Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Billabong Novel: ‘बिल्लाबाँग’ कादंबरीतून अर्धनागरी जीवनाचे वास्तव आणि बंडखोर अन्वयार्थ; मुंबईत दिमाखात पार पडला प्रकाशन सोहळ

अक्षय दया मोहिते लिखित 'बिल्लाबाँग' कादंबरीचा प्रकाशन सोहळा मुंबईत पार पडला. आजच्या निमशहरी जीवनाचे वास्तव मांडणारी ही कादंबरी साहित्यातील सर्व संकेत तोडणारी ठरेल, असे मान्यवरांनी म्हटले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 08, 2026 | 03:42 PM
Billabong Novel: ‘बिल्लाबाँग’ कादंबरीतून अर्धनागरी जीवनाचे वास्तव आणि बंडखोर अन्वयार्थ; मुंबईत दिमाखात पार पडला प्रकाशन सोहळ
Follow Us
Follow Us:

 

  • ‘बिल्लाबाँग’ कादंबरीतून अर्धनागरी जीवनाचे वास्तव आणि बंडखोर अन्वयार्थ
  • मुंबईत दिमाखात पार पडला प्रकाशन सोहळा
मुंबई, प्रतिनिधी : बिल्लाबाँग ही आशय, कथा, आसमंत आणि अन्वयार्थ यांतून सध्याच्या समाजाचे वास्तव, जुन्या परंपरा छेदत ढसाळ परंपरेत मांडणारी कादंबरी आहे. आजचे अर्धनागरी जीवन, त्यातील बहुजनांचे आणि अभिजनांचे विश्व या दोन्हीमधील जग अन् तिथली माणसे अक्षय दया मोहिते यांनी अचूक टिपली आहेत. ही मराठीतील एक महत्त्वाची कादंबरी ठरेल, असे प्रतिपादन कवयित्री नीरजा यांनी केले.

‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान शरद पवार इन्सपायर फेलोशिप २०२६’ अंतर्गत, अक्षय दया मोहिते लिखित व ‘ललित प्रकाशन’ प्रकाशित ‘बिल्लाबाँग’ या कादंबरीचा प्रकाशन सोहळा नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस (NCPA) येथे दिमाखात पार पडला. प्रकाशन समारंभाला कवयित्री नीरजा, ज्येष्ठ समीक्षक मुकुंद कुळे, ज्येष्ठ पत्रकार सचिन परब, यशवंतराव चव्हाण सेंटरचे प्रोग्राम मॅनेजर दत्ता बाळसराफ यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी ज्येष्ठ लेखक व संपादक अरुण शेवते, प्रा. मंगेश बनसोड, लेखिका प्रा. श्यामल गरुड, लेखक व अनुवादक डॉ. श्रीधर पवार, मुक्त पत्रकार शर्मिष्ठा भोसले, ‘कुर्ला टू वेंगुर्ला’चे दिग्दर्शक विजय कळमकर, कवी अविनाश गायकवाड, कवी व कादंबरीकार अविनाश उषा वसंत, युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक प्रदीप कोकरे, कवयित्री लक्ष्मी यादव, पत्रकार सुबोध मोरे, साहित्यिक प्रा. अविनाश कोल्हे, पत्रकार निलेश बने आणि ‘पुढारी न्यूज’चे संपादक प्रसन्न जोशी, नॅशनल सेंटर फॉर परफॉरमिंग आर्ट ( NCPA ) प्रलेखन अधिकारी डॉ सुजाता जाधव यांसह साहित्यिक, सामाजिक आणि चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी श्रीनिवास नार्वेकर, सुधीर चित्ते यांनी कादंबरीच्या काही भागाचे अभिवाचन केले.

Arbaz Shaikh : “मी मुस्लिम असूनही हिंदू मुलीशी…” हे काय म्हणाला बांगडीवाल्या भाभीचा सल्या? नुकताच झाला निकाह

भाषेचे सर्व पारंपरिक संकेत तोडणारी कादंबरी!

समीक्षक मुकुंद कुळे म्हणाले, “ही कादंबरी भाऊ पाध्ये आणि जी. के. ऐनापुरे यांच्या भाषेला पुढे नेणारी असून, निमशहरी संस्कृतीतील तरुणांचे विश्व प्रकर्षाने मांडते. सध्याच्या मराठी साहित्यात ही कादंबरी भाषेचे सर्व पारंपरिक संकेत तोडत आपले म्हणणे प्रखरपणे मांडते. ही कादंबरी वाचताना एखादी दर्जेदार ‘वेब सीरिज’ पाहत असल्याचा अनुभव येतो.”

आजच्या पिढीतील लेखकांकडे धमक !

ज्येष्ठ पत्रकार सचिन परब म्हणाले, “अक्षय दया मोहिते यांची ही कादंबरी सामान्य माणसाच्या जगण्यातील संघर्ष भेदकपणे समोर ठेवते. बहुजन-अभिजन या भेदांच्या पलीकडे जाऊन, पारंपरिक चौकटी मोडीत काढत ही कादंबरी बंडखोरपणे भाष्य करते. भाऊ पाध्ये यांच्यासारखे लेखन करण्यासाठी लागणारी ‘धमक’ आजच्या पिढीतील लेखकांकडे आहे, हे या कादंबरीतून सिद्ध होते.”

Deool Band 2 : सिनेमाचा ट्रेलर लाँच! “दुर्योधन पहिला, रावण पहिला… आता शेतकरी” देव परीक्षा घेणार नाही, देणार!

Web Title: Billabong marathi novel by akshay daya mohite launched at ncpa mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 08:03 PM

Topics:  

  • Career News

संबंधित बातम्या

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन
1

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन

शिक्षणाचा बाजार! अनुदान मिळूनही जास्तीची फी? पुणे विभागातील शाळांना शिक्षण उपसंचालकांचा दणका!
2

शिक्षणाचा बाजार! अनुदान मिळूनही जास्तीची फी? पुणे विभागातील शाळांना शिक्षण उपसंचालकांचा दणका!

AIIMS INI-CET 2027 मेडिकल PG प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या परीक्षा, फी अन् प्रक्रियेची संपूर्ण माहिती
3

AIIMS INI-CET 2027 मेडिकल PG प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या परीक्षा, फी अन् प्रक्रियेची संपूर्ण माहिती

Maharashtra Board Exams 2027: 10वी – 12वी परिक्षांचे वेळापत्रक जाहीर, कधी सुरू होणार परीक्षा
4

Maharashtra Board Exams 2027: 10वी – 12वी परिक्षांचे वेळापत्रक जाहीर, कधी सुरू होणार परीक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.