फोटो सौजन्य - Social Media
प्रतिक्रिया देताना Arbaz म्हणाला आहे की, “मी माझ्या पत्नीसोबत फोटो शेअर केल्यानंतर अनेकांनी असा समज करून घेतला की मी मुस्लिम असून हिंदू मुलीशी लग्न केलं आहे. मात्र लोकांना हे माहित नाही की तीही मुस्लिमच आहे. खरं सांगायचं तर आम्हाला या धर्माच्या वादात अडकायचंच नाही. आम्ही जन्माने मुस्लिम असलो, तरी मनाने मराठी आहोत. माझ्या घरात आणि गळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे, कारण त्यांच्या विचारांमधून आम्हाला प्रेरणा मिळते. पण केवळ आमचा धर्म वेगळा असल्यामुळे आम्हाला अनेकदा विरोध आणि टीकेला सामोरं जावं लागतं.”
Arbaz च्या या प्रतिक्रियेनंतर त्याच्या चाहत्यांनी त्याला प्रतिसाद दिला आहे. त्याच्या चाहत्यांनी त्याला अशा वाईट कमेंट्स करणाऱ्या लोकांना दुर्लक्षित करण्याचा सल्ला दिला आहे. एका नेटकऱ्याने आमच्या मूळ महाराष्ट्रातला असणारा प्रत्येक मुस्लिम हा मराठीच आहे असे कमेंट केले आहे.
काही दिवसांपूर्वीच केले लग्न!
Arbaz Shaikh च्या निकाहाची बातमी येताच त्याच्या चाहत्यांमध्ये खास करून सैराटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मराठी सिनेक्षेत्रातील अनेक बड्या नेत्यांनी तसेच दिगदर्शकांनी त्याला शुभेच्छा दिल्या तसेच अभिनंदन केले आहे. Arbaz Shaikh सध्या नागराज मंजुळे दिगदर्शित web series ‘मटका किंग’मध्येही झळकून आला होता.






