
career (फोटो सौजन्य: social media)
एकूण 1,213 अप्रेंटिस पदांसाठी WCL भरती जाहीर
पात्रता: 10वी/12वी/डिप्लोमा/ITI/पदवी
अर्जाची अंतिम तारीख: 30 नोव्हेंबर 2025
तरुणांसाठी सुवर्णसंधी! वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) ने संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA), फिटर, वेल्डर, सर्व्हेअर इत्यादी अप्रेन्टिस पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहे. एकूण १२१३ अप्रेन्टिस पदांसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया १७ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू झाली असून याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२५ आहे. इच्छुक उमेदवार westerncoal.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकतात. चला जाणून घेऊया शैक्षणिक पात्रता आणि इतर माहिती काय आहे.
बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधत मोखाड्यात शैक्षणिक स्पर्धा! आदिवासी संघर्ष समितीचा उपक्रम
एकूण १२१३ अप्रेन्टिस पदांसाठी वेस्टर्न कोलफिल्डस लिमिटेड अर्ज मागवत आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२५ आहे. westerncoal.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन इच्छुक उमेदवार अर्ज करू शकता.
शैक्षणिक पात्रता काय?
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेतून किंवा विद्यापीठातून १०वी/१२वी/डिप्लोमा/आयटीआय ट्रेड किंवा पदवी असणे आवश्यक आहे.
स्टायपेंड किती?
निवडलेल्या उमेदवारांना त्यांच्या पदानुसार दरमहा ₹८,२०० ते ₹१२,३०० पर्यंत स्टायपेंड मिळेल.
वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २६ वर्षे आहे, जे ०१/०८/२०२५ पासून मोजले जाते. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसार वयात सूट दिली जाईल.
कसा कराल अर्ज?
Ans: ऑनलाइन
Ans: 18
Ans: WCL