Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CA होण्यासाठी वयाची कोणतीही अट आहे का? जाणून घ्या कोणत्याही वयात सीए बनण्याची संपूर्ण प्रक्रिया!

CA Exam Age Limit: सीए (CA) परीक्षा देण्यासाठी कोणतीही वयोमर्यादा आहे का? ICAI चे नियम, पात्रता आणि वयाच्या कोणत्याही टप्प्यावर सीए कसे बनू शकतात, याची सविस्तर माहिती जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 16, 2026 | 04:56 PM
ca

ca

Follow Us
Follow Us:

CA Exam Age Limit: देशातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठित प्रोफेशनल कोर्सेसच्या यादीत चार्टर्ड अकाउंटन्सीचे (CA) नाव सर्वात वर येते. अनेकदा तरुण शाळा किंवा कॉलेज संपताच सीएच्या तयारीला लागतात. पण अनेकदा परिस्थितीमुळे, नोकरीच्या व्यग्रतेमुळे किंवा उशिरा निर्णय घेतल्यामुळे काही लोक २५, ३० किंवा ४० व्या वर्षी सीए बनण्याचा विचार करतात. अशा वेळी त्यांच्या मनात सर्वात पहिला आणि मोठा प्रश्न हाच येतो की, सीए परीक्षा देण्यासाठी काही वयोमर्यादा असते का?

जर तुमच्याही मनात अशीच शंका असेल, तर एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. भारतात सीए परीक्षा घेणारी संस्था ‘द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’ (ICAI) ने सीए बनण्यासाठी कोणतीही कमाल वयोमर्यादा निश्चित केलेली नाही. म्हणजेच तुम्ही आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर असाल, जर अभ्यास करण्याची जिद्द आणि आवड असेल तर तुम्ही सीए परीक्षा देऊ शकता. सीए परीक्षेची पात्रता, वयोमर्यादेशी संबंधित नियम आणि या क्षेत्रात प्रवेश करण्याचे मार्ग कोणते आहेत, ते जाणून घ्या.

सीए बनण्याची कमाल वयोमर्यादा काय आहे?

सीए बनण्यासाठी कोणतीही कमाल वयोमर्यादा नाही. तुम्ही १८ वर्षांचे तरुण असाल, ३५ वर्षांचे जॉब प्रोफेसनल असाल किंवा ५० वर्षांचे गृहस्थ असाल, कधीही सीए कोर्समध्ये प्रवेश घेऊ शकता.

  • ICAI कोणत्याही उमेदवाराला त्याच्या वयाच्या आधारावर सीए परीक्षा देण्यापासून रोखत नाही.
  • भारतात अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी ५० आणि ६० व्या वर्षीही सीए फायनलची परीक्षा पास करून चार्टर्ड अकाउंटंट बनण्याचे प्रमाणपत्र मिळवले आहे.
कमाल वयाच्या मर्यादा तर कोणतीही नाही, पण सीएचा प्रवास सुरू करण्यासाठी किमान पात्रता आणि वयाची गरज असते.
  • सीए फाउंडेशन रूटमधून येण्यासाठी १२ वीची परीक्षा पास करणे आवश्यक असते किंवा त्यात सहभागी झालेले असावे.
  • १० वी किंवा १२ वी पास होईपर्यंत विद्यार्थ्याचे वय १६ ते १७ वर्षे होते. यापेक्षा कमी वयात फाउंडेशन परीक्षेत बसणे प्रॅक्टिकली शक्य नसते.
  • जर तुमचे वय २० पेक्षा जास्त झाले असेल आणि तुम्ही ग्रॅजुएशनची डिग्री घेतली असेल तर सीए फाउंडेशन परीक्षा देण्याचीही गरज नाही.
  • कॉमर्स ग्रॅजुएट्स (५५% गुणांसह) आणि नॉन-कॉमर्स ग्रॅजुएट्स (६०% गुणांसह) थेट सीए इंटरमीडिएट (CA Intermediate) मध्ये प्रवेश घेऊ शकतात.
  • जे लोक इतर नोकरीत आहेत आणि २५-३० व्या वर्षी करिअर बदलू इच्छितात, त्यांच्यासाठी डायरेक्ट एंट्री स्कीम हा सर्वोत्तम पर्याय आहे.
Meta salary: IIT च्या विद्यार्थ्याला चक्क ८०० कोटींचे पॅकेज! कोण आहेत त्रपित बंसल, ज्यांना मेटाने केले आपल्या टीममध्ये दाखल?

४०-५० व्या वर्षी सीएची तयारी कशी करावी?

४०-५० व्या वर्षी सीए परीक्षा देण्याचे जसे फायदे आहेत, तसेच काही आव्हानेही आहेत:

फायदे: या वयातील उमेदवारांमध्ये प्रगल्भता, कामाचा अनुभव आणि आर्थिक समज अधिक चांगली असते. ते अभ्यासाबाबत अधिक गंभीर असतात.

आव्हाने: कुटुंबाची जबाबदारी, नोकरीसोबतच ३ वर्षांचे प्रॅक्टिकल ट्रेनिंग यासाठी वेळ काढणे आणि अभ्यासाचे लांब तास मॅनेज करणे थोडे कठीण जाते.

NDA vs NA: NDA आणि NA मध्ये नेमका काय फरक आहे? सैन्यात अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांनी ही माहिती नक्की वाचा!

जर कष्टाची जिद्द असेल आणि अकाउंट्स, टॅक्स व फायनान्सच्या दुनियेत नाव कमावायचे असेल तर वयाचा आकडा हा फक्त एक नंबर आहे. आजच तयारी सुरू करा आणि नावापुढे ‘CA’ लावण्याचे स्वप्न पूर्ण करा.

Web Title: Ca exam age limit eligibility icai marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 04:56 PM

Topics:  

  • CA Exam
  • education

संबंधित बातम्या

NMIMS एसबीएममधील MBA 2027 प्रवेशासाठी अंतिम संधी, जाणून घ्या पात्रता आणि पॅकेज..
1

NMIMS एसबीएममधील MBA 2027 प्रवेशासाठी अंतिम संधी, जाणून घ्या पात्रता आणि पॅकेज..

NCERT Class 9 New Book: इयत्ता ९ वीच्या नवीन सामाजिक शास्त्र पुस्तकात मोठा बदल; जाणून घ्या काय आहे खास?
2

NCERT Class 9 New Book: इयत्ता ९ वीच्या नवीन सामाजिक शास्त्र पुस्तकात मोठा बदल; जाणून घ्या काय आहे खास?

CAT 2026 : कॅट परीक्षा देताय! मग ६ ऑक्टोबरपर्यंत अर्जातील ‘या’ गोष्टीमध्ये करता येणार बदल
3

CAT 2026 : कॅट परीक्षा देताय! मग ६ ऑक्टोबरपर्यंत अर्जातील ‘या’ गोष्टीमध्ये करता येणार बदल

Municipal School: दरवर्षी ८ कोटींची निविदा, तरी विद्यार्थ्यांना साहित्याची प्रतीक्षा; शूज, बाटल्या अन् गणवेश वितरणावर प्रश्नचिन्ह
4

Municipal School: दरवर्षी ८ कोटींची निविदा, तरी विद्यार्थ्यांना साहित्याची प्रतीक्षा; शूज, बाटल्या अन् गणवेश वितरणावर प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.