फोटो सौजन्य - Social Media
कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL) मध्ये भरतीला सुरुवात झाली आहे. मुळात, या संदर्भात अधिसूचना जाहीर करण्यात आली होती. उमेदवारांना या अधिसूचनेचा आढावा घेता येणार आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत CSL मध्ये फॅब्रिकेशन असिस्टंट्स आणि आउटफिट असिस्टंट्सच्या रिक्त जागांची भरती करण्यात येणार आहे. २२४ रिक्त पदांचा समावेश या भरतीच्या माध्यमातून केला जाणार आहे. उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोचीन शिपयार्डच्या cochinshipyard.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यायचे आहे.
CSL भरती 2024 – महत्वाच्या तारखा
CSL भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 16 डिसेंबर 2024 पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची विंडो खुली करण्यात आली असून, अनेक उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज नोंदवण्यास सुरुवात केली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक आहात तर शेवटची मुदत लक्षात ठेवा. डिसेंबरच्या ३० तारखेपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहीर अधिसूचनेचा आढावा घेणे आवश्यक आहे. यामध्ये नमूद सखोल माहिती अभ्यासूनच भरतीसाठी अर्ज सुरु करा.
मुळात, CSL द्वारे आयोजित या भरतीच्या माध्यमातून फॅब्रिकेशन असिस्टंट्सच्या ४४ रिक्त जागांना भरण्यात येणार आहे. आउटफिट असिस्टंट्सच्या १८० रिक्त जागांना भरण्यासाठी उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. एकंदरीत, एकूण २२४ रिक्त जागांना भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरायचे आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क माफ करण्यात आले आहे. तसेच PWbd या प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांनादेखील निशुल्क अर्ज करता येणार आहे. इतर आरक्षित प्रवर्गांना अर्ज करताना ६०० रुपये अर्ज शुल्क म्हणून भरावे लागणार आहे. तसेच सामान्य श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ६०० रुपयांची भरपाई करायची आहे.
अर्ज करण्याअगोदर उमेदवारांना काही अटी शर्ती पात्र कराव्या लागणार आहेत. या अटी शर्तीना पात्र केल्याशिवाय अर्ज करता येणार नाही आहे. या अटी शैक्षणिक तसेच उमेदवाराच्या वयोमर्यादे संदर्भात आहेत. अर्ज कर्त्या उमेदवाराचे शिक्षण SSLC & ITI – NTC (Relevant Trade) इतके पूर्ण असावे तर अधिसूचनेत नमूद वयोमर्यादेच्या अनुसार, ४५ वर्षे वय असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. एकंदरीत, अर्ज कर्त्या उमेदवाराची वयाची अट ४५ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.