फोटो सौजन्य - Social Media
दीपक गायकवाड – मोखाडा : आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीच्या वतीने आद्य क्रांतिकारक, वीर राघोजी भांगरे व धरती आबा वीर बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त – वाकडपाडा हायस्कूल( उधळे)याठिकाणी जि.प .शाळा तसेच माध्यमिक शाळा मधील मुलांच्या वकृत्व स्पर्घा व निबंद्ध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये तालुक्यातील अनेक शाळा मधुन जवळ-जवळ ६० विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता व त्यांनी आपल्या वकृत्वातुन व निबंद्ध लेखणातुन प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावले.
आजपर्यंत आपण फक्त क्रिकेटच्या स्पर्धा बघत होतो पण प्रथमच अशाप्रकारच्या स्पर्धा बघायला मिळालल्या आणि विशेष म्हणजे सहभागी सर्व विद्यार्थीना सन्मानपत्र देउन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी व त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी, भविष्यात तालुक्यातुन उत्तम वक्ता तयार व्हावा यासाठी आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीचे संस्थापक, अध्यक्ष प्रदीप वाघ तसेच त्यांचे सहकारी सदस्य समीतीने कार्याध्यक्ष मंगेश दाते, सचिव संजय वाघ, सदस्य निलेश झुगरे, सरपंच नरेंद्र येले, सरपंच मोहन मोडक, सरपंच रवि धिंडा, उपसरपंच नंदकुमार वाघ, सदस्य नामदेव गिर्हे, दिनेश पाटील, सखाराम शिद, विठ्ठल गोडे, कर्मवीर पतसंस्थेचे अध्यक्ष संतोष पाटील, शिक्षक नेते चंदकांत नांदे, केंद्र प्रमुख भास्कर गारे, आदर्श शिक्षक दिनकर फसाळे यांनी ही अगळी-वेगळी स्पर्धा आयोजीत केली होती.
यास्पर्धेसाठी तालुक्यातील पत्रकार व शिक्षक हनीफ शेख(बाबुभाई) .ज्ञानेश्वर पालवे , राजेंद्र जागले यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी उत्तम निरीक्षण करून स्पर्धकांमधून विजेते घोषित केले. त्यांच्या वत्कृत्वाधून वक्ते घडविणारा वक्ता ही उपाधीही वाघ यांना विद्यार्थ्यांनी स्वय़ंस्फूर्तीने बहाल केली आहे. प्रदिप वाघ हे सातत्याने १० वी , १२ वी पास विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ पूर्वक करुन त्यांचा सन्मान चिन्ह देउन सन्मान करत असतात. त्यांचे हे कार्य खरचं कौतुकास्पद आहे , त्यांच्या सारखा समाजकार्य करणारा , विद्यार्थ्यांना प्रेरीत करणारा माणूस प्रत्येक गावा – गावात तयार व्हावा अशी सन्मानजनक सदिच्छा येथील ग्रामस्थ नामदेव गि-हे यांनी यावेळी बोलून दाखविली आहे.






