Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 14 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Laptop Tips and Tricks: लॅपटॉप वापरता? मग हे ५ जादुई शॉर्टकट नक्की शिका; तासाभराचे काम होईल काही मिनिटांत!

Laptop Tips and Tricks: फ्रीलान्सिंग, कोडिंग किंवा वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी लॅपटॉप हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. पण तुम्हाला माहितीय का लॅपटॉपवर एखादे काम करताना वारंवार माउस आणि ट्रॅकपॅड वापरल्याने वेळ वाया जातो. Windows मधील काही खास कीबोर्ड शॉर्टकट वापरल्यास कामाचा वेग वाढू शकतो.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 14, 2026 | 02:47 PM
लॅपटॉप वापरता? मग हे ५ जादुई शॉर्टकट नक्की शिका; तासाभराचे काम होईल काही मिनिटांत!

लॅपटॉप वापरता? मग हे ५ जादुई शॉर्टकट नक्की शिका; तासाभराचे काम होईल काही मिनिटांत!

Follow Us
Follow Us:
  • माउस-ट्रॅकपॅडचा वापर विसरा!
  • Windows चे ५ भन्नाट कीबोर्ड शॉर्टकट
  • कामाचा वेग वाढणार
Laptop Tips and Tricks: आजच्या डिजिटल युगात लॅपटॉप हा केवळ ऑफिसच्या कामापुरता मर्यादित राहिलेला नाही. ऑनलाइन क्लासेस, असाइनमेंट तयार करणे, इंटरनेटवर माहिती शोधणे, प्रोजेक्ट रिपोर्ट बनवणे आणि विविध व्यावसायिक कामांसाठी लॅपटॉपचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. विशेषतः विद्यार्थी आणि नोकरदारांसाठी लॅपटॉप हा दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे.(Laptop Tips and Tricks)

मात्र लॅपटॉपवर काम करताना अनेकजण छोट्या-छोट्या गोष्टींसाठी वारंवार माउस किंवा ट्रॅकपॅडचा वापर करतात. त्यामुळे कामाचा वेग कमी होतो आणि साध्या कामांसाठीही अधिक वेळ खर्च होतो. अशावेळी कीबोर्डवरील काही खास शॉर्टकट माहिती असतील, तर अनेक कामे सहज आणि कमी वेळेत पूर्ण करता येऊ शकतात. नेमका या शॉर्टकटचा कशा वापर करायचे ते जाणून घ्या…Windows लॅपटॉपमध्ये असे अनेक शॉर्टकट उपलब्ध आहेत. त्यापैकी हे पाच शॉर्टकट विद्यार्थी, नोकरदार आणि नियमित लॅपटॉप वापरणाऱ्यांसाठी विशेष उपयुक्त ठरू शकतात.

MSRTC Recruitment 2026: तरुणांसाठी खुशखबर! एसटी महामंडळात 13,980 पदांची भरती जाहीर, चालकांसह यांत्रिकी पदांसाठी संधी

1. Ctrl + Shift + T : चुकून बंद झालेला टॅब पुन्हा उघडा

इंटरनेटवर अभ्यास किंवा रिसर्च करताना ब्राउजरमध्ये अनेक टॅब उघडले जातात. अशावेळी एखादी महत्त्वाची वेबसाइट किंवा नोट्स असलेला टॅब चुकून बंद होण्याची शक्यता असते. पुन्हा ब्राउजर हिस्ट्रीमध्ये जाऊन ती वेबसाइट शोधण्याऐवजी Ctrl + Shift + T या शॉर्टकटचा वापर करा. ही की एकत्र दाबल्यास शेवटचा बंद केलेला टॅब पुन्हा उघडतो. एकापेक्षा जास्त टॅब बंद झाले असतील, तर हा शॉर्टकट वारंवार वापरून ते पुन्हा उघडता येतात.

2. Windows + V : कॉपी केलेल्या मजकुराची हिस्ट्री पाहा

सामान्यतः एखादा मजकूर कॉपी करण्यासाठी Ctrl + C आणि पेस्ट करण्यासाठी Ctrl + V वापरले जाते. मात्र या पद्धतीत शेवटची कॉपी केलेली गोष्टच क्लिपबोर्डमध्ये उपलब्ध असते. अशावेळी Windows + V हा शॉर्टकट उपयोगी ठरतो. ही की दाबल्यावर Clipboard History उघडते. त्यामध्ये यापूर्वी कॉपी केलेले मजकूर आणि समर्थित इमेजची यादी दिसते. त्यातील आवश्यक मजकूर निवडून पुन्हा पेस्ट करता येतो. लक्षात ठेवा, पहिल्यांदा हा शॉर्टकट वापरताना Clipboard History सुरू करण्यासाठी Turn On पर्याय निवडावा लागतो.

3. Windows + Left/Right Arrow : एकाच स्क्रीनवर दोन कामे करा

लॅपटॉपवर एकाच वेळी दोन वेगवेगळ्या विंडोमध्ये काम करायचे असेल, तर हा शॉर्टकट अतिशय उपयोगी आहे. उदाहरणार्थ, एका बाजूला ऑनलाइन लेक्चर सुरू ठेवून दुसऱ्या बाजूला नोट्स तयार करायच्या असतील किंवा एका फाइलमधील माहिती पाहून दुसऱ्या फाइलमध्ये ती लिहायची असेल, तर विंडो वारंवार बदलण्याची गरज नाही.

यासाठी Windows + Left Arrow किंवा Windows + Right Arrow दाबा. त्यामुळे सध्या सुरू असलेली विंडो स्क्रीनच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला सेट होईल. त्यानंतर दुसरी विंडो उघडून उर्वरित जागेत ठेवता येईल. यामुळे मल्टिटास्किंग करणे सोपे होते.

4. Windows + Shift + S : स्क्रीनचा हवा तेवढाच भाग कॅप्चर करा

संपूर्ण स्क्रीनचा स्क्रीनशॉट घेण्याऐवजी एखादा विशिष्ट मजकूर, ग्राफ, फोटो किंवा नोट्सचा भाग कॅप्चर करायचा असेल, तर Windows + Shift + S हा शॉर्टकट वापरा. ही की दाबल्यावर Windows मधील Snipping Tool चे स्क्रीनशॉट पर्याय दिसतात. त्यानंतर माउसच्या मदतीने स्क्रीनवरील आवश्यक भाग निवडता येतो. निवडलेला स्क्रीनशॉट क्लिपबोर्डमध्ये कॉपी होतो. त्यानंतर Ctrl + V वापरून तो Word फाइल, ईमेल किंवा WhatsApp चॅटमध्ये पेस्ट करता येतो. यामुळे संपूर्ण स्क्रीनचा स्क्रीनशॉट घेऊन नंतर तो क्रॉप करण्याची गरज राहत नाही.

5. Windows + D : एका क्षणात डेस्कटॉपवर पोहोचा

लॅपटॉपवर काम करताना अनेक फोल्डर, ब्राउजर आणि अॅप्स उघडलेले असतात. अशावेळी डेस्कटॉपवरील एखादी फाइल उघडायची असल्यास प्रत्येक विंडो मिनिमाइज करण्याची गरज पडू शकते. मात्र Windows + D हा शॉर्टकट दाबल्यास सर्व उघड्या विंडो मिनिमाइज होऊन थेट डेस्कटॉप दिसतो. पुन्हा हाच शॉर्टकट दाबल्यास आधी उघडलेल्या विंडो पुन्हा दिसू शकतात.

हे शॉर्टकट लक्षात ठेवा, वेळ वाचवा!

लॅपटॉपवर काम करताना या पाच शॉर्टकटचा नियमित वापर केल्यास वारंवार माउस किंवा ट्रॅकपॅड वापरण्याची गरज कमी होऊ शकते. विशेषतः विद्यार्थी, ऑफिसमध्ये काम करणारे कर्मचारी आणि सतत इंटरनेटवर रिसर्च करणाऱ्यांसाठी हे शॉर्टकट उपयुक्त आहेत. त्यामुळे हे शॉर्टकट एकदा शिकून घ्या आणि रोजच्या कामात त्यांचा वापर करा.

Vacant Teacher Posts : सरकारी शाळांमध्ये शिक्षकांचा मोठा तुटवडा! देशभरात ३.५७ लाख पदे रिक्त; उत्तर प्रदेश आघाडीवर

💡

Frequently Asked Questions

  • Que: लॅपटॉपवर चुकून बंद झालेला टॅब पुन्हा कसा उघडायचा?

    Ans: Ctrl + Shift + T ही की एकत्र दाबल्यास ब्राउजरमध्ये शेवटचा बंद केलेला टॅब पुन्हा उघडता येतो.

  • Que: Windows लॅपटॉपमध्ये Clipboard History कशी पाहायची?

    Ans: Windows + V ही की दाबल्यास Clipboard History उघडते. पहिल्यांदा वापरताना Turn On पर्याय निवडावा लागतो.

  • Que: लॅपटॉपवर स्क्रीनचा ठराविक भागाचा स्क्रीनशॉट कसा घ्यायचा?

    Ans: Windows + Shift + S ही की दाबा. त्यानंतर माउसच्या मदतीने स्क्रीनवरील हवा असलेला भाग निवडून त्याचा स्क्रीनशॉट घेता येतो.

Web Title: 5 useful windows laptop keyboard shortcuts to save time sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2026 | 02:47 PM

Topics:  

  • Career News
  • Students

संबंधित बातम्या

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना सरसकट परीक्षा शुल्क माफी द्या! जाचक अटी रद्द करण्याची विद्यार्थी संघटनांची मागणी
1

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना सरसकट परीक्षा शुल्क माफी द्या! जाचक अटी रद्द करण्याची विद्यार्थी संघटनांची मागणी

Indian Railway Jobs: दहावी पास तरुणांसाठी रेल्वेत बंपर भरती! ना परीक्षा, ना मुलाखत; थेट गुणवत्तेवर होणार निवड
2

Indian Railway Jobs: दहावी पास तरुणांसाठी रेल्वेत बंपर भरती! ना परीक्षा, ना मुलाखत; थेट गुणवत्तेवर होणार निवड

Education News: परदेशातील उच्च शिक्षणाला ‘ब्रेक’! २०२३ मधील ९.०८ लाखांवरून संख्या थेट ६.२६ लाखांवर
3

Education News: परदेशातील उच्च शिक्षणाला ‘ब्रेक’! २०२३ मधील ९.०८ लाखांवरून संख्या थेट ६.२६ लाखांवर

Jawaharlal Nehru Fellowship Program: संशोधकांसाठी सुवर्णसंधी! जवाहरलाल नेहरू मेमोरियल फंडतर्फे मिळणार १ लाखांचे स्टायपेंड
4

Jawaharlal Nehru Fellowship Program: संशोधकांसाठी सुवर्णसंधी! जवाहरलाल नेहरू मेमोरियल फंडतर्फे मिळणार १ लाखांचे स्टायपेंड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.