Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cats employees: डेस्कवर बसण्यापूर्वी मांजरी करतात स्वागत! जपानमधील ‘या’ अनोख्या कंपनीत पाळीव प्राणीच आहेत फुल-टाइम कर्मचारी

Cats employees in Tokyo: जपानच्या 'क्यूनोट' (Qnote) या सॉफ्टवेअर कंपनीने कर्मचाऱ्यांचा ताण कमी करण्यासाठी आणि ऑफिसचे वातावरण आनंदी ठेवण्यासाठी तब्बल ११ मांजरींना अधिकृतपणे फुल-टाइम 'कर्मचारी' म्हणून कामावर ठेवले आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Nov 16, 2026 | 12:51 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:

Cats employees in Tokyo: तुम्ही ऑफिसमध्ये पोहोचलात आणि डेस्कवर बसण्यापूर्वीच एका गोड मांजराने तुमचे स्वागत केले, तर तुम्हाला कसे वाटेल? साहजिकच, सार्व ताण क्षणात पळून जाईल! जपानची राजधानी टोक्यो येथील ‘क्यूनोट’ (Qnote Inc.) या सॉफ्टवेअर कंपनीने ही अनोखी कल्पना प्रत्यक्षात आणली आहे. या हटके वर्कप्लेसवर माणसांसोबतच ११ मांजरी देखील पूर्णवेळ ‘कर्मचारी’ म्हणून काम करतात. या मांजरी केवळ ऑफिसची शोभा वाढवत नाहीत, तर डेस्कवर फिरणे, न बोलवता मीटिंगमध्ये उपस्थित राहणे आणि कीबोर्डजवळ आळसावून बसणे ही त्यांची रोजची ड्युटी आहे.

हा अनोखा प्रवास २००४ मध्ये सुरू झाला. तेव्हा कंपनीच्या एका संस्थापकाने एका बेवारस मांजरीला दत्तक घेऊन ऑफिसमध्ये आश्रय दिला होता. हळूहळू ही रेलचेल वाढत गेली आणि आज येथे ११ मांजरींचा मुक्काम आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या सर्व मांजरींना कंपनीत अधिकृत पदे देण्यात आली आहेत. या मूक सोबत्यांमुळे ऑफिसचे वातावरण शांत आणि आनंदी राहतेच, शिवाय कर्मचाऱ्यांचा मानसिक थकवा पूर्णपणे नाहीसा होतो, असा कंपनीचा विश्वास आहे. त्यामुळे आज आपण जाणून घेणार आहोत की मांजरी कशा प्रकारे वर्कप्लेसवरील ताण कमी करत आहेत.

एका मांजरीपासून सुरू झालेला प्रवास

या अनोख्या कथेची सुरुवात २००४ मध्ये झाली होती. कंपनीच्या संस्थापकाने एका सुशी रेस्टॉरंटजवळ फिरणारी निराधार मांजर (फुताबा) वाचवली आणि ऑफिसमध्ये घेऊन आले. सुरुवातीला ती एकटीच होती. पण हळूहळू इतर रेस्क्यू केलेल्या मांजरीही या कुटुंबाचा भाग बनत गेल्या. आज टोक्यो येथील कंपनीच्या मुख्यालयात एकूण ११ मांजरी कायमस्वरूपी राहतात. त्या कोणत्याही पाळीव प्राण्याप्रमाणे पिंजऱ्यात किंवा घरात बंदिस्त राहत नाहीत, तर संपूर्ण ऑफिसमध्ये बिनधास्त फिरतात. मीटिंग रूम असो किंवा कर्मचाऱ्यांचे वर्क डेस्क, त्या प्रत्येक ठिकाणी वावरतात.

एका GPU च्या शोधाने रचला इतिहास! जगातील सर्वात मोठया टेक कंपनीचे CEO Jensen Huang नेमकं किती शिकलेत?

क्यूनोट कंपनीची संस्कृती अतिशय मजेशीर आणि वेगळी आहे. यामुळेच या सर्व ११ मांजरींना कंपनीत वेगवेगळी पदे देण्यात आली आहेत. कोणतीही मांजर ‘ऑफिस क्लर्क’ पदावर आहे, तर कोणी ‘मॅनेजर’, ‘डिफेन्स डायरेक्टर’ किंवा ‘ऑडिटर’ची जबाबदारी सांभाळत आहे. ही पदे जरी प्रतिकात्मक असली, तरी कंपनी त्यांना आपल्या कुटुंबाचा महत्त्वाचा भाग मानते. परिस्थिती अशी आहे की, कंपनीत नवीन नोकरीसाठी येणाऱ्या उमेदवारांच्या रेझ्युमेमध्ये ते ‘कैट लवर’ (मांजरप्रेमी) आहेत की नाही, हेदेखील पाहिले जाते. जे लोक प्राण्यांवर प्रेम करतात, ते कंपनीच्या फ्रेंडली वातावरणात सहजपणे जुळवून घेतात.

मांजरींच्या आरामासाठी बदलले संपूर्ण ऑफिस

ज्याप्रमाणे मांजरींची संख्या वाढली, कंपनीने आपल्या वर्कप्लेसमध्येही मोठा बदल केला. ऑफिसच्या आत मांजरींच्या मौजमजेसाठी १२ कॅट टॉयलेट्स, भिंतींवर चढण्यासाठी विशेष शेल्व्ह्ज, ऊंचे वॉकवे आणि स्क्रॅच रेजिस्टेंट (ज्यांवर ओरखडे पडत नाहीत अशा) भिंती तयार करून घेतल्या आहेत. यामुळे मांजरी कोणत्याही अडथळ्याविना आणि ऑफिसच्या साहित्याचे नुकसान न करता आरामात फिरू शकतात. हे ठिकाण आता एक मॉडर्न सॉफ्टवेअर ऑफिस असण्यासोबतच या मुक्या प्राण्यांचे सुरक्षित घरही बनले आहे.

CTET exam 2026: सरकारी शिक्षक होण्याचे स्वप्न होणार पूर्ण! ‘या’ स्मार्ट नियोजनाने करा परीक्षा उत्तीर्ण

स्ट्रेस पळवून लावणारा सर्वोत्तम फॉर्म्युला

या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, या गोंडस प्राण्यांसोबत राहिल्यामुळे मानसिक ताण क्षणात नाहीसा होतो. कामाच्या दरम्यान थकवा जाणवल्यास ते थोडावेळ मांजरीला कुरवाळतात किंवा तिच्यासोबत खेळतात. यामुळे मेंदू फ्रेश होतो. कंपनीचे अध्यक्ष नोबुयुकी सुरुता यांच्या मते, कामाच्या वेळी मांजरी डेस्कवर येऊन बसतात किंवा लक्ष वेधून घेतात, तेव्हा त्याला अडथळा न मानता वरदान मानले जाते. यामुळे कर्मचारी स्क्रीनवरून नजर हटवून थोडा ब्रेक घेतात. या मांजरी अनोळखी सहकाऱ्यांमध्ये ‘आइसब्रेकर’चे काम करतात. यामुळे परस्पर संवाद आणि बॉन्डिंग मजबूत होते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ऑफिसमध्ये मांजरी ठेवण्याची ही अनोखी कल्पना कोणत्या देशात आणि कंपनीत राबवली जात आहे?

    Ans: ही कल्पना जपानची राजधानी टोक्यो येथील ‘क्यूनोट’ (Qnote Inc.) या सॉफ्टवेअर कंपनीत राबवली जात आहे.

  • Que: या मांजरींना ऑफिसमध्ये कोणती पदे देण्यात आली आहेत?

    Ans: या मांजरींना प्रतीकात्मक रूपामध्ये 'ऑफिस क्लर्क', 'मॅनेजर', 'डिफेंस डायरेक्टर' आणि 'ऑडिटर' यांसारखी पदे देण्यात आली आहेत.

  • Que: ऑफिसमध्ये मांजरी ठेवल्यामुळे कर्मचाऱ्यांना काय फायदा होतो?

    Ans: मांजरींसोबत वेळ घालवल्यामुळे कर्मचाऱ्यांचा मानसिक ताण (Mental Stress) चुटकीसरशी नाहीसा होतो, मेंदू फ्रेश होतो आणि सहकाऱ्यांमधील संवाद व बॉन्डिंग मजबूत होण्यास मदत होते.

Web Title: Cats employees japanese software company qnote full time cats employees sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 12:51 PM

Topics:  

  • Career
  • Employees work
  • Job

संबंधित बातम्या

एका GPU च्या शोधाने रचला इतिहास! जगातील सर्वात मोठया टेक कंपनीचे CEO Jensen Huang नेमकं किती शिकलेत?
1

एका GPU च्या शोधाने रचला इतिहास! जगातील सर्वात मोठया टेक कंपनीचे CEO Jensen Huang नेमकं किती शिकलेत?

Jobs in Tesla Company: टेस्लामध्ये नोकरी मिळवायची आहे? जाणून घ्या कोणती स्किल्स आहेत आवश्यक!
2

Jobs in Tesla Company: टेस्लामध्ये नोकरी मिळवायची आहे? जाणून घ्या कोणती स्किल्स आहेत आवश्यक!

Stanford Free AI Course: कसलं भारी! आता स्टैनफोर्ड युनिव्हर्सिटीत फ्रीमध्ये करता येणार एआय कोर्स; असा करा अर्ज!
3

Stanford Free AI Course: कसलं भारी! आता स्टैनफोर्ड युनिव्हर्सिटीत फ्रीमध्ये करता येणार एआय कोर्स; असा करा अर्ज!

IOCL Apprentice Recruitment 2026: इंडियन ऑइलमध्ये ४०९ पदांवर मेगा भरती; कोणतीही परीक्षा व मुलाखत नाही, थेट अशी होईल निवड!
4

IOCL Apprentice Recruitment 2026: इंडियन ऑइलमध्ये ४०९ पदांवर मेगा भरती; कोणतीही परीक्षा व मुलाखत नाही, थेट अशी होईल निवड!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.