Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 19 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CBSE 10th Result 2026: पहिल्यांदाच एप्रिलमध्ये लागणार CBSE 10-12 वी निकाल! Digilocker वरून करा डाऊनलोड

सीबीएसई इयत्ता १०वी बोर्ड परीक्षा २०२६ चा निकाल या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. परीक्षेला बसलेले विद्यार्थी त्यांच्या गुणपत्रिका ऑनलाइन तसेच डिजीलॉकरद्वारे डाउनलोड करू शकतील.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 13, 2026 | 02:49 PM
एप्रिलमध्ये पहि्ल्यांदाच लागणार 10वी CBSE निकाल (फोटो सौजन्य - iStock)

एप्रिलमध्ये पहि्ल्यांदाच लागणार 10वी CBSE निकाल (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • पहिल्यांदाच लागणार १० वी सीबीएसईचा निकाल एप्रिलमध्ये 
  • विद्यार्थ्यांना मे मध्ये देता येणार पुनर्परीक्षा 
  • डिजीलॉकरवरून कशी डाऊनलोड कराल मार्कशीट 
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) इयत्ता १०वी परीक्षा २०२६ (सत्र १) चा निकाल या आठवड्यात कोणत्याही दिवशी जाहीर होण्याची शक्यता आहे. खरे तर, यावर्षी निकाल गेल्या वर्षीपेक्षा थोडा लवकर जाहीर होणार आहे. दरवर्षी हा निकाल साधारणतः मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लागतो असं दिसून येतं. पण यावर्षी पहिल्यांदाच एप्रिल महिन्यात १०वी चा हा निकाल लागणार आहे. 

याचे मुख्य कारण म्हणजे यावर्षी इयत्ता १०वी च्या बोर्ड परीक्षा दोनदा होणार आहेत. पहिले सत्र आधीच पार पडले असून, निकाल जाहीर झाल्यानंतर दुसरे सत्र मे महिन्यात घेतले जाईल. यामुळे विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षा देणे सोपे होईल म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. आता विद्यार्थ्यांना त्यांची मार्केशीट कधी आणि कुठे पाहता येईल हे आपण जाणून घेऊया. 

CBSE दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ महिन्यात पुन्हा होणार परीक्षा; निकालापूर्वीच लागा तयारीला

यावर्षी नवीन बदल काय आहे?

यावर्षी, CBSE ने इयत्ता १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठा बदल केला आहे. विद्यार्थी आता आपली कामगिरी सुधारण्यासाठी तीन विषयांपर्यंत परीक्षा (सत्र २) पुन्हा देऊ शकतात. दुसरी परीक्षा (सत्र २) मे २०२६ मध्ये घेतली जाईल. यामुळे विद्यार्थ्यांना आपले गुण सुधारण्याची आणखी एक संधी मिळेल.

CBSE इयत्ता १०वी परीक्षा २०२६ चा निकाल कुठे तपासायचा?

सीबीएसई इयत्ता १०वीचा निकाल जाहीर होताच, विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट – https://results.cbse.nic.in/ वर जाऊन आपला निकाल तपासू शकतील. तथापि, निकाल तपासण्याचे इतर मार्ग देखील आहेत. विद्यार्थी डिजीलॉकरद्वारे (DigiLocker) आपली गुणपत्रिका पाहू आणि डाउनलोड करू शकतील.

CBSE बोर्डाचा मोठा निर्णय! आता भाषा आणि स्तरानुसार होणार शिक्षण, जाणून घ्या सविस्तर

डिजीलॉकरवरून CBSE 10th Result कसा डाउनलोड करावा?

जर तुम्हाला डिजीलॉकरद्वारे तुमचा सीबीएसई १०वीचा निकाल तपासायचा असेल, तर खालील सोप्या पायऱ्यांचे अनुसरण करा:

१. सर्वप्रथम, अधिकृत डिजीलॉकर वेबसाइटवर जा. तुमचा आधार-लिंक्ड मोबाइल नंबर वापरून लॉग इन करा. हे करणे अत्यंत महत्त्वाचे आहे अन्यथा तुम्हाला निकाल पाहता येणार नाही 

२. लॉग इन केल्यानंतर, तुम्हाला होमपेजवर ‘Issued Documents’ हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

३. आता, तुम्हाला सीबीएसई १०वी निकाल २०२६ ची लिंक दिसेल. ती उघडा.

४. तुम्ही लिंकवर क्लिक करताच, सर्व विषयांचे गुण दर्शवणारी तुमची गुणपत्रिका स्क्रीनवर दिसेल.

५. यानंतर, तुम्ही तुमची गुणपत्रिका PDF स्वरूपात सहजपणे डाउनलोड करून भविष्यातील संदर्भासाठी जतन करू शकता.

Web Title: Cbse 10th result 2026 may be declared in this week of april for the first time how to check marksheet through digilocker

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 02:49 PM

Topics:  

  • CBSE
  • CBSE Result
  • education news

संबंधित बातम्या

CBSE 10th Result 2026: सीबीएसई दहावीच्या दुसऱ्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर! उत्तीर्णतेचा टक्का वाढला
1

CBSE 10th Result 2026: सीबीएसई दहावीच्या दुसऱ्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर! उत्तीर्णतेचा टक्का वाढला

CBSE Free Online Courses: विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! सीबीएसईने सुरू केले ‘हे’ मोफत ऑनलाईन कोर्सेस; पालकही घेऊ शकतात प्रवेश
2

CBSE Free Online Courses: विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! सीबीएसईने सुरू केले ‘हे’ मोफत ऑनलाईन कोर्सेस; पालकही घेऊ शकतात प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.