(फोटो सौजन्य: Pinterest)
IIM मुंबईमध्ये भरतीला सुरुवात करण्यात आले होती. दरम्यान, या भरतीमध्ये अनेक इच्छुक उमेदवारांनी त्यांचा अर्ज नोंदवला पण जर तुम्ही यासाठी इच्छुक असाल आणि अद्याप अर्ज केला नसेल तर संधी हातून अद्याप सुटलेली नाही. कारण IIM मुंबईच्या या भरतीची शेवटची मुदत 21 ऑगस्ट रोजी संपणार आहे. मुळात, हे भरती गैर शैक्षणिक म्हणजेच नॉन टीचिंग पदांसाठी आहे. या भरतीमध्ये उमेदवारांना प्रोग्राम ऑफिसर, असिस्टंट मॅनेजर तसेच लायब्ररी ऑफिसर या पदांसाठी अर्ज करता येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणत्या कौशल्यांची गरज आहे? त्यांचे वेतन मान काय असेल? त्यांना कशाप्रकारे अर्ज करता येईल? या सर्व बाबी जाणून घेण्यासाठी अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली होती.
राज्यातील विद्यार्थिनींसाठी खुशखबर! ‘कमवा आणि शिका’ योजनेला होणार शुभारंभ; निधीसाठी पाठपुरावा सुरू
एकंदरीत, या भरतीसाठी उमेदवारांना 21 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहे. विविध पदांसाठी विविध पात्रता निकष तसेच वेतन मान ठरवण्यात आले आहे. प्रोग्राम ऑफिसर पदासाठी अर्ज करणारा उमेदवार कोणताही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर असावा तसेच उमेदवाराकडे किमान दहा वर्षांचा संबंधित क्षेत्रात कामाचा अनुभव असावा. या पदासाठी नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला 67,700 रुपये ते 2,08,700 इतके मासिक वेतन मिळणार आहे.
लायब्ररी ऑफिसर पदासाठी नियुक्त होणारा उमेदवार दरमहा 56 हजार 100 रुपये ते 1,77,500 रुपये इतके दरमहा वेतन मिळवण्याची शक्यता असून या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे शिक्षण लायब्ररी सायन्स किंवा इन्फॉर्मेशन सायन्समध्ये पूर्ण असावे. तर इतकेच नव्हे तर उमेदवार आकडे किमान 15 वर्षांचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. असिस्टंट मॅनेजर यास दरमाह वेतन लायब्ररी ऑफिसर पदा इतकेच असून असिस्टंट मॅनेजर पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून तसेच क्षेत्रातून पदवीधर असणे आवश्यक आहे आणि एक ठराविक कामाचा अनुभवदेखील असणे गरजेचे आहे.
अर्ज करताना उमेदवारांकडून अर्ज शुल्क आकारण्यात येणार… अर्ज शुल्क रिफंडेबल नाही. अर्जुन शुल्काची रक्कम 590 रुपये निश्चित करण्यात आली असून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच दिव्यांग उमेदवारांकडून अर्ज शुल्क आकारण्यात येणार नाही. संस्थेमध्ये कायमस्वरूपी कार्यरत असणाऱ्या उमेदवारांना निशुल्क अर्ज करता येणार आहे. एकूण तीन टप्प्यांमध्ये उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या टप्प्यांमध्ये लेखी परीक्षा, स्किल टेस्ट तसेच इंटरव्यू यांचा समावेश आहे. या तिन्ही टप्प्यांना पात्र उमेदवारच या भरतीसाठी नियुक्त होण्यास पात्र ठरेल. या भरती संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत अधिसूचनेचा आढावा घ्यावा तसेच अंतिम मुदत उद्यावर आली असल्यामुळे लवकर आणि काळजीपूर्वक निर्णय घेण्यात यावे.