Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yuva Shakti Samriddhi: कमाई सुरू होण्यापूर्वीच गुंतवणुकीचे ज्ञान! विद्यार्थ्यांसाठी ‘युवा शक्ती समृद्धी’ची सुरुवात

Yuva Shakti Samriddhi: कॅनरा रोबेको अॅसेट मॅनेजमेंट कंपनीने विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी ‘युवा शक्ती समृद्धी’ हा गुंतवणूकदार शिक्षण उपक्रम सुरू केला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 26, 2026 | 06:17 PM
कमाई सुरू होण्यापूर्वीच गुंतवणुकीचे ज्ञान! विद्यार्थ्यांसाठी ‘युवा शक्ती समृद्धी’ची सुरुवात

कमाई सुरू होण्यापूर्वीच गुंतवणुकीचे ज्ञान! विद्यार्थ्यांसाठी ‘युवा शक्ती समृद्धी’ची सुरुवात

Follow Us
Follow Us:
  • विद्यार्थ्यांना गुंतवणुकीचे धडे
  • कॅनरा रोबेको AMCचा ‘युवा शक्ती समृद्धी’ उपक्रम सुरू
  • SIP, STP, SWPचे धडे देणार कॅनरा रोबेको AMC
मुंबई : तरुण पिढीमध्ये आर्थिक साक्षरता वाढवून त्यांना करिअरच्या सुरुवातीपासूनच योग्य आर्थिक निर्णय घेण्यासाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने कॅनरा रोबेको अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (Canara Robeco AMC) ने विद्यार्थी-केंद्रित गुंतवणूकदार शिक्षण उपक्रम ‘युवा शक्ती समृद्धी’ लाँच केला आहे.

कंपनीच्या माहितीनुसार, रोजगार किंवा व्यवसायाच्या माध्यमातून कमाई सुरू करण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना बचत, गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनाची मूलभूत माहिती मिळावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासून शिस्तबद्ध गुंतवणुकीची सवय निर्माण करून भविष्यासाठी मजबूत आर्थिक पाया तयार करण्यावर भर दिला जाणार आहे.

बारामतीत गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत; अनेक मंडळांकडून यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा

शैक्षणिक संस्थांमध्ये होणार कार्यशाळा

‘युवा शक्ती समृद्धी’ अंतर्गत विविध शैक्षणिक संस्थांमध्ये परस्परसंवादी कार्यशाळा आणि तज्ज्ञांची सत्रे आयोजित केली जाणार आहेत. गुंतवणुकीशी संबंधित संकल्पना विद्यार्थ्यांना सहज समजतील अशा भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विशेषतः म्युच्युअल फंड, बचत आणि गुंतवणूक नियोजनाबाबत असलेले सामान्य गैरसमज दूर करण्यावर या कार्यक्रमात भर असेल. विद्यार्थ्यांना भविष्यात उत्पन्न मिळण्यास सुरुवात झाल्यानंतर आर्थिक उद्दिष्टे निश्चित करणे आणि त्यानुसार शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक प्राथमिक माहिती दिली जाणार आहे.

‘कमाई सुरू होण्यापूर्वी आर्थिक शिक्षण आवश्यक’

कॅनरा रोबेको AMCचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रजनीश नरुला यांच्या म्हणण्यानुसार, आर्थिकदृष्ट्या जागरूक आणि जबाबदार पिढी घडवण्यासाठी तरुणांना गुंतवणुकीचा प्रवास लवकर सुरू करण्यास प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांनी कमाई सुरू करण्यापूर्वीच गुंतवणूकदार शिक्षण घेतल्यास करिअरच्या सुरुवातीपासून योग्य आर्थिक निर्णय घेण्यास त्यांना मदत होऊ शकते. ‘युवा शक्ती समृद्धी’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी गुंतवणुकीच्या संकल्पना सोप्या करून त्यांना भविष्यातील संपत्ती निर्मितीसाठी आवश्यक माहिती देण्याचा कंपनीचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

SIP, STP आणि SWPवर विशेष भर

या उपक्रमात आर्थिक साक्षरतेसोबतच ‘3S’ अर्थात Systematic Investment Plan (SIP), Systematic Transfer Plan (STP) आणि Systematic Withdrawal Plan (SWP) या तीन महत्त्वाच्या संकल्पनांची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. कॅनरा रोबेको AMCचे चीफ बिझनेस ऑफिसर गौरव गोयल यांच्या म्हणण्यानुसार, ‘सही सोच, सही सुरुवात, सही इन्व्हेस्टमेंट’ या तीन सवयी तरुणांमध्ये रुजवण्याचा उपक्रमाचा उद्देश आहे. आर्थिक उद्दिष्टांच्या नियोजनामध्ये SIP, STP आणि SWP कशा प्रकारे उपयोगी ठरू शकतात, याबाबतही विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण केली जाणार आहे.

देशभरातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न

कॅनरा रोबेको AMCने हा कार्यक्रम देशभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये विस्तारण्याचा मानस व्यक्त केला आहे. रोजगार किंवा व्यवसायात पदार्पण करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना आर्थिक नियोजनाची ओळख करून देत त्यांना भविष्यात माहितीच्या आधारे गुंतवणुकीचे निर्णय घेण्यासाठी तयार करणे हा त्यामागील उद्देश आहे.

कंपनीने यापूर्वीही गुंतवणूकदार शिक्षणासाठी ‘निवेश बस यात्रा’, ‘3S रॅप साँग’ आणि महिलांसाठी ‘स्त्री शक्ती समृद्धी’ यांसारखे उपक्रम राबवल्याचे म्हटले आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून आर्थिक साक्षरता आणि माहितीवर आधारित गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Mumbai News: ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमाला राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद; ५३ हजार शिबिरांचे आयोजन

Web Title: Canara robeco amc launches yuva shakti samriddhi investor education initiative for students

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 06:17 PM

Topics:  

  • education
  • india
  • Students

संबंधित बातम्या

पुणे फक्‍त ‘फार्मसी एज्युकेशन हब’ नाहीतर आता ‘pharma innovation hub’ बनण्याची गरज; फार्मसी क्षेत्रापुढील मोठे आव्हान!
1

पुणे फक्‍त ‘फार्मसी एज्युकेशन हब’ नाहीतर आता ‘pharma innovation hub’ बनण्याची गरज; फार्मसी क्षेत्रापुढील मोठे आव्हान!

GATE 2027 अर्जाची अंतिम मुदत उद्याच; इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी तातडीने भरा फॉर्म!
2

GATE 2027 अर्जाची अंतिम मुदत उद्याच; इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी तातडीने भरा फॉर्म!

Maharashtra DSE Admissions 2026: इंजिनिअरिंगच्या क्रेझमध्ये मोठी वाढ; यंदा ५०,१५३ विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये मिळवले प्रवेश!
3

Maharashtra DSE Admissions 2026: इंजिनिअरिंगच्या क्रेझमध्ये मोठी वाढ; यंदा ५०,१५३ विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये मिळवले प्रवेश!

Professor student clash : ‘कल सुबह पनवेल …’ डायलॉग मारताच भडकले प्रोफेसर; विद्यार्थ्याला थेट धमकी!
4

Professor student clash : ‘कल सुबह पनवेल …’ डायलॉग मारताच भडकले प्रोफेसर; विद्यार्थ्याला थेट धमकी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.