फोटो सौजन्य - Social Media
नेमका काय आहे Trailer?
Deool Band 2 मध्येही स्वामींची भूमिका मनोहर जोशी यांनी साकारली आहे. ‘एखादा नास्तिक आणि स्वामी’ ही भक्तिलीला पुन्हा मोठ्या पडद्यावर आणण्याचे माध्यम हा सिनेमा आहे. प्रदर्शित करण्यात आलेल्या ट्रेलरमध्ये आपल्या नवऱ्यासोबत दररोजच्या होणाऱ्या वादाला कंटाळली नास्तिक महिला दिसत आहे. झालेल्या वादात एकदा तिचा आस्तिक नवरा स्वामीरायांचे देऊळ बंद करून निघून जातो. तेव्हा ती नास्तिक महिला रागाने वटवृक्षाखाली जाऊन स्वामींना हाक देते. स्वामी तिच्या हाकेला सादही देतात आणि तिच्यासमोर प्रकट होतात. या दरम्यान, स्वामी त्या महिलेला म्हणतात की “प्रत्येक युगात मी तुझ्यासारखे कित्येक रावण आणि कित्येक दुर्योधन पाहिलेत, ज्यांनी देवाची परीक्षा पाहिली!” तेव्हा ती महिला स्वामींना म्हणते की “मी लिहून देते की तुम्ही कधी शेतकरी नसेल पाहिला!”
या ट्रेलरच्या उत्तरार्धात महिला स्वामींना ओरडून येथून निघून जाण्यासाठी म्हणते पण स्वामी तिला उत्तर देतात की “परीक्षेला बसवलं आहेस ना आता मला, परीक्षा दिल्याशिवाय आता काय मी जात नसतो!” एकंदरीत, एका नास्तिकेने घेतलेली देवाची परीक्षा या सिनेमात दाखवली आहे आणि अशा नास्तिक माणसासाठी देव स्वतःला कसा सिद्ध करतो? या गोष्टी यात दाखवण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे ट्रेलरमध्ये स्वतः श्री कृष्ण दाखवण्यात आले आहे.
सिनेमात झळकणार ‘हे’ मराठी कलाकार
सिनेमात स्वतः सिनेमाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे, स्वामीरूपात मनोहर जोशी, महेश मांजरेकर, ओम भुतकर, मंगेश देसाई या सुप्रसिद्ध मराठी कलाकारांनी काम केले आहे.






