फोटो सौजन्य - Social Media
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये (CBI) भरतीला सुरुवात झाली आहे. बिजनेस कॉरेस्पोंडेंट सुपरवाइजर या पदासाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहे. CBI या बँकेची centralbankofindia.co.in हे अधिकृत संकेतस्थळ आहे. इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावे लागणार आहे. ३ जानेवारी पर्यंत अर्जाची विंडो खुली ठेवण्यात आली आहे. किमान २१ वर्षे आयु असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. जास्तीत जास्त ४५ वर्षे आयु असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. अशा अनेक पात्रता निकषांना पात्र करत उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात याभरती संदर्भात अधिक माहिती:
उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करण्यास सुरुवात केली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणात या भरतीसाठी करत आहेत. वर सांगितल्याप्रमाणे, २१ वर्षे ते ४५ वर्षे आयु असणाऱ्या उमेदवारांनाच या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. असे पात्रता निकष अधिसूचनेत नमूद आहेत. तसेच काही निकष हे शैक्षणिक आहेत. एकंदरीत, एका ठराविक क्षेत्रात शिक्षण घेतलेल्या उमेदवारालाच या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. उमेदवाराला कॉम्प्युटरचे सामान्य ज्ञान असणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे उमेदवार पदवीधर असणे अनिवार्य आहे. आणि एमएससी (आईटी)/बीई (आईटी)/एमसीए/एमबीए या विषयांमधून पदवीधर असणाऱ्या उमेदवारांना प्राथमिकता दिली जाईल.
उमेदवारांना दोन टप्प्यात वेतन देण्यात येणार आहे. फिक्स्ड कंपोनेंट आणि वेरिएबल कंपोनेंट अशा पध्द्तीत उमेदवारांना वेतन देण्यात येणार आहे. फिक्स पार्टमध्ये उमेदवाराला १२ हजार ते १५ हजार रुपये इतका वेतन दिला जातो. तसेच व्हेरिएबल पार्टमध्ये ८ हजार ते १० हजार रुपये वेतन देण्यात येईल. तसेच उमेदवाराला ३००० ते ४००० रुपये वाहन भत्ता देण्यात येईल आणि मोबाईल आणि इंटरनेट बिलसाठी ५०० रुपये देण्यात येतील.
उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्यास कोणत्याही लिखित परीक्षेसाठी उपस्थित राहणे गरजेचे नाही. कोणतीही लिखित परीक्षा घेतली जाणार नाही आहे. फक्त, मुलाखतीच्या माध्यमातून ही भरती आयोजित करण्यात येणार आहे. तसेच अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अर्जाचा फॉर्म भरून घ्यावा आणि त्या फॉर्मला खालील पत्त्यावर पाठवण्यात यावे.
विभागीय प्रमुख, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, क्षेत्रीय कार्यालय, दुसरा मजला, सीएसआय बिल्डिंग, पुलिमूडू, एमजी रोड, त्रिवेंद्रम, केरळ – ६९५ ००१