
CAT 2026
CAT 2026 Correction Window: कॅट (CAT) २०२६ साठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) इंदूर ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजल्यापासून CAT २०२६ च्या अर्ज सुधारणा विंडो उघडणार आहे. या अर्जामध्ये कोणतीही चूक आढळल्यास त्या माहितीत बदल करणे गरजेचे आहे. हा बदल तीन गोष्टीमध्ये करता येणार आहे. त्या तीन गोष्टीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
IIM इंदूरने CAT २०२६ ची सुधारणा सुविधा अत्यंत मर्यादित ठेवली आहे. उमेदवार फक्त त्याच फील्डमध्ये बदल करू शकतील जे संस्थेने एडिट करण्यासाठी उपलब्ध करून दिले आहेत. करेक्शन विंडो दरम्यान उमेदवार खालील तीन गोष्टींमध्ये बदल करू शकतात:
CAT २०२६ च्या अर्जाच्या या माहितीत कोणताही बदल करता येणार नाही. यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:
जर तुम्हाला CAT २०२६ च्या अर्जात बदल करायचा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करू शकता.
स्टेप १: सर्व प्रथम उमेदवाराने CAT च्या अधिकृत वेबसाइट iimcat.ac.in वर जावे.
स्टेप २: त्यानंतर वेबसाइटवर दिलेल्या ‘Registered Candidate Login’ या पर्यायावर क्लिक करावे.
स्टेप ३: तुमचा नोंदणीकृत युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे.
स्टेप ४: आता तुमचा आधीच सबमिट केलेला CAT २०२६ ॲप्लिकेशन फॉर्म उघडावे.
स्टेप ५: डॅशबोर्डवर दिसणाऱ्या ‘Correction’ किंवा ‘Edit’ पर्यायावर क्लिक करावे.
स्टेप ६: आता IIM इंदूरने ज्या फील्डमध्ये बदल करण्याची परवानगी दिली आहे, त्यात आवश्यक बदल करावे.
स्टेप ७: बदल केल्यानंतर सर्व माहिती पुन्हा एकदा काळजीपूर्वक तपासावी आणि अर्ज अपडेट करावा.
स्टेप ८: आता तुमच्याकडे भविष्यातील संदर्भासाठी त्याची एक प्रत सुरक्षित ठेवावी.
अर्ज भरताना उमेदवाराने चुकीचा फोटो किंवा सही अपलोड होण्यापासून वाचण्यासाठी सर्व अटी काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.
DRDO Recruitment 2026: संरक्षण संशोधन संस्थेत २४ जागांसाठी भरती; असा करा अर्ज
CAT २०२६ चे प्रवेशपत्र ४ नोव्हेंबर २०२६ रोजी जारी केले जाणार आहेत. उमेदवार CAT च्या अधिकृत वेबसाइटद्वारे आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतील. उमेदवाराने डाउनलोड केलेल्या प्रवेशपत्रातील सर्व माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी.
CAT २०२६ ची करेक्शन विंडो ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:०० वाजेपासून ६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत उपलब्ध असेल. त्यामुळे ज्या उमेदवाराच्या अर्जमध्ये वरील तीन चुका झाल्या आहेत त्यामध्ये बदल करावा.