काही रक्कम भरावी लागणार आहे. जर तुम्ही राखीव प्रवर्गातून येत असाल तर तुम्हाला 900 रुपये अर्ज शुल्क म्हणून भरणे अनिवार्य आहे. तसेच अनारक्षित वर्ग म्हणजे सामान्य प्रवर्गातील उमेदवार अर्ज शुल्क म्हणून 1000 रुपयांची भरपाई करणार आहे.
या भरती संबंधित नियुक्तीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. एकंदरीत, उमेदवारांना संगणक आधारित परीक्षेला उत्तीर्ण करत या भरतीसाठी पात्र होता येणार आहे तसेच पात्र उमेदवाराला या भरतीमध्ये नियुक्त करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी जाहीर करण्यात आलेल्या जाहिरातीची नोंद घ्यावी.